कल्याण पूर्वेतील खासगी आस्थापना, हॉटेलमधील मतदारांमध्ये स्वीपने केली मतदान जागृती

ठाणे,दि.१५ (जिमाका): येत्यालोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी कल्याण पूर्व येथील दुकानदार, हॉटेलचालक तसेच खासगी आस्थापनांमध्ये स्वीपच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 24 कल्याण लोकसभा मतदार संघातील 142 कल्याण (पूर्व) विघानसभा मतदार संघाचे  सहा. निवडणूक निर्णय अधिकारी गोपीनाथ ठोंबरे आणि अति.सहा.निवडणूक निर्णय अधिकारी … Read more

१४२ कल्याण (पूर्व) विधानसभा मतदारसंघातील स्थिर सर्व्हेक्षण पथकाकडून ७ लाखांची रोख रक्कम जप्त

ठाणे, दि. १५ (जिमाका) :  24-कल्याण लोकसभा मतदारसंघातील 142 कल्याण (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या स्थिर सर्व्हेक्षण पथक (एसएसटी) पथकाने काल रुपये 7 लाख इतकी संशयास्पद रोख रक्कम जप्त केली. कल्याण (पूर्व) रेल्वे स्थानक येथून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची तपासणी करुन त्यांच्याकडे आढळलेल्या बेकायदेशीर वस्तू जप्त करुन पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी या पथकाची नेमणूक करण्यात आली होती. कल्याण (पूर्व) … Read more

दहिसर विधानसभा मतदारसंघामध्ये १३३३ अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण

मुंबई, दि. १५: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी च्या पाचव्या टप्प्याच्या तयारीच्या अनुषंगाने निवडणूक विषयक अधिकाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण सत्र सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी अतुल सावे यांच्या मार्गदर्शनाखाली 153- दहिसर विधानसभा मतदारसंघात पार पडले. या दोन दिवसीय प्रशिक्षणात 1333 अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. येत्या 20 मे रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार लोकसभा … Read more

मुंबई शहरातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात ५४३ ज्येष्ठ नागरिकांचे गृह मतदान

मुंबई, दि. १५ : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ मध्ये प्रथमच ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार यांना टपाली मतदान पथकामार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये गृह मतदानाला सुरुवात झाली असून आतापर्यंत ५४३ ज्येष्ठ नागरिक व ९ दिव्यांग मतदारांनी गृह मतदानाद्वारे आपल्या मतदानाचा … Read more

त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान डॉ. किथ रॉली यांचे स्वागत

मुंबई, दि. १५ : त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताकचे पंतप्रधान डॉ. किथ रॉली यांचे आज भारताच्या दौऱ्यावर मुंबईत आगमन झाले.  पंतप्रधान डॉ. रॉली व त्यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळातील सदस्यांचे ओबेरॉय हॉटेल येथे राजशिष्टाचार विभागाचे अवर सचिव मिलींद हरदास यांनी स्वागत केले. यावेळी पारंपरिक वेशभूषेत सांस्कृतिक  पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. पंतप्रधान डॉ. किथ रॉली यांच्यासमवेत आलेल्या शिष्टमंडळात … Read more

दिव्यांग मतदारांसाठी विनामूल्य वाहन व्यवस्था; मतदारसंघनिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती

मुंबई, दि. १५ : मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रत्येक मतदारसंघनिहाय मोफत प्रवासासाठी समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी या सेवेचा लाभ घेवून मतदानाचा … Read more

अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान करा – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर

मुंबई, दि. १५ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८- मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात २० मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदारसंघाच्या विक्रोळी येथील निवडणूक अधिकारी कार्यालयात अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी १४ मे पासून टपाली मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. १६ मे रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उर्वरित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान करता येणार आहे. … Read more

मुंबई उपनगर जिल्ह्यात ७४ लाख ४८ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

मुंबई, दि. १५: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात सोमवार 20 मे 2024 रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ यावेळेत मतदान होणार आहे. या मतदानाची सर्व  तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 74 लाख 48 हजार 383 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील, अशी माहिती निवडणूक शाखेने दिली आहे. मुंबई उपनगर … Read more

पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घेतला जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा

 सांगली दि.१४ (जिमाका) : टंचाई परिस्थिती उद्भवलेल्या भागातील जनतेला पिण्याचे पाणी  उपलब्ध करून देण्यास  प्राधान्य द्यावे, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी  जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती आढावा बैठकीत दिल्या. पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती संदर्भात आढावा बैठक झाली. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, … Read more

आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

WhatsApp Image 2024 05 14 at 6.28.03 PM 2 KSkVYB आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

Ø  जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवा Ø  मान्सून पूर्वतयारी आढावा अमरावती, दि. १४ : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात. बाधित गावांत तसेच दुर्गम गावांत तात्काळ मदत पोहोचण्याच्यादृष्टीने प्रभावी नियोजन करावे. त्यासाठी सर्व स्तरावरील संपर्क यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवून महसूल व संबंधित यंत्रणांनी नेहमी सतर्क राहावे, … Read more

ठाणे रेल्वे स्थानकावर राबविण्यात आलेल्या मतदार जनजागृतीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे,दि. १४ (जिमाका): लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग घ्यावा व मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान करुन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे अशी जनजागृती आज ठाणे रेल्वेस्थानकावरील प्रवासी मतदारांमध्ये करण्यात आली. २५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ सहा.निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज (१४ मे) ठाणे  रेल्वे स्टेशन परिसरात मतदार साक्षरता … Read more

ठाणे शहरात झालेल्या गृह मतदानास ८५ वर्षावरील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे,दि. १४ (जिमाका) : ठाणे जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात 20 मे 2024 रोजी  लोकसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी संपूर्ण ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून मतदानापासून एकही मतदार वंचित राहणार नाही याची खबरदारी देखील प्रशासनाने घेतली आहे. 85 वर्षांवरील जे नागरिक व दिव्यांग व्यक्ती मतदान केंद्रापर्यत पोहचू शकत नाही अशांसाठी आज 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात आयोजित … Read more

ब्रेल लिपीतील मतदार चिठ्ठीचे दिव्यांग मतदारांना घरोघरी वाटप

ठाणे,‍ दि. १४ (जिमाका) : लोकसभा निवडणुकीत सर्वच घटकातील नागरिकांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी आज 25 ठाणे लोकसभा मतदारसंघ अंतर्गत 148 विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांना ब्रेल लिपीतील मतदार माहिती  चिठ्ठीचे वाटप प्रत्यक्ष दिव्यांग मतदारांच्या निवासस्थानी जावून करण्यात आले. २५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत, १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली … Read more

मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांसाठी धावणार बस

मुंबई, दि. १४ : मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यादृष्टीने ‘एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये’ या संकल्पानुसार जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी मतदानासाठी विशेष वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विधानसभा मतदारसंघानिहाय ठरविलेल्या एका निश्चित मार्गावर बेस्टमार्फत व्हिलचेअर प्रवेश योग्य मोफत बस सुविधा उपलब्ध करून … Read more

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील खर्च सादर न करणाऱ्या दोन उमेदवारांना नोटीस

मुंबई, दि. १४ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने २७- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च नोंदवहीची खर्च निरीक्षकांसमोर 13 मे २०२४ रोजी द्वितीय तपासणी करण्यात आली. 21 उमेदवारांपैकी १९ उमेदवारांनी आपले खर्च सादर केले. दोन उमेदवारांनी तपासणीसाठी खर्च सादर केले नाहीत. तपासणीसाठी खर्च सादर केलेले नाहीत, असे मनोज श्रावण नायक, कपिल कांतिलाल … Read more