‘दिलखुलास’ कार्यक्रमात धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांची मुलाखत

मुंबई, दि. ५: ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी धाराशिव जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांची  मुलाखत घेण्यात आली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मंगळवार ७ मे  २०२४  रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन ‘एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत ही मुलाखत प्रसारित … Read more

बीड लोकसभा मतदारसंघांतर्गत ६, १०, ११ आणि १२ मे रोजी पोस्टल मतदान करता येणार

बीड, दि. 5(जीमाका) : बीड लोकसभा मतदार संघाअंतर्गत येणारे 230 बीड विधानसभा मतदारसंघात दि.6, दि.10, दि.11 आणि दि.12 मे रोजी पोस्टल मतदान घेण्यात येणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बीड लोकसभा मतदारसंघात इतर दहा जिल्ह्यातील मतदार असलेले मतदारांना यामध्ये अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस यांचा समावेश असून ते दि.6, दि.10 आणि दि.11 मे रोजी तहसील कार्यालयातील, तहसीलदार यांच्या … Read more

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाकरिता उमेदवारांच्या खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर

मुंबई उपनगर, दि. 5 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 करिता 26- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील खर्च निरीक्षक हे उमेदवारांच्या प्रचार कालावधीत तीन वेळेस उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदवहीची तपासणी करणार असल्याची माहिती, निवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरे यांनी दिली. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. देवरे यांनी म्हटले आहे की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता लोकसभा मतदारसंघात उमेदवाराने अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांनी त्यांचा निवडणूक खर्च त्यांच्या … Read more

भारत निवडणूक आयोगाचे खर्चविषयक निवडणूक निरीक्षक मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात दाखल

मुंबई उपनगर, दि. 5 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024  करिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांसाठी भारत निवडणूक आयोगाने खर्च विषयक बाबींसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.  हे सर्व निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी आपापल्या लोकसभा मतदारसंघात खर्चविषयक बाबींचा आणि निवडणूक विषयक बाबींचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. खर्चविषयक बाबीसंदर्भात नागरिकांना संपर्क साधण्यासाठी या … Read more

मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे – केंद्रीय निवडणूक निरीक्षक परवीनकुमार थिंड

मुंबई उपनगर, दि. 5 : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. सर्वांचे लक्ष मुंबईकडे असते. लोकसभेची निवडणूक मुक्त व निर्भय होण्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून राज्यातील यंत्रणा सज्ज झाली आहे. यामध्ये वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांपासून ते मतदारदूतांपर्यंत सर्वांचीच भूमिका महत्वाची असणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी आपण … Read more

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी परवीनकुमार थिंड यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती

मुंबई उपनगर, दि. 5 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 29- मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी परवीनकुमार थिंड यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी ही माहिती दिली. निवडणूक निरीक्षक श्री. थिंड यांचा पत्ता असा : निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, २९-मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ, जिल्हाधिकारी कार्यालय, … Read more

निर्भय, नि:पक्ष वातावरणात निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा सज्ज – जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई उपनगर, दि. 5 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखत निर्भय आणि नि:पक्ष वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले. मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघांतील निवडणुकीच्या तयारीचा आढावा निवडणूक निरीक्षकांनी … Read more

ठाणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करावे – केंद्रीय निवडणूक निरीक्षक

ठाणे, दि.04 (जिमाका) : देशात लोकसभा निवडणुकांचा उत्सव सुरू असून पाचव्या टप्यातील मतदान प्रक्रिया येत्या 20 मे 2024 रोजी होत आहेत. ठाणे जिल्ह्यातील 23-भिवंडी, 24- कल्याण आणि 25 – ठाणे या लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करायचे असून ही निवडणूक प्रक्रिया ही शांततेत व नि:पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी आपल्यावर सोपविण्यात आलेले काम हे गांभीर्यपूर्वक … Read more

पाचव्या टप्प्यातील निवडणूक उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर ३०१ उमेदवारांचे अर्ज वैध

मुंबई, दि. ४ : राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे २०२४५ रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काल शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ३९७ उमेदवारांचे ५१२ अर्ज दाखल झाले होते. आज या अर्जांची छाननी केल्यानंतर एकूण ३०१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी … Read more

नाशिक लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक पी. एस. प्रद्युम्न यांची माध्यम कक्षास भेट

नाशिक, दिनांक 4 मे, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 21 नाशिक लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) पी. एस. प्रद्युम्न यांनी आज मीडिया कक्षास भेट देऊन समाधान व्यक्त केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तथा समन्वय अधिकारी … Read more

मतदारांसाठी मतदान केंद्रावर मिळणार किमान आवश्यक सुविधा

लातूर, दि. 04 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने येत्या 7 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 दरम्यान 41-लातूर (अ.जा.) लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. यावेळी  मतदारांना मतदान केंद्रावर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा … Read more

निवडणूक कालावधीत क्षेत्रीय अधिकारी यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार प्रदान

लातूर, दि. 04 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने राज्य शासनाच्या गृह विभागाने 5 एप्रिल 2024 च्या अधिसूचनेद्वारे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973च्या कलम 21 नुसार  लातूर लोकसभा मतदार संघातील सर्व क्षेत्रीय अधिकारी यांची विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार प्रदान केले आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कामासाठी सह्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे स्तरावर क्षेत्रीय अधिकारी (झोनल अधिकारी) यांची नियुक्ती … Read more

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदान केंद्र पातळीवर गृहभेटीवर देण्यात येतोय भर

dhule 1024x1024 Y6P5vf मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदान केंद्र पातळीवर गृहभेटीवर देण्यात येतोय भर

धुळे, दि. ४ मे, २०२४ (जिमाका वृत्तसेवा) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने ०२-धुळे लोकसभा मतदार संघामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता मतदान केंद्राच्या क्षेत्रात गृहभेटी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातंर्गत आज धुळे तालुक्यातील वडगाव येथे निवडणूक अधिकारी, कर्मचारी यांनी गृहभेट देऊन मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदानाची … Read more

मतदान केंद्रांवरील ‘पाळणाघरे’ सज्ज ठेवा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, दि.४ (जिमाका):- मतदान केंद्रांवर मतदानासाठी येणाऱ्या मातांची बालके सांभाळण्यासाठी मतदान केंद्रांवर पाळणाघरांची सुविधा उपलब्ध करावयाची आहे. ही जबाबदारी आरोग्य विभाग व महिला व बालकल्याण विभाग यांनी संयुक्तपणे पार पाडावयाची असून ही पाळणाघरे मतदानाच्या आदल्यादिवशी म्हणजे दि.१२ रोजी सज्ज असायला हवी, यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  दिलीप स्वामी यांनी आज … Read more

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारु जप्तीची मोठी कारवाई

जळगाव, दि. 4 (जिमाका) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने दि. 4 मे , 2024 रोजी एमआयडीसी भागातील के-10 सेक्टर मधील मंदार आयुर्वेदित प्रोडक्ट या कंपनीत मारलेल्या छाप्यात बनावट देशी दारुचा कारखाना जमीनदोस्त केला असुन 75 लक्ष 64 हजार 200 रुपये किमंतीचा मुद्दामाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी 05 आरोपींना … Read more