देहविक्री व्यवसायातील महिला मतदारांचा शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प

मुंबईदि. ३० : मुंबई शहर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावीयासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई मधील कामाठीपुरा येथील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मतदान जनजागृतीसाठी आज विशेष मोहीम राबविण्यात आली. यावेळी या महिला मतदारांनी शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प केला.

मतदान जनजागृतीच्या या कार्यक्रमास “स्वीप” च्या प्रमुख समन्वय अधिकारी फरोग मुकादममुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित भांडे-पाटीलकेंद्रीय निवडणूक आयोगाच्या संचालक दीपाली मासिरकरकेंद्रीय निवडणूक आयोगाच्या सल्लागार साधना राऊत, `अपने आपस्वयंसेवी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मंजू व्यासनागपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेशकुमार ठाकूर आदी उपस्थित होते.

दीपाली मासिरकर म्हणाल्या‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने आयोजित आजच्या मतदान जनजागृती उपक्रमात एक जागरूक मतदार म्हणून मोठ्या संख्येने सहभागी झालात. तुम्ही जागरूक झालात तुमच्या सोबतच्या सगळ्यांना मतदान करण्यास सांगावे. आपल्या एक-एक मताचे योगदान महत्त्वाचे आहे. तुमच्या एका मतानेही लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी मदत होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक घटकाला मतदानाचा हक्क बजावता यावायासाठी मतदानाची प्रक्रिया सुलभ केली आहे. देहविक्री व्यवसायातील महिला मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत’असे त्यांनी सांगितले तर मतदानातील सहभागाबाबतही श्रीमती मासिरकर यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला.

श्रीमती मुकादम यांनी मतदानाचा हक्क बजावणे किती महत्त्वाचे आहेत्यामुळे काय फरक पडू शकतो याचे महत्व या महिलांना पटवून दिले. मतदान करणे हा आपला हक्क आहे. तुम्ही स्वतः मतदान करा आणि आपल्या परिसरातील  महिलांनी मतदान करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. प्रत्येकाचे मत महत्त्वाचे असून तो आपला अधिकार आहे. २० मे २०२४ रोजी सर्वांनी मतदान करावेअसे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

श्रीमती राऊत म्हणाल्याभारत निवडणूक आयोगाने प्रत्येक घटकाला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहेत. या निवडणूक प्रक्रियेत एकही जण मतदानापासून वंचित राहू नयेप्रत्येक घटकाने मतदान करावे व मतदानाचा टक्का वाढावाहा उद्देश आहे.

यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात काही महिलांना वोटर स्लिपचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित भांडे-पाटील यांनी केले. आभार तहसीलदार पल्लवी तभाने यांनी मानले.