मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नागपूर कारखान्यातील स्फोट दुर्घटनेवर शोक व्यक्त

नागपूर, दि.१७: नागपुरातील एका उपकरण निर्मिती कारखान्यात झालेल्या स्फोटाच्या दुर्घटनेतील मृत्यूंबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त करून वारसांना पाच लाख रुपयांची मदत देण्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. या कारखान्यात संरक्षणदृष्ट्या महत्त्वाची उत्पादने निर्माण होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस व संबंधित सर्व यंत्रणांना मदत व … Read more

ग्रामसेवकांनी गावाच्या विकासासाठी गतीने काम करावे – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

photo 1 6CeSbB jpeg ग्रामसेवकांनी गावाच्या विकासासाठी गतीने काम करावे – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

 सांगली, दि. १६ (जिमाका) : ग्रामसेवक हा ग्रामस्तरीय प्रशासनाचा महत्त्वाचा खांब असतो. शासनाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात त्यांची महत्वाची भूमिका असते. त्यांचे सांगली जिल्ह्यात उत्कृष्ट काम सुरू आहे. ग्रामसेवकांनी सर्वांच्या बरोबर राहून गावाच्या विकासासाठी गतीने काम करून प्राप्त निधी विहीत मुदतीत खर्च करावा, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी … Read more

शासकीय योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी जीवनमान उंचवावे – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. १६ (जिमाका) : विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे जीवनमान उंचवावे, असे आवाहन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज केले. विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील निवडक जिल्ह्यातील लाभार्थींना दूरदृश्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. याचे प्रसारण मिरज तालुक्यातील बेळंकी येथे झाले. … Read more

योजनांपासून वंचित राहिलेल्यांना संकल्प यात्रेसोबत जोडा  – केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी  

खेमजई (ता. वरोरा) येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन दूरदृश्यप्रणालीद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संवाद चंद्रपूर, दि. १६ : केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या विकसि भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जवळपास 22 योजनांची माहिती नागरिकांच्या घरापर्यंत पोहचविण्यात येत आहे. शासकीय यंत्रणेतील अधिकारी – कर्मचारी लोकांमध्ये जावून याबाबत जनजागृती करीत आहे. त्यामुळे आतापर्यंत विविध योजनांपासून वंचित … Read more

शासनाच्या योजना घराघरात पोहोचवा -केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

WhatsApp Image 2023 12 16 at 8.16.07 PM 1 YX0iry jpeg शासनाच्या योजना घराघरात पोहोचवा -केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

छत्रपती संभाजीनगर दि १६: विकसित भारत संकल्प यात्रा २६ जानेवारी २०२४ पर्यंत देशाच्या सर्व भागात जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरासह जिल्हाभरात विकसित भारत संकल्प यात्रा’च्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना घराघरात पोहोचवा, असे आवाहन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी केले. इटावा (ता. गंगापूर) येथे विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. कराड  बोलत होते. … Read more

लोककल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

3 1 51Fshn jpeg लोककल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दूरदृश्यप्रणालीद्वारे लाभार्थींशी थेट संवाद  चिखली येथे विकसित भारत संकल्प यात्रेस लाभार्थी, ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ घेण्याचे आवाहन  जालना, दि. १६ (जिमाका) : केंद्र सरकार हे अनेक लोककल्याणकारी योजना सर्वसामान्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडविण्याच्या उद्देशाने प्रभावीपणे राबवित आहे.  ज्या गरजू लाभार्थींना अद्याप या योजनांचा लाभ मिळाला नाही, … Read more

‘शासन आपल्या दारी’अभियानासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी उत्कृष्ट योगदान द्यावे-  पालकमंत्री उदय सामंत

GBOsObNbQAAqNRF b0iUTb jpeg ‘शासन आपल्या दारी’अभियानासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी उत्कृष्ट योगदान द्यावे-  पालकमंत्री उदय सामंत

★रायगड येथे ५ जानेवारी २०२४ रोजी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन ★शासकीय योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी कार्यक्रमस्थळी शासनाच्या विविध विभागांचे दालन उभारणार रायगड,दि. १६ (जिमाका): खेड्यापाड्यातील जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचाव्यात यासाठी शासनातर्फे सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. लाभार्थ्यांना पात्रतेनुसार शासकीय योजनांचे लाभ मिळून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने ‘शासन आपल्या दारी’ … Read more

धेरंड-शहापूर येथील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यासाठी प्रयत्नशील-पालकमंत्री उदय सामंत

5 scaled M9hpKn jpeg धेरंड-शहापूर येथील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यासाठी प्रयत्नशील-पालकमंत्री उदय सामंत

रायगड,दि. १६(जिमाका):अलिबाग तालुक्यातील धेरंड-शहापूर येथील एमआयडीसीच्या प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहीत करण्यात येणार आहेत, त्यांना वाढीव मोबदला देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित धेरंड-शहापूर भूसंपादनाबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र दळवी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदिप कांबळे, … Read more

पुस्तक महोत्सवाने सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची मान उंचावली- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

Pne Photo Pustak Mahotsav Programme dt.16 Dec 1 4giCTB jpeg पुस्तक महोत्सवाने सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची मान उंचावली- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे दि. १६: विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय पुस्तक न्यास तर्फे आणि महाराष्ट्र शासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. पुस्तक महोत्सवाच्या आयोजनाने सांस्कृतिक, शैक्षणिक राजधानी म्हणून पुण्याची मान … Read more

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे नागरिकांशी साधला संवाद

Pne Photo Karvenagar Programme dt.16 Dec 4 nveitT jpeg प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे नागरिकांशी साधला संवाद

पुणे दि.१६: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून देशातील नागरिकांशी  संवाद साधला.  राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कर्वेनगर चौक येथे उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमाला खासदार प्रकाश जावडेकर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त  विक्रम कुमार, उपायुक्त नितीन उदास आदी उपस्थित होते. मंत्री श्री.पाटील … Read more

भारताच्या विकास प्रक्रियेत ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अत्यंत महत्वाची ठरेल -केंद्रीय अर्थ राज्य मंत्री पंकज चौधरी

Pne Photo Ranjangav Vikasit Bharat Programme dt.16 Dec 1 F1kVXZ jpeg भारताच्या विकास प्रक्रियेत ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अत्यंत महत्वाची ठरेल -केंद्रीय अर्थ राज्य मंत्री पंकज चौधरी

पुणे, दि. १६ : प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘विकसित भारत संकल्प यात्रा’  भारताच्या विकास प्रक्रियेत सर्वसामान्य लोकांना सहभागी करून घेण्यासाठी अत्यंत महत्वाची ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्य मंत्री पंकज चौधरी यांनी  केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील विकसित भारत यात्रेला दूरदृष्यप्रणालीद्वारे संबोधित करून अनेक लाभार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे … Read more

लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठात पायाभूत सोई सुविधा उपलब्ध करून देणार –  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

DSC 0059 W0CQID jpeg लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठात पायाभूत सोई सुविधा उपलब्ध करून देणार –  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. १६: लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या विकासासाठी २५० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून, त्याला पूर्वीच मान्यताही दिली आहे. त्यामुळे भविष्यात या विद्यापीठात पायाभूत सोयी सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी सांगितले. लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संमेलनात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. मंचावर एलआयटी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. … Read more

नागपूर वेगाने वाढणारे ‘बिझनेस सेंटर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

INFOSYS 10 z7laJj jpeg नागपूर वेगाने वाढणारे ‘बिझनेस सेंटर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२३० कोटीची गुंतवणूक, ३ हजार रोजगार नागपूर, दि.१६ : मिहान नागपूरचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. येथे उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्याने उद्योजकांचे पसंतीचे ठिकाण ठरले आहे. इन्फोसिससारख्या जागतिक किर्तीच्या अनेक कंपन्या येथे उभ्या राहात आहेत. त्यामुळे नागपूर हे वेगाने वाढणारे ‘बिझनेस सेंटर’ असून शहराची हळूहळू आयटी हबच्या दिशेने वाटचाल सुरु आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र … Read more

पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या उद्दिष्टपूर्तीचे महाराष्ट्र प्रवेशद्वार ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

5 E0A49FE0A58DE0A4B0E0A4BFE0A4B2E0A4BFE0A4AFE0A4A8 E0A4A1E0A589E0A4B2E0A4B0 E0A487E0A495E0A589E0A4A8E0A589E0A4AEE0A580 1 5ptInC jpeg पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या उद्दिष्टपूर्तीचे महाराष्ट्र प्रवेशद्वार ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. १६ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन २०३० पर्यंत देशाच्या ५ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या उद्दिष्टपूर्तीचे लक्ष्य ठेवले आहे. हे उद्दिष्ट प्रत्यक्षात आणण्यात महाराष्ट्राचा मोलाचा वाटा राहणार असून या आर्थिक सामर्थ्याचे महाराष्ट्र हे प्रवेशद्वार ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. मिहानमधील भारतीय व्यवस्थापन संस्थेतर्फे झिरो माईल संवाद या कार्यक्रमाचे … Read more

सनातन धर्मात मानवतेपुढील सर्व प्रश्नांचे निराकरण करण्याची क्षमता  – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि.१६: व्यक्तिगत, सामाजिक व आंतरराष्ट्रीय स्तरावर आज अशांती आहे. परंतु, मानवतेपुढील सर्व समस्यांचे निराकरण सनातन धर्माच्या ‘वसुधैव कुटुंबकम’ या  व्यापक शिकवणीत आहे. सनातन धर्मातील या शिकवणीचे शास्त्रशुद्ध विवेचन करुन ते युवापिढीला सांगण्याचे काम अमेरिकन लेखक आनंद मॅथ्यूज शोकी करीत असून ते कार्य महत्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. अमेरिकन … Read more