एसटी बसस्थानकांचा एमआयडीसीकडून होणार कायापालट

नागपूर, दि. १८:- राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी बस सेवेतील महत्त्वाचा घटक बसस्थानक. या बसस्थानकांचा कायापालट करण्यात एमआयडीसीने योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आज एसटी महामंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ( MIDC) यांच्या दरम्यान मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात … Read more

साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षांनी घेतली उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची भेट

नागपूर दि.18: अमळनेर, जि. जळगांव येथे होणाऱ्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष रवींद्र शोभणे आणि त्यांच्या पत्नी अरुणा शोभणे यांनी विधानभवनात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील उपस्थित होते. यादरम्यान उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी … Read more

मुलींच्या शिक्षणासह बालविवाह रोखण्यासाठी “लेक लाडकी योजना” प्रभावीपणे राबवा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

412389763 754063986747027 8581454419915082270 n 1 1024x768 yRKg6O jpeg मुलींच्या शिक्षणासह बालविवाह रोखण्यासाठी “लेक लाडकी योजना” प्रभावीपणे राबवा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

नांदेड (जिमाका) दि. 18 :- मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे या उद्देशाला साध्य करणारी “लेक लाडकी योजना” शासनाने आणली आहे. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींसाठी ही योजना महत्त्वपूर्ण म्हणून पाहिली जाते. 1 एप्रिल 2023 पूर्वी जन्माला आलेल्या दोन मुलीसाठी ही योजना अनुज्ञेय आहे. मुलीच्या जन्मानंतर 5 हजार, इयत्ता पहिलीत … Read more

विधिमंडळ सदस्यांनी संसदीय आयुधांचा वापर करीत विषय मांडावेत- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

YRT 9327 1140x815 rBz1ZW jpeg विधिमंडळ सदस्यांनी संसदीय आयुधांचा वापर करीत विषय मांडावेत- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर दि. 18 : विविध आयुधांचा वापर करत विधिमंडळ सदस्यांनी विधिमंडळात सामाजिक, सार्वजनिक हिताचे प्रश्न मांडावेत. प्रश्न मांडताना विशेष काळजी घ्यावी. योग्य वेळी योग्य विषय मांडल्यास त्या विषयाला उचित न्याय मिळवून देता येतो. यासाठी विधिमंडळ सदस्यांनी  विविध संसदीय आयुधांचा वापर करून विधानमंडळात प्रश्न मांडावेत, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ‘विविध संसदीय आयुधे‘ या विषयावर विधिमंडळ … Read more

न्या. संदीप शिंदे समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर

E0A4A8E0A58DE0A4AFE0A4BE dRXgTg jpeg न्या. संदीप शिंदे समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर

नागपूर, दि. 18 : राज्यातील मराठा- कुणबी, कुणबी -मराठा जातीच्या नोंदीसाठी आवश्यक पुराव्यांची तपासणी करणे व प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे ( निवृत्त) समितीने तयार केलेला अहवाल आज राज्य शासनास सादर करण्यात आला.  विधानभवनाच्या मंत्रिमंडळ कक्षात हा अहवाल न्या. शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च … Read more

नागपूर महानगर व जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 18 : नागपूर महानगर व जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारितील विविध प्रलंबित विषयांना कालमर्यादा निश्चित करून निकाली काढण्यात यावेत. सर्व प्रकल्प वेळेत पुर्णत्वास जावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. विधानसभेतील उपमुख्यमंत्र्यांच्या कक्षामध्ये यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावणकुळे, कृष्णा खोपडे, टेकचंद सावरकर, सागर मेघे, विकास … Read more

‘अवकाळी’मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप

Cm cheque2 1140x561 3mvlBS jpeg ‘अवकाळी’मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप

नागपूर दि. १८ : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटपास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. नोव्हेंबरमध्ये हा अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानातून दिलासा म्हणून बाधित शेतकऱ्यांना आज प्रतिनिधिक स्वरुपात धनादेश देण्यात आले. विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री … Read more

‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ महाराष्ट्राकडून दोन लाख मेट्रिकटन कांदा खरेदी करणार

logo 55sa3B jpeg ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ महाराष्ट्राकडून दोन लाख मेट्रिकटन कांदा खरेदी करणार

नवी दिल्ली, दि. १८ : एनसीसीएफ (NCCF) आणि ‘नाफेड’च्या (NAFED) माध्यमातून महाराष्ट्रातून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय, केंद्र सरकारने घेतला असल्याची माहिती, ‘एनसीसीएफ’ च्या व्यवस्थापकीय संचालिका अनिस जोसेफ चंद्रा यांनी नाशिकमध्ये दिली. देशातील ६५ ते ७० टक्के कांदा नाशिक जिल्ह्यातून खरेदी करणार असल्याचे श्रीमती चंद्रा यांनी सांगितले. नाशिकसह अहमदनगर, धुळे, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतून कांदा खरेदी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ‘एनसीसीएफ’ आणि नाफेडमार्फत अंदाजे … Read more

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

ESIC hospital Bibwewadi sa2iBO jpeg महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

नवी दिल्ली, 18: कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार असल्याची  माहिती, केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने दिली आहे. नवी दिल्ली येथे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या ‘ईएसआयसी’च्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील बिबवेवाडी (पुणे) येथे ईएसआयसी रुग्णालयातल्या खाटांची क्षमता शंभरवरून एकशे वीस करण्याच्या प्रस्तावालाही … Read more

विविध योजनांच्या माध्यमातून अल्पसंख्याकांचा आर्थिकस्तर उंचावणार – मंत्री अब्दुल सत्तार

DSC 4064 1024x557 uAnEmu jpeg विविध योजनांच्या माध्यमातून अल्पसंख्याकांचा आर्थिकस्तर उंचावणार – मंत्री अब्दुल सत्तार

शुभारंभावेळी सादर केलेल्या अर्जांवर तातडीने कारवाईचे निर्देश नागपूर, दि.18 : अल्पसंख्याक प्रवर्गातील नागरिकांचे अजूनही अनेक प्रश्न आहे. त्यातील मुसलमान समाजाची परिस्थिती बेताची आहे. या प्रवर्गाला इतर प्रवर्गाच्या बरोबरीने विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहे. विभागाची आर्थिक तरतूद देखील वाढविण्यात आली आहे. या माध्यमातून या प्रवर्गातील नागरिकांचा आर्थिकस्तर उंचावणार असल्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार … Read more

राज्यातील बळीराजाला दीड वर्षांत ४४ हजार २७८ कोटी रुपयांची विक्रमी मदत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

विधानसभा इतर कामकाज धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपये बोनस ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीपासून वंचित साडे सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नागपूर, दि. १८: दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिले आहे. गेल्या दीड वर्षांत आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून … Read more

राज्यातील बळीराजाला दीड वर्षांत ४४ हजार २७८ कोटी रुपयांची विक्रमी मदत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

विधानसभा इतर कामकाज धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपये बोनस ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीपासून वंचित साडे सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नागपूर, दि. १८: दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिले आहे. गेल्या दीड वर्षांत आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून … Read more

वैद्यकीय क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याची आवश्यकता- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Dcm Fadnavis3 1140x815 8XWvkM jpeg वैद्यकीय क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याची आवश्यकता- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. 18 : वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांनी पुढाकार घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विद्या शिक्षण प्रसारक मंडळांतर्गत लता मंगेशकर हॉस्पीटल परिसरातील भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पुतळ्याचे अनावरण, रणजीत देशमुख सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल विस्तारित इमारतीचे उद्घाटन, फिजिओथेरपी म्युझियम व रिसोर्स लर्निंग सेंटरचा शुभारंभ उपमुख्यमंत्र श्री फडणवीस यांच्या हस्ते आज … Read more

गडचिरोली जिल्हा क्रीडा संकुलाची विकास कामे गुणवत्तापूर्ण करावीत- क्रीडा मंत्री संजय बनसोडे

bansode krida1 1140x815 2JeFAh jpeg गडचिरोली जिल्हा क्रीडा संकुलाची विकास कामे गुणवत्तापूर्ण करावीत- क्रीडा मंत्री संजय बनसोडे

नागपूर दि. 18 :  गडचिरोली  जिल्हा क्रीडा संकुलाची गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार कामे करण्याच्या सूचना क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या. गडचिरोली जिल्हा क्रीडा संकुलात सुविधा निर्माण करणे आणि युएनडीपी अंतर्गत शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यासंदर्भात विधानभवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार अमित साटम, आमदार डॉ. देवराव होळी, क्रीडा व युवक कल्याण … Read more

वरोरा व भद्रावती तालुक्यातील विकसनशील प्रकल्पांना कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली  भेट

chandrapur krushi1 1051x570 RlZN92 jpeg वरोरा व भद्रावती तालुक्यातील विकसनशील प्रकल्पांना कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली  भेट

चंद्रपूर दि. 18 : वरोरा व भद्रावती तालुक्यातील मौजा कोंढाळा, एकार्जुना, चिनोरा व नंदोरी या शेतीविषयक विकसनशिल प्रकल्पांना कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या क्षेत्रीय दौऱ्यादरम्यान आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासमवेत, नागपूरचे संचालक (आत्मा) दशरथ तांबाळे, विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे, चंद्रपूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी … Read more