१३ मे रोजी मतदान करायला घराबाहेर पडा

3 1024x768 XMdZN7 १३ मे रोजी मतदान करायला घराबाहेर पडा

बीड दि.28: (जिमाका) सोमवार दिनांक 13 मे रोजी  बीड लोकसभा मतदारसंघात मतदान असून मतदान करण्यासाठी मतदार नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे कळकळीचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी मतदान जनजागृतीसाठी आयोजित सायकल रॅलीच्या समापन कार्यक्रमात केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथून मतदारांमध्ये मतदानाचा जागर करण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत … Read more

आम्ही मत देऊ शकत नाही पण तुम्ही द्या!

E0A4AEE0A4B9E0A4BEE0A4B0E0A4BEE0A4B7E0A58DE0A49FE0A58DE0A4B0 E0A4B5E0A4BFE0A4A6E0A58DE0A4AFE0A4BEE0A4B2E0A4AF 1 1024x1024 8kwg3L आम्ही मत देऊ शकत नाही पण तुम्ही द्या!

ठाणे, दि. 28 (जिमाका) – सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मतदार जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत (स्वीप) ठाणे शहरात 25 ठाणे-लोकसभा मतदार संघांतर्गत 148 -ठाणे विधानसभा मतदार संघाकडून महाराष्ट्र विद्यालय,चरई येथे मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला शिक्षकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थीवर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.     सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांच्या व शालेय  … Read more

२६- मुंबई उत्तर मतदासंघांकरीता नेहा चौधरी खर्च निवडणूक निरीक्षक

मुंबई उपनगर, दि. २८ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २६- मुंबई उत्तर मतदासंघांकरीता भारतीय राजस्व सेवेच्या अधिकारी नेहा चौधरी यांची खर्च विभागाच्या निवडणूक निरीक्षक म्हणून भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे. श्रीमती चौधरी यांच्याकडे विधानसभा मतदारसंघ 152 बोरिवली, 153 दहिसर आणि 154 … Read more

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मुंबई शहरात विशेष उपक्रम

मुंबई, दि. २८ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मुंबई शहर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विशेष उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील रुपारेल महाविद्यालयात `कॅपॅसिटी बिल्डिंग अँड लाईफ ट्रान्सफॉर्मेशन टेक्निक` या विशेष प्रशिक्षणाचे  आयोजन करण्यात आले होते.  प्रशिक्षण कार्यक्रमात १८१-माहिम विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक, क्षेत्रीय अधिकारी, मुंबई … Read more

‘आरोग्य सेवा क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता’ विषयावरील चर्चासत्र संपन्न

मुंबई, दि. २८ : कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानामुळे रोगनिदान व उपचार  यामध्ये क्रांतिकारी बदल होत आहेत.  विशेषतः विविध प्रकारचे कर्करोग, हृदयविकार, त्वचा रोग, दंत चिकित्सा या क्षेत्रात कृत्रिम प्रज्ञेमुळे परिवर्तनकारी बदल होत आहेत. मात्र या तंत्रज्ञानामुळे जनसामान्यांचा रोगनिदान व उपचाराचा खर्च कमी झाला पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस व बॉम्बे हॉस्पिटल यांनी … Read more

‘दिलखुलास’ या कार्यक्रमात सांगली जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांची उद्या मुलाखत

मुंबई: दि,28 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात लोकसभा निवडणूकीच्या पुर्वतयारी संदर्भात सांगली जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांची ‘कायदा व सुव्यवस्था ‘ या विषयावर उद्या सोमवार दि. २९ एप्रिल २०२४ रोजी, आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत मुलाखत प्रसारित होणार आहे. … Read more

खर्च विभाग निवडणूक निरीक्षकांनी घेतला मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचा आढावा

मुंबई, दि. 28 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाकरीता निवडणूक आयोगाने भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी राजकुमार चंदन आणि किरण के. छत्रपती यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा घेतला. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये ही माहिती दिली आहे. या बैठकीस … Read more

निवडणुका पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व घटकांनी समन्वयाने काम करावे – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

photo 3 2 1024x932 pbVYrD निवडणुका पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व घटकांनी समन्वयाने काम करावे – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

सिंधुदुर्ग, दि. २८ (जिमाका):  मतदारांना सुलभपणे तसेच शांततापूर्ण वातावरणात मतदान करता यावे यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, त्यादृष्टीने मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन त्याची माहिती मतदारांना द्यावी, आगामी लोकसभा निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने सर्व घटकांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक विषयक आढावा बैठकीत ते बोलत … Read more

२९- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी सूरज कुमार गुप्ता यांची केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून नियुक्ती

मुंबई दि. 28 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 29- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी खर्चविषयक केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून भारतीय राजस्व सेवेचे अधिकारी सुरजकुमार गुप्ता (आयआरएस) यांची नियुक्ती भारत निवडणूक आयोगाने केली आहे. केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) श्री. गुप्ता यांचे  कार्यालय हे  29- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, पाचवा मजला, प्रशासकीय इमारत, … Read more

निवडणूक निरीक्षक नेहा चौधरी यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षास भेट

E0A4AEE0A4BEE0A4A7E0A58DE0A4AFE0A4AE E0A495E0A495E0A58DE0A4B7 E0A4ADE0A587E0A49F E0A5A8E0A5AE E0A5AA E0A5A8E0A5A6E0A5A8E0A5AA 1024x633 22uGPT निवडणूक निरीक्षक नेहा चौधरी यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षास भेट

मुंबई, दि.२८: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या माध्यम व सनियंत्रण कक्षास २६मुंबई उत्तर मतदार संघासाठी नियुक्त खर्च विभागाच्या निवडणूक निरीक्षक नेहा चौधरी यांनी आज दुपारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हाधिकारी सुभाष काकडे, निवडणूक निरीक्षकांच्या संपर्क अधिकारी अनुपमा पाटील आदी उपस्थित होते. श्रीमती चौधरी या भारतीय राजस्व सेवेतील (आयआरएस) वरीष्ठ अधिकारी आहेत. 26- मुंबई उत्तर या लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या विधानसभेच्या 152- बोरीवली, 153- दहिसर आणि 154 मागाठणे मतदारसंघातील खर्चविषयक बाबींचे निरीक्षक म्हणून श्रीमती चौधरी काम पाहतील. निवडणूक निरीक्षक श्रीमती चौधरी यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाची  माहिती घेतली. जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर, अपर जिल्हाधिकारी श्री. गोहाड यांनी त्यांना माध्यम कक्षाच्या कामकाजाची सविस्तर  माहितीसह दैनंदिन सादर करण्यात येणाऱ्या अहवालांची माहिती दिली. … Read more

मुंबईकरांनो २० मे रोजी कुठेही जाऊ नका, मनापासून मतदान करा

E0A4AEE0A4A4E0A4A6E0A4BEE0A4A8 E0A49CE0A4A8E0A49CE0A4BEE0A497E0A583E0A4A4E0A580 E0A4B0E0A585E0A4B2E0A580 E0A5A8E0A5AE E0A5AA E0A5A8E0A5A6E0A5A8E0A5AA E0A5A7 1024x745 9y2uQh मुंबईकरांनो २० मे रोजी कुठेही जाऊ नका, मनापासून मतदान करा

मुंबई, दि.२८: लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघांसह मुंबई शहरातील सहाही मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या दिवशी मुंबईकरांनी मुंबईतच थांबून मनापासून मतदान करावे, असे आवाहन प्रसिद्ध गायक शान ऊर्फ शंतनु मुखर्जी यांनी केले.  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जनजागृतीसाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांचा एक भाग म्हणून 29- मुंबई उत्तर … Read more

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची जेईई परीक्षेमध्ये उत्तुंग भरारी

E0A4B5E0A4BFE0A4A6E0A58DE0A4AFE0A4BEE0A4B0E0A58DE0A4A5E0A58DE0A4AFE0A4BEE0A482E0A49AE0A587 E0A4B8E0A581E0A4AFE0A4B6 1 1024x885 vTb7bo आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची जेईई परीक्षेमध्ये उत्तुंग भरारी

चंद्रपूर, दि. 27 : एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय चंद्रपूर अंतर्गत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांकरीता मिशन शिखर उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना जेईई/नीट/सीईटी/एनडीए/सीएलएटी अशा विविधि परिक्षेचे मोफत मार्गदर्शन प्रशिक्षक / शिक्षक यांच्या मदतीने दिले जाते. दिनांक 24 एप्रिल 2024 ला जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये मिशन शिखर मधील 5 आदिवासी विद्यार्थी पात्र झाले आहेत.  यात सुनिता श्यामराव मेश्राम, रा. जिवती (69.14 टक्के),  … Read more

पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यानी केली मतदान जनजागृती; पथनाट्याने अक्कलकोटकरांचे वेधले लक्ष..  

सोलापूर, दि. 27 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकसाठी भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार मतदान जनजागृती, तसेच मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयाच्या  निवडणूक साक्षरता क्लबच्या विद्यार्थ्यानी अक्कलकोट शहरातील बस स्थानकासमोरील मुख्य चौकात मतदान का आवश्यक आहे, सुयोग्य उमेदवार कसा निवडावा याबाबी पथनाट्याच्या माध्यमातून लोकांसमोर मांडल्या. यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त … Read more

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४- दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात अंदाजे ६२.७१ टक्के मतदान

मुंबई, दि. २७ : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघांमध्ये काल मतदान पार पडले. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६२.७१ टक्के मतदान झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :   वर्धा : ६४.८५ % अकोला : ६१.७९ % अमरावती : ६३.६७ % बुलढाणा : ६२.०३ % हिंगोली … Read more

बोरिवलीमध्ये दिव्यांगांना मिळाली सुविधा ॲप आणि मतदान केंद्रांवरील सुविधांची माहिती

मुंबई उपनगर, दिनांक २७: 152 बोरीवली विधानसभा मतदार संघाच्यावतीने दिव्यांग मतदारांसाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 प्रवेश योग्य आणि सर्वसमावेशक होण्याच्या दृष्टीने त्यांना सक्षम ॲप तसेच मतदान केंद्रावर त्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या इतर सोयीसुविधांची माहिती देण्यात आली. या मेळाव्याला उपस्थित दिव्यांग मतदारांना सहायक निवडणुक निर्णय अधिकारी शिल्पा करमरकर यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्यास अतिरिक्त सहायक … Read more