Manoj Jarange | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; किमान 10 ते 12 दिवस रुग्णालयात राहावे लागणार

Manoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलं होतं.

तब्बल नऊ दिवस त्यांचं हे आमरण उपोषण सुरू राहिलं. त्यानंतर राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने केलेल्या विनंतीवरून यांनी त्यांचं उपोषण थांबवलं आहे.

अशात नऊ दिवस उपोषण केल्यामुळे मनोज जरांगे यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. यादरम्यान त्यांचं जवळपास 12 किलो वजन घटलं आहे.

Manoj Jarange went on hunger strike for nine days for Maratha reservation

मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) मनोज जरांगे यांनी तब्बल नऊ दिवस आमरण उपोषण केलं. उपोषण थांबल्यानंतर त्यांची प्रकृती अत्यंत खराब झाली आहे.

यादरम्यान त्यांचं जवळपास 12 किलो वजन कमी झाली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्याचबरोबर त्यांच्या लिव्हर आणि किडनीवर सूज आली असल्याचं देखील डॉक्टरांनी म्हटलं आहे.

योग्य उपचार घेतल्यानंतर मनोज जरांगे यांची प्रकृती सुधारेल. फक्त त्यासाठी त्यांना 10 ते 12 दिवस रुग्णालयात राहावं लागणार असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 2 नोव्हेंबर 2023 रोजी मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा नववा दिवस होता. या दिवशी राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी उपोषण स्थळी दाखल झालं.

या भेटीदरम्यान त्यांनी जरांगेंना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीचा मान राखत मनोज जरांगे यांनी आपण उपोषण स्थगित केलं.

त्यानंतर मराठा आरक्षणावर (Maratha reservation) तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने जरांगेंना 2 जानेवारीपर्यंत मुदत मागितली होती.

परंतु, जरांगे यांनी राज्य शासनाला 2 जानेवारी ऐवजी 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे. राज्य शासनाला 24 डिसेंबर पर्यंत मराठ्यांना आरक्षण (Maratha reservation) घ्यावं लागणार असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3Qsf4FZ