मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

१९ एप्रिल रोजी मतदान ; १० हजार ६५२ मतदान केंद्र

मुंबई, दि. 16 : महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदार संघामध्ये दि. 19 एप्रिल  रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण 10,652 मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या निवडणुकीत 95,54,667 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यासाठी बॅलेट युनिट (बीयु) 21,527 तर कंट्रोल युनिट (सीयु) 13,963 आणि 14,755 व्हीव्हीपॅट उपलब्ध असून 97 उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती)(वृत्त व जनसंपर्क) डॉ.राहुल तिडके उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना श्री. चोक्कलिंगम म्हणाले, पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत एकूण 97 उमेदवार लढत आहेत. या निवडणूकीसाठी लागणारे साहित्य, साधनसामग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारीवर्ग उपलब्ध आहेत. तसेच पोलीस कर्मचारीवृंद तैनात ठेवण्यात आले आहे. या मनुष्यबळाचे रॅण्डमायझेशन (Randomization) करुन त्यांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत.  तसेच गडचिरोली मतदारसंघात सात हॅलिकॉप्टर पाठविण्यात आले आहेत. यंत्रणा पूर्ण तयारीनिशी निवडणुकीसाठी सज्ज असून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, असे आवाहन श्री. चोक्कलिंगम यांनी यावेळी केले.

मतदान केंद्र सुरक्षेसह सज्ज

मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या ईव्हिएम व व्हिव्हिपॅट ची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही      रॅण्डमायझेशन (Randomization) झाले आहे. या पाच लोकसभा मतदारसंघामध्ये ईव्हिएम व व्हिव्हिपॅट मशीन्सची विधानसभा मतदारसंघनिहाय कमिशनिंग (Commissioning) करण्यात येत आहे. संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये सीआरपीएफ (CRPF) च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

दिव्यांग व ज्येष्ठांसाठी विशेष सुविधा

85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह    मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या  ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये ईटीपीबीएसद्वारे एकूण 9,416 मतदार तर 12डी या अर्जाद्वारे 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग असे एकूण 6,630 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

मतदानाची सर्वसाधारण वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. गडचिरोली-चिमुर (अज) या लोकसभा मतदार संघातील आमगांव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी या चार विधानसभा मतदारसंघात व भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदार संघातील अर्जुनी मोरगांव एका विधानसभा मतदारसंघात अशा एकूण पाच विधानसभा क्षेत्रामध्ये मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे.

मतदानाच्या 48 तास आधी प्रचारास बंदी

मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी पाचही लोकसभा मतदार संघामध्ये सायलन्स पिरियड (Silence Period) आहे. या लोकसभा क्षेत्रामध्ये 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत.

राज्यातील पहिल्या टप्प्यातील 5 लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी सर्व तयारी झालेली आहे. या पाच लोकसभा मतदार संघातील निवडणूकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी सर्व मतदारांनी पुढे येण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात येत आहे.

मतदान करण्याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन वोटर गाईड देण्यात आले आहे. मतदारांना मतदार वोटर स्लिप उपलब्ध करुन दिल्या आहेत. इपीआयसी (EPIC) व्यतिरिक्त कोणते दस्तऐवज मतदानासाठी वापरता येतील याबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देवून जनजागृती करण्यात आली आहे. आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी मतदान केंद्रे आवश्यक सोयी-सुविधांसह सुसज्ज आहेत.

प्रतिबंधात्मक कारवाई

कायदा व सुव्यवस्थांतर्गत 11 एप्रिलपर्यंत 43,893 शस्रास्रे जमा करण्यात आलेली आहे. तर परवाने रद्द करून 723 शस्रे जप्त करण्यात आलेली  आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी (CRPC) कायद्यांतर्गत 70,967 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

        राज्यामध्ये दि. 1 मार्च ते 11 एप्रिल 2024 या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे 39.10 कोटी एकूण रोख रक्कम तर 27.18 कोटी रुपयांची दारु जप्त करण्यात आली. मौल्यवान धातू 63.82 कोटी रुपये, ड्रग्ज 212.82 कोटी, फ्रिबीज 0.47 कोटी आणि इतर बाब अंतर्गत 78.02 कोटी रुपये अशा एकूण 421.41 कोटी रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

18722 तक्रारी निकाली

16 मार्च ते 13 एप्रिल 2024 या कालावधीत राज्यभरात सी व्हिजील ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या 2337 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील 2331 (99.63%) तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच याकालावधीत एनजीएसपी पोर्टलवरील 19018 तक्रारीपैकी 18722 निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

जाहिरात पूर्व प्रमाणिकरणाचे 54 प्रमाणपत्र वितरित

राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिध्दीकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणिकरण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडे जाहिरातीच्या पूर्व प्रमाणीकरणासाठी नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने 54 प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहे.

पहिल्या टप्प्यातील मतदारसंघनिहाय तयारीची माहिती खालीलप्रमाणे

अ.क्र.
मतदार संघाचे नाव
मतदान केंद्रे
निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या
बॅलेट युनिट (बीयु)
कंट्रोल युनिट

(सीयु)

व्हीव्हीपॅट

1
09 – रामटेक
2405
28
5904
3283
3372

2
10- नागपूर
2105
26
5165
2874
2951

3
11- भंडारा-गोंदीया
2133
18
5518
2866
3097

4
12- गडचिरोली-चिमूर
1891
10
2330
2330
2517

5
13-चंद्रपूर
2118
15
2610
2610
2818

एकूण
10,652
97
21,527
13,963
14,755

 

अ.क्र.
मतदार संघाचे नाव
पुरुष मतदार
महिला मतदार
तृतीयपंथी मतदार
एकुण
ETPBS द्वारे मतदान करणारे सेवा मतदार
85 +  व दिव्यांग मतदारांकडून प्राप्त झालेल्या  12D अर्जांची संख्या.

1
9- रामटेक
10,44,891
10,04,142
52
20,49,085
1867
1070

2
10 – नागपुर
11,13,182
11,09,876
223
22,23,281
1001
1385

3
11- भंडारा-गोंदिया
9,09,570
9,17,604
14
18,27,188
3211
1465

4
12-गडचिरोली -चिमुर
8,14,763
8,02,434
10
16,17,207
1483
1438

5
13-चंद्रपुर
9,45,736
8,92,122
48
18,37,906
1854
1272

एकूण
48,28,142
47,26,178
347
95,54,667
9,416
6,630

मतदारांची संख्या खालीलप्रमाणे

 

वयोगटानुसार मतदार संख्या

अ.क्र.
मतदार संघाचे नाव
18-19
20-29
30-39
40-49
50-79
80 +

1
9- रामटेक
31,725
3,83,276
4,90,339
4,76,971
6,20,361
46,413

2
10 – नागपुर
29,910
3,37,961
5,06,372
5,07,640
7,70,700
70,698

3
11- भंडारा-गोंदिया
31,353
3,66,570
3,99,115
3,98,749
5,93,132
38,269

4
12-गडचिरोली -चिमुर
24,026
3,28,735
3,56,921
3,48,585
5,25,381
33,559

5
13-चंद्रपुर
24,443
3,42,787
4,25,829
4,20,965
5,86,402
37,480

एकूण
1,41,457
 17,59,329
21,78,576
 21,52,910
30,95,976
2,26,419

 

मतदारांचा तुलनात्मक तपशील :-

अ.क्र.
मतदार संघाचे नाव
2014 मधील मतदार संख्या
2019 मधील मतदार संख्या
2024 मधील मतदार संख्या

1
9- रामटेक
16,77,266
19,22,764
20,49,085

2
10 – नागपुर
19,00,784
21,61,096
22,23,281

3
11- भंडारा-गोंदिया
16,55,852
18,11,556
18,27,188

4
12-गडचिरोली -चिमुर
14,68,437
15,81,366
16,17,207

5
13-चंद्रपुर
17,53,690
19,10,188
18,37,906

 

 

पहिल्या टप्प्यातील Observer (निरिक्षक):-

क्रमांक व मतदारसंघ
General Observer
Police Observer
Expenditure Observer

09 – रामटेक
1
1
2

10- नागपूर
1
1

11- भंडारा-गोंदीया
1
1
1

12- गडचिरोली-चिमूर
1
1

13-चंद्रपूर
1
1
1

एकूण
5
3
6

 

दुसऱ्या टप्प्यातील 05 बुलढाणा, 06 अकोला, 07 अमरावती, 08 वर्धा, 14 यवतमाळ-वाशिम, 15 हिंगोली, 16 नांदेड, 17 परभणी या 8 लोकसभा मतदारसंघात दि.26 एप्रिल 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.             तिसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील 02, पश्चिम महाराष्ट्रातील 07 व कोकणातील 02 अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 7 मे 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

तिसऱ्या टप्प्यात दि.15.04.2024 पर्यंत रायगड -08 , बारामती – 05, धाराशीव (उस्मानाबाद) – 03, लातूर -01, सोलापुर – 03, माढा -02, सांगली -03, सातारा – 03, रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 01, कोल्हापुर -06, हातकणंगले -10  इतके नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 22 एप्रिल 2024 अशी आहे.

तिसऱ्या टप्यातील 11 लोकसभा मतदारसंघातील दि.11 एप्रिल 2024 पर्यंत अद्यावत मतदारांच्या संख्येचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.
मतदार संघाचे नाव
पुरुष मतदार
महिला मतदार
तृतीयपंथी मतदार
एकुण
मतदान केंद्रे

1
32-रायगड
8,20,025
8,47,220
4
16,67,249
2185

2
35-बारामती
12,38,600
11,27,679
116
23,66,395
2516

3
40-धाराशीव (उस्मानाबाद)
10,51,461
9,39,949
81
19,91,491
2139

4
41-लातूर
10,34,358
9,40,611
61
19,75,030
2125

5
42-सोलापुर
10,40,089
9,87,115
199
20,27,403
1968

6
43-माढा
10,34,999
9,55,035
69
19,90,103
2030

7
44-सांगली
9,52,005
9,13,843
112
18,65,960
1830

8
45-सातारा
9,58,431
9,30,098
76
18,88,605
2315

9
46-रत्नागिरी-सिंधुदुर्ग
7,13,690
7,35,311
12
14,49,013
1942

10
47-कोल्हापुर
9,83,371
9,50,197
91
19,33,659
2156

11
48-हातकणंगले
9,24,878
8,87,274
95
18,12,247
1830

एकूण
1,07,51,907
1,02,14,332
916
2,09,67,155
23,036

        तिसऱ्या टप्प्यातील 11 लोकसभा मतदार संघातील सन 2014 व सन 2019 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमधील मतदारांचा तुलनात्मक तपशील खालील प्रमाणे आहे.

अ.क्र.
मतदार संघाचे नाव
2014 मधील मतदार संख्या
2019 मधील मतदार संख्या
2024 मधील मतदार संख्या

1
32-रायगड
15,32,781
16,52,965
16,67,249

2
35-बारामती
18,13,553
21,14,663
23,66,395

3
40-धाराशीव(उस्मानाबाद)
17,59,186
18,89,740
19,91,491

4
41-लातूर
16,86,957
18,86,657
19,75,030

5
42-सोलापुर
17,02,739
18,51,654
20,27,403

6
43-माढा
17,27,322
19,09,574
19,90,103

7
44-सांगली
16,49,107
18,09,109
18,65,960

8
45-सातारा
17,19,998
18,48,489
18,88,605

9
46-रत्नागिरी-सिंधुदुर्ग
13,67,362
14,55,577
14,49,013

10
47-कोल्हापुर
17,58,293
18,80,496
19,33,659

11
48-हातकणंगले
16,30,604
17,76,555
18,12,247

 

वयोगटानुसार मतदार संख्या :-

अ.क्र
मतदार संघाचे नाव
18-19
20-29
30-39
40-49
50-59
60-69
70-79
80 +

1
32-रायगड
19,564
2,95,690
3,48,303
3,35,888
2,81,510
2,02,553
1,20,837
62,904

2
35-बारामती
29,774
4,29,270
5,72,452
5,09,486
3,69,188
2,41,593
1,40,168
74,464

3
40-धाराशीव (उस्मानाबाद)
39,695
4,01,530
4,31,239
3,91,588
3,17,572
2,05,724
1,30,056
74,087

4
41-लातूर
36,862
4,05,298
4,54,498
4,20,326
2,99,545
1,86,622
1,04,595
67,284

5
42-सोलापुर
32,680
3,98,876
4,64,302
4,20,367
3,30,036
2,10,664
1,16,140
54,338

6
43-माढा
35,005
3,88,673
4,19,234
4,02,264
3,35,536
2,20,702
1,24,933
63,756

7
44-सांगली
31,107
3,51,041
3,88,291
3,74,133
3,22,448
2,12,235
1,25,028
61,677

8
45-सातारा
36,419
3,27,199
3,96,003
4,00,510
3,24,336
2,20,607
1,26,838
56,693

9
46-रत्नागिरी -सिंधुदुर्ग
16,289
2,38,495
2,70,453
3,04,855
2,68,328
1,82,718
1,12,274
55,601

10
47-कोल्हापुर
28,265
3,52,763
3,90,758
3,97,548
3,40,427
2,28,267
1,38,538
57,093

11
48-हातकणंगले
26,090
3,34,672
3,80,756
3,71,971
3,24,152
2,09,192
1,17,152
48,262

          एकूण
3,31,750
 39,23,507
 45,16,289
 43,28,936
35,13,078
23,20,877
13,56,559
6,76,159

 

तिसऱ्या टप्प्यातील Observer (निरिक्षक):-

क्रमांक व मतदारसंघ
General Observer
Police Observer
Expenditure Observer

32-रायगड
1
1
1

35-बारामती
1
1

40-धाराशीव(उस्मानाबाद)
1
1
1

41-लातूर
1
1

42-सोलापुर
1
1
1

43-माढा
1
1

44-सांगली
1
1
1

45-सातारा
1
1

46-रत्नागिरी-सिंधुदुर्ग
1
1
1

47-कोल्हापुर
1
1
1

48-हातकणंगले
1
1

एकूण
11
6
11

तिसऱ्या टप्प्यातील Electronically Transmitted Postal Ballet System (ETPBS) द्वारे मतदान करण्यास पात्र मतदारांची माहिती :-

अ.      क्र.
क्रमांक व मतदारसंघ
मतदारांची संख्या

1
32-रायगड
1350

2
35-बारामती
2212

3
40-धाराशीव(उस्मानाबाद)
3740

4
41-लातूर
3363

5
42-सोलापुर
1800

6
43-माढा
4840

7
44-सांगली
5997

8
45-सातारा
9573

9
46-रत्नागिरी-सिंधुदुर्ग
1032

10
47-कोल्हापुर
6321

11
48-हातकणंगले
4119

 
एकुण
44,347

००००