महिलांनी सक्रीयपणे मतदानात सहभाग नोंदवावा –जिल्हा निवडणूक अधिकारी

बीड.दि. ३ (जिमाका): महिलांनी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात  प्रगती साधली आहे. मतदारांमध्ये जनजागृतीचे कामही महिला उत्कृष्टपणे पार पाडत आहे. बीड लोकसभा मतदार संघातील निवडणुका सोमवार दिनांक 13 मे रोजी होणार आहेत. यामध्ये महिलांनी नि:संकोचपणे स्वविवेकाने आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांनी केले आहे.   बीड … Read more

खान्देशची भरीत रेसिपी व्हाया मतदान जागृती संदेश एकच… तुमच ‘मत अनमोल आहे’

WhatsApp Image 2024 05 03 at 2.56.24 PM EZkynw खान्देशची भरीत रेसिपी व्हाया मतदान जागृती संदेश एकच… तुमच ‘मत अनमोल आहे’

जळगाव दि.३ (जिमाका): प्रत्येक भागाच्या खाद्य संस्कृतीची म्हणून एक ओळख असते. तशी भरीत हे खान्देशच्या खाद्यसंस्कृतीची आद्य ओळख.. मग हीच खाद्य संस्कृती पोटातून बोटात आणण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी खान्देशच्या किचनमध्ये जाऊन मतदान जागृतीचे केलेले आवाहन हा लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरले.. आणि महिलांना मत देण्याच्या स्वातंत्र्याचा गौरव महिलांमध्ये मत केलंच पाहिजे हे बळ … Read more

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ सारख्या गैरप्रकारांवर कारवाईचे शासनाचे आदेश

मुंबई, दि. ३ : लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे / डिजिटल माध्यमांवरून प्रसारित करण्यात येत आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई शासनामार्फत करण्यात येणार आहे. यासंदर्भात पोलीस महासंचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. फोटोशॉप, मशीन लर्निंग (एमएल) किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) यांसारख्या विविध तंत्रांचा … Read more

संवाद यात्रेतून घुमला मतदार जागृतीचा जागर

sangli1 1024x576 vJbXMX संवाद यात्रेतून घुमला मतदार जागृतीचा जागर

सांगली दि. 2 (जि.मा.का.) : 44-सांगली लोकसभा मतदार संघात 7 मे 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी मतदान होत आहे. लोकसभा  निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी काढण्यात आलेल्या संवाद यात्रेत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून मतदान करण्याचे आवाहन केले. जिल्हा प्रशासनामार्फत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाचा एक … Read more

पद्म पुरस्कारांसाठी नामांकने मागविण्याचे आवाहन; १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

नवी दिल्ली, ०२ : केंद्रसरकार प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करत असते. त्यास अनुसरून यावर्षीही पद्म पुरस्कार 2025 साठी ऑनलाईन नामांकन/ शिफारशीबाबतचे आवाहन केले आहे. याबाबतची निवेदने स्वीकारण्याची सुरुवात 1 मे 2024 पासून सरकारने केली असून, पद्म पुरस्कारांसाठी नामांकने स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2024आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकन/ शिफारशी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (https://awards.gov.in) वर ऑनलाइन स्वीकारल्या जातील. … Read more

निवडणूक खर्च निरीक्षक यांना मोबाईल क्रमांकाचे प्रदान    

नाशिक, दिनांक 30 एप्रिल, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवार निवडणूक खर्च नियंत्रणासाठी 20-दिंडोरी व 21-नाशिक मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून भारतीय महसूल सेवेतील चार आयआरएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून ते जिल्ह्यात दाखल झाले आहेत. कामकाजाच्या सोयीनुसार निवडणूक खर्च निरीक्षक यांना मोबाईल क्रमांक प्रदान करण्यात आले असून  त्याचा तपशील खालील … Read more

गृह मतदानासाठी घरी आलेल्या मतदान पथकांचे दिव्यांग, ८५ वर्षांवरील मतदारांनी मानले आभार

E0A497E0A583E0A4B9 E0A4AEE0A4A4E0A4A6E0A4BEE0A4A8 E0A4B2E0A4BEE0A4A4E0A582E0A4B0 E0A4B6E0A4B9E0A4B0 3 77Os3E गृह मतदानासाठी घरी आलेल्या मतदान पथकांचे दिव्यांग, ८५ वर्षांवरील मतदारांनी मानले आभार

  दिव्यांग, अंथरुणाला खिळलेल्या मतदारांना बजाविता आला अधिकार मतदान करता आल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर झळकले हास्य लातूर, दि. 02 : मतदार यादीमध्ये नाव असलेल्या दिव्यांग आणि 85 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगाने गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार लातूर (अ.जा.) लोकसभा मतदारसंघातील गृह मतदानाला आज (दि. 2) पासून सुरुवात झाली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी उदगीर विधानसभा … Read more

खर्च निरीक्षक अंकुर गोयल यांची मीडिया कक्षाला भेट            

सिंधुदुर्गनगरी दि 02 (जिमाका) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता जिल्हा माहिती कार्यालयात कार्यन्वित करण्यात आलेल्या माध्यम कक्षास ४६ रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त खर्च विभागाचे निवडणूक निरीक्षक अंकुर गोयल यांनी आज दुपारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे, सहायक जिल्हाधिकारी विशाल खत्री, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, … Read more

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; ९.२२ लाख किंमतीचा मद्य साठा जप्त

मुंबई, दि. 2 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सायन पूर्व येथील धीरज आयर्न अँड स्टील लि, ऑफीस नं. जी २१, लोकमान्य पान बाजार असोशिएशन, सोमय्या हॉस्पिटल रोड, पूर्व द्रुतगती मार्गाजवळ परदेशात निर्मित केलेल्या व गोव्यातून आयात करुन मुंबईत आणलेल्या विविध ब्रँन्डच्या विदेशी मद्याचा साठा छापा टाकीत जप्त केला आहे. हा मुद्देमाल एकूण 9 लाख 22 हजार 196 रूपये किंमतीचा दारूबंदी गुन्ह्यातील आहे. या गुन्ह्यापोटी संतोष ऋषी घरबिडी (वय 42) या … Read more

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ; ठिकठिकाणी तपासणी

मुंबई, दि. 2 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये बंदोबस्त वाढविण्यात आला असून स्थिर व फिरत्या पथकांकडून मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी तपासणी सुरू आहे. तपासणी प्रक्रियेत प्रत्येकाने सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तपासणी प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन निवडणूक काळात नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, व्यावसायिकांनी कोणतेही साहित्य, रक्कमा सोबत ठेवताना त्यासंदर्भाचे योग्य दस्तऐवज सोबत ठेवावेत, असे आवाहन … Read more

उमेदवारांच्या खर्चावर असणार खर्च संनियंत्रण कक्षाची नजर – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई, दि. 2 : लोकसभा निवडणुकीत संबंधित उमेदवार अथवा राजकीय पक्ष करीत असलेल्या खर्चावर जिल्हास्तरीय खर्च सनियंत्रण कक्षाची नजर असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल अधिकाऱ्यांची खर्च सनियंत्रण विषयक बैठक झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तेजस समेळ व सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. मुंबई … Read more

लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होवून २० मे रोजी मुंबईतील नागरिकांनी आवर्जून मतदान करावे – मुख्य सचिव नितीन करीर यांचे आवाहन            

मुंबई, दि. २ : निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा गाभा असून त्यामध्ये लोकसहभाग आवश्यक आहे. त्यामुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या लोकशाहीच्या या उत्सवात नागरिकांनी सोमवार, २० मे २०२४ या दिवशी मतदान करून उत्साहपूर्वक सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे मुंबई शहर जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित मतदान … Read more

समाजमाध्यमांवरील प्रचारावर बारकाईने लक्ष ठेवावे – निवडणूक निरीक्षक परवीनकुमार थिंड            

मुंबई उपनगर, दि. 2 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवतानाच उमेदवारांकडून समाजमाध्यमांवर होणाऱ्या प्रचारावर बारकाईने लक्ष ठेवावे, अशा सूचना 29- मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी नियुक्त निरीक्षक परवीनकुमार थिंड यांनी दिले. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या माध्यम व सनियंत्रण कक्षास 29- मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी नियुक्त सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक श्री. थिंड यांनी आज दुपारी भेट देऊन पाहणी … Read more

परवीनकुमार थिंड यांची मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती, संपर्कासाठी भ्रमणध्वनी जाहीर

मुंबई उपनगर, दि. 2 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 29- मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी परवीनकुमार थिंड यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी ही माहिती दिली. निवडणूक निरीक्षक श्री. थिंड यांचा पत्ता : निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय,  29-मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ, जिल्हाधिकारी कार्यालय, पाचवा मजला, प्रशासकीय इमारत, सरकारी वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051. त्यांचा … Read more

सर्व मतदारांनी ‘मी मतदान करणार’ प्रतिज्ञा प्रमाणपत्र प्राप्त करा

बीड, दि.२ (जिमाका): ‘मी मतदान करणार’ असे प्रतिज्ञा प्रमाणपत्र प्राप्त करण्याची संधी सर्व मतदारांना प्राप्त करण्याची तयारी जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांनी केली आहे. याचा लाभ मतदारांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून 1) https://forms.gle/rCWv3M3Q1q8akfjn8 2) https://forms.gle/wAgnuMArTn1YFRxz7 अशा दोन लिंक उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दि. 28 एप्रिल रोजी ‘मी मतदान … Read more