दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात अंदाजे ५९.६३ टक्के मतदान

मुंबई, दि. २६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडले असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५९.६३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे : बुलढाणा –  ५८.४५ टक्के अकोला – ५८.०९ टक्के अमरावती – ६०.७४ टक्के … Read more

चौथा टप्पा : उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर ३६९ अर्ज वैध

मुंबई, दि. २६ : राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे २०२४ रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ४४७ उमेदवारांचे ६१८ अर्ज दाखल झाले होते. आज या अर्जांची छाननी केल्यानंतर एकूण ३६९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत … Read more

नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत

नांदेड दि. २६ : लोकसभा मतदानादरम्यान आज रामतीर्थ येथे झालेल्या ईव्हीएम तोडफोडीनंतर या ठिकाणच्या व्हीव्हीपॅट व बॅलेट युनिट बदलण्यात आले. इव्हीएम फोडण्याच्या प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत झाले, अशी माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. आज निवडणूक मतदान सुरू असताना देगलूर विधानसभा क्षेत्रातील बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे एका मतदाराने ईव्हीएम मशीनची तोडफोड केल्याची घटना घडली. या घटनेमध्ये … Read more

मतदानाबाबत हाजुरी येथील दर्ग्यात जनजागृती

WhatsApp Image 2024 04 26 at 7.26.22 PM 1 mwnvc7 मतदानाबाबत हाजुरी येथील दर्ग्यात जनजागृती

ठाणे, दि. २६ (जिमाका) : हाजुरी येथील दर्गात मुस्लीम बांधवांच्या नमाज पठणानंतर स्वीप पथकाद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. येत्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले. मतदानाचा टक्का वाढावा व मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून दिनांक 20 मे रोजी सर्वांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. … Read more

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षाची केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) यांच्याकडून पाहणी

मुंबई, दि. २६ : मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रणासाठी स्थापित प्रसारमाध्यम कक्ष व आदर्श आचारसंहिता तक्रार निवारण नियंत्रण कक्षास केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) रविंदर सिंधू, डॉ. मुकेश जैन यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव  यांनी माध्यम कक्ष व आदर्श आचारसंहिता तक्रार निवारण नियंत्रण कक्षाच्या कामकाजाविषयी माहिती दिली. श्री. यादव … Read more

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघांचा केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) यांच्याकडून आढावा

मुंबई, दि. २६  : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक–२०२४ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील ’३०-दक्षिण मध्य मुंबई’ लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) रविंदर सिंधू व ’३१-दक्षिण मुंबई’ लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) डॉ. मुकेश जैन यांनी आज लोकसभा मतदारसंघांच्या कामकाजाचा आढावा घेतला. मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे ’३०-दक्षिण मध्य मुंबई’ लोकसभा मतदारसंघाची आढावा … Read more

२९-मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी सूरज कुमार गुप्ता यांची केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून नियुक्ती

मुंबई, दि. 26 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 29- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी खर्चविषयक केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून भारतीय राजस्व सेवेचे अधिकारी सुरजकुमार गुप्ता (आयआरएस) यांची नियुक्ती भारत निवडणूक आयोगाने केली आहे. केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) श्री. गुप्ता यांचे  कार्यालय हे  29- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, पाचवा मजला, प्रशासकीय … Read more

‘एनजीएसपी’ पोर्टलवर घेतली जातेय नागरिकांच्या कॉल्सची तत्काळ दखल

मुंबई, दि. 26 : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने नागरिकांना हवी असलेली माहिती मिळविणे आणि तक्रारी नोंदविण्यासाठी नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टल (NGSP) कार्यान्वित केले आहे. या पोर्टलवर आलेल्या कॉल्सना सकारात्मक प्रतिसाद यासाठी नियुक्त पथकाकडून देण्यात येत आहे. निवडणूक ओळखपत्र, मतदार केंद्र, … Read more

२८-मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

मुंबई, दि. २६ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २८-मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात आजपासून अर्ज स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात झाली. पहिल्या दिवशी दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केला असल्याची माहिती २८-मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली. आज उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे अशी : 1 ) मिहीर चंद्रकांत कोटेचा  (भारतीय जनता पार्टी, एकूण तीन अर्ज), … Read more

महाराष्ट्र दिनी १ मे रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यात भव्य सायकल रॅलीचे आयोजन; रॅलीत सहभागी होण्यासाठी त्वरीत नोंदणी करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 26 : ‘उत्सव निवडणूकीचा, अभिमान देशाचा’ या राष्ट्रीय महोत्सवात आपण सर्वांनी 20 मे 2024 रोजी मतदान करण्यासाठी उर्त्स्फुतपणे सहभागी होणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासन यंत्रणेमार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी 1 मे 2024 रोजी महाराष्ट्र दिनी मुंबई उपनगर जिल्ह्याधिकारी कार्यालय, चेतना कॉलेज जवळ  सकाळी 6.30 वाजता भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील … Read more

दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात सायंकाळी ५ पर्यंत ५३.५१ टक्के मतदान

मुंबई, दि. २६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सुरु झाले आहे. ८ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.५१ टक्के मतदान झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :- वर्धा – ५६.६६ टक्के अकोला – ५२.४९  टक्के अमरावती – ५४.५० टक्के बुलढाणा –  … Read more

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध

मुंबई, दि. २६ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ व ‘३१- मुंबई दक्षिण’ या दोन्ही मतदारसंघांमध्ये दि. २० मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. आज शुक्रवार दि. २६ एप्रिल २०२४ रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाली असून दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी आजपासून नामनिर्देशन पत्रे सादर करण्यास … Read more

दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत ४३.०१ टक्के मतदान

मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४३.०१ टक्के मतदान झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे वर्धा – ४५.९५ टक्के, अकोला -४२.६९ टक्के, अमरावती – ४३.७६ टक्के, बुलढाणा –  … Read more

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात दुपारी १  वाजेपर्यंत ३१.७७ टक्के मतदान

मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.७७ टक्के मतदान झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे : वर्धा – ३२.३२ टक्के अकोला -३२.२५ टक्के अमरावती – ३१.४०टक्के बुलढाणा –  … Read more

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.८३ टक्के मतदान

मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजल्यापासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदारसंघात सकाळी  ११ वाजेपर्यंत सरासरी १८.८३ टक्के मतदान झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे : वर्धा – १८.३५ टक्के अकोला -१७.३७ टक्के अमरावती – १७.७३ टक्के बुलढाणा –  १७.९२ टक्के हिंगोली … Read more