२४ कल्याण लोकसभा मतदारसंघातील केंद्रीय निरीक्षकांना भेटण्याच्या वेळा जाहीर

 ठाणे, दि.06 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने 24 कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निरीक्षक, खर्च निरीक्षक व पोलीस निरीक्षकांची नियुक्ती केली असून हे यातीनही निरीक्षकांना भेटण्याची वेळ व स्थळ जाहीर करण्यात आले आहे. 24 कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निरीक्षक म्हणून मनोज जैन (आयएएस), खर्च निरीक्षक म्हणून श्री. नकुल अग्रवाल (आयआरएस) आणि पोलीस निरीक्षक म्हणून कु. इलाक्किया करुणागरन (आयपीएस) यांची भारत निवडणूक … Read more

केंद्रीय संचार ब्युरोच्या तीन दिवसीय मतदार जनजागृती चित्रप्रदर्शनास प्रारंभ

छत्रपती संभाजीनगर, दि.६ (जिमाका):- केंद्रीय संचार ब्युरोमार्फत आयोजित चित्रप्रदर्शन पाहून मतदारांच्या मनात मतदानाची प्रेरणा नक्कीच जागेल आणि ते मतदानासाठी प्रेरीत होतील,असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे व्यक्त केला. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत केंद्रीय संचार ब्यूरो, छत्रपती संभाजीनगर द्वारा जिल्हा प्रशासन, जिल्हा माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर व दक्षिण … Read more

‘सारथी’चे २० विद्यार्थी ‘युपीएससी’च्या अंतिम गुणवत्ता यादीत झळकले

अमरावती, दि. 04 : नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षा २०२३ चा अंतिम निकाल जाहीर झाला. त्यात सारथी, पुणे मार्फत मुलाखतीसाठी प्रायोजित ४५ विद्यार्थ्यांपैकी २० विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. ज्यात ४ विद्यार्थिनींचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातून ०६, नाशिक जिल्ह्यातून ०५, अहमदनगर जिल्ह्यातून २ तसेच कोल्हापूर बुलढाणा, जळगाव, अकोला, वाशिम, हिंगोली … Read more

सर्वांच्या सहकार्यामुळेच चंद्रपूरची ‘स्वीप’ मोहीम प्रभावी – जिल्हाधिकारी विनय गौडा

E0A4AAE0A4BEE0A4B0E0A4BFE0A4A4E0A58BE0A4B7E0A4BFE0A495 E0A4B5E0A4BFE0A4A4E0A4B0E0A4A3 1 1024x507 Te2Mci सर्वांच्या सहकार्यामुळेच चंद्रपूरची ‘स्वीप’ मोहीम प्रभावी – जिल्हाधिकारी विनय गौडा

चंद्रपूर, दि. 6 : नुकत्याच पार पडलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स आणि मिम्स् स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला नागरिकांनी दिलेला उत्स्फुर्त प्रतिसाद, स्वीप टीमची विशेष मेहनत, ‘थिमॅटिक’ मतदान केंद्रासाठी जिल्ह्यातील उद्योजकांनी घेतलेला पुढाकार या सर्व बाबींमुळेच चंद्रपूर जिल्ह्याची मतदार जनजागृतीची ‘स्वीप’ मोहीम प्रभावी ठरली आणि मतदानाची टक्केवारी … Read more

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांची मुलाखत

मुंबई, दि. ६ : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने धाराशिव जिल्हा प्रशासनाच्या तयारीविषयी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांची  मुलाखत घेण्यात आली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात सोमवार ६ मे रोजी  ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या फेसबुक आणि यू ट्युब या समाज माध्यमाद्वारे पाहता येणार आहे. धाराशिवचे जिल्हा माहिती … Read more

‘व्यवस्थापन लेखांकन दिना’निमित्त राज्यपालांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन

Maharashtra Governor Ramesh Basis inaugurated Seminar on Management Accounting 4 1024x585 z4pUJd ‘व्यवस्थापन लेखांकन दिना’निमित्त राज्यपालांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन

मुंबई, दि. ६ : देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासात व्यवस्थापन लेखापालांचे योगदान लक्षणीय आहे. तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट गाठताना, व्यवसाय सुलभता वाढविण्याच्या कार्यात व्यवस्थापन लेखापालांची भूमिका महत्वपूर्ण असेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन लेखांकन दिनाचे औचित्य साधून व्यवस्थापन लेखांकन व्यवसायाचे नियमन करणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICMAI) या राष्ट्रीय संस्थेतर्फे … Read more

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचा खर्च नीटपणे तपासून घ्यावा – केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) सुरजकुमार गुप्ता

मुंबई उपनगर, दि. 6 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 मध्ये उमेदवारांचा निवडणुकीचा खर्च भारत निवडणूक आयोगाच्या नियम व अटींप्रमाणेच झाला पाहिजे, असे निर्देश केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च), सुरजकुमार गुप्ता यांनी दिले आहेत. लोकसभेच्या मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघाकरिता लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून श्री. गुप्ता यांची नियुक्ती झाली असून ते 25 एप्रिल 2024 रोजी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई उत्तर-मध्य अंतर्गत येत असलेल्या विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला … Read more

निवडणूक पोलिस निरीक्षक गौरव शर्मा यांनी केली सुरक्षा कक्षाची पाहणी

E0A4B8E0A581E0A4B0E0A495E0A58DE0A4B7E0A4BE E0A495E0A495E0A58DE0A4B7E0A4BEE0A49AE0A580 E0A4AAE0A4BEE0A4B9E0A4A3E0A580 E0A5A8 1024x709 lnaGiv निवडणूक पोलिस निरीक्षक गौरव शर्मा यांनी केली सुरक्षा कक्षाची पाहणी

मुंबई उपनगर, दि. 6 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उत्तर आणि मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघासाठीचे पोलिस निरीक्षक गौरव शर्मा यांनी मतदारसंघातील सुरक्षा कक्षाची पाहणी केली. श्री. शर्मा हे भारतीय पोलिस सेवेतील वरीष्ठ अधिकारी असून ते अतिरिक्त पोलिस आयुक्त या पदावर कार्यरत आहेत. भारत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निर्देशांनुसार पोलिस निरीक्षक श्री. शर्मा यांनी सुरक्षा कक्षामधील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या … Read more

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक तीन वेळेस करणार उमेदवारांच्या खर्चाची तपासणी

मुंबई उपनगर, दि.०६: लोकसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ करीता मुंबई उत्तर पश्चिम  मतदारसंघातील खर्च निरीक्षक हे उमेदवारांच्या प्रचार कालावधीत तीन वेळेस उमेदवारांच्या खर्चाच्या नोंद वहीची तपासणी करणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सूर्यवंशी यांनी म्हटले आहे की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता लोकसभा मतदारसंघात उमेदवाराने अर्ज दाखल … Read more

मतदान जनजागृती व मतदान केंद्रावर देण्यात येत असलेल्या सुविधा विषयी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची मुलाखत

प्रश्न :  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदान जनजागृती व मतदान केंद्रावर जिल्हा प्रशासनाकडून कशा पद्धतीने नियोजन सुरू आहे. जिल्हाधिकारी : 42 सोलापूर लोकसभा मतदारसंघ व 43 माढा मतदारसंघांमध्ये एकूण 36 लाख 56 हजार 833 मतदार आहेत. यामध्ये 18 लाख 90 हजार 572 पुरुष व 17 लाख 14 हजार 976 महिला आहेत आणि  285 … Read more

निवडणूक प्रक्रियेच्या पाहणीसाठी विदेशी प्रतिनिधी मंडळाचे अलिबाग येथे झाले आगमन

WhatsApp Image 2024 05 06 at 1.07.01 PM ALD4uy निवडणूक प्रक्रियेच्या पाहणीसाठी विदेशी प्रतिनिधी मंडळाचे अलिबाग येथे झाले आगमन

भारतीय पारंपरिक पद्धतीने औक्षण, फेटा आणि हार घालून स्वागत रायगड जिमाका दि.6- भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी आइव्हीपी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याअंतर्गत विदेशी प्रतिनिधीचे मंडळ निवडणूक प्रक्रियेची पाहणी करण्याकरिता रायगड जिल्ह्यातील 32 रायगड लोकसभा मतदार संघात आगमन झाले आहे. या प्रतिनिधी मंडळाने आज अलिबाग विधानसभा मतदारसंघातील … Read more

सातारा जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी-कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती 

सातारा, दि. ०५ : लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी काल दि. ०४ मे २०२४ हा दिवस मतदार गृहभेट दिवस म्हणून सातारा स्वीप कक्षाकडून राबविण्यात आला. आजच्या दिवशी जिल्ह‌्यामध्ये मा.याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा नोडल अधिकारी स्वीप कार्यक्रम, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ यांचे निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांचा व्यापक जनसंपर्क पाहता विस्तारीत प्रशासकीय यंत्रणा असल्याने … Read more

जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त मतदार जनजागृतीसाठी प्रदर्शन

WhatsApp Image 2024 05 05 at 05.15.18 1024x770 EmYvy7 जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त मतदार जनजागृतीसाठी प्रदर्शन

बीड, दि.5: (जीमाका) जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त बीड जिल्ह्याचे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार सुहास पालीमकर यांनी मतदार जनजागृतीसाठी व्यंगचित्र प्रदर्शनाचे दालन उभारले. या त्यांच्या उपक्रमास जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार सुहास पालीमकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, चमन गार्डन येथील आठवडी बाजारपेठेत आज जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त स्वखर्चाने मतदार जनजागृतीसाठीचे व्यंगचित्र … Read more

बीड लोकसभा मतदारसंघात ११ दिव्यांग तर २२ युवा मतदान केंद्र

WhatsApp Image 2024 05 05 at 06.20.26 729x1024 vfCSok बीड लोकसभा मतदारसंघात ११ दिव्यांग तर २२ युवा मतदान केंद्र

बीड, दि.5 (जिमाका) बीड लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा निहाय एकूण 2355 मतदान केंद्र असणार आहेत. यापैकी 11 मतदान केंद्रांवर दिव्यांग तर 22 मतदान केंद्रांवर युवा मतदान अधिकारी कर्मचारी असणार आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने मतदानाच्या प्रक्रियेला अधिक सुरळीत आणि व्यापक करण्यासाठी काही नाविन्यपूर्ण उपक्रम आखलेल्या आहेत. या अंतर्गत तरुण मतदारांनी मतदान प्रक्रियेचा भाग व्हावा यासाठी युवा … Read more

विदेशी प्रतिनिधी मंडळ रायगड जिल्हा निवडणूक प्रक्रीयेची पाहणी करणार

रायगड दि. 5 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन सस्था (EMBs) यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी international Election Visitors Programme (IEVP) कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याअंतर्गत विदेशी प्रतिनिधी मंडळ निवडणूक प्रक्रीयेची पाहणी करण्याकरीता दिनांक ६ ते ८ मे, २०२४ या कालावधीत रायगड जिल्हा भेट देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी … Read more