‘दिलखुलास’मध्ये वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची ‘लोकसभा निवडणुकांची तयारी’ यावर गुरुवारी मुलाखत

मुंबई, दि. २२ : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी वर्धा जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात गुरुवार २५ एप्रिल २०२४  रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. वर्धा जिल्ह्याच्या प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी श्वेता पोटुडे -राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.

वर्धा जिल्ह्यात असलेले लोकसभा मतदार संघ, आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी, निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृती उपक्रम, कायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजन, सर्व घटकातील मतदारांसाठी वर्धा जिल्ह्यात करण्यात आलेल्या सोयी सुविधा याबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी माहिती दिली आहे.

००००