टपाली मतपत्रिकेद्वारे 1797 मतदार बजावणार घरांतून मतदानाचा हक्क

सांगली, दि. 30 (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 44-सांगली लोकसभा मतदार संघात 1797 मतदार घरांतून टपाली पद्धतीने मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा 44-सांगली मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये  भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षापेक्षा अधिक वय असणारे मतदार, 40 टक्के पेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेले मतदार आणि अत्यावश्यक सेवेतील (शासकीय) अधिकारी/कर्मचाऱ्यांना टपाली मतदान केंद्राव्दारे टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध … Read more

निवडणूक खर्च निरीक्षक यांना मोबाईल क्रमांकाचे प्रदान    

नाशिक, दिनांक 30 एप्रिल, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवार निवडणूक खर्च नियंत्रणासाठी 20-दिंडोरी व 21-नाशिक मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून भारतीय महसूल सेवेतील चार आयआरएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून ते जिल्ह्यात दाखल झाले आहेत. कामकाजाच्या सोयीनुसार निवडणूक खर्च निरीक्षक यांना मोबाईल क्रमांक प्रदान करण्यात आले असून  त्याचा तपशील … Read more

मतदारांच्या मदतीला निवडणूक आयोगाचे ‘ॲप्स’

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. सशक्त लोकशाहीसाठी निवडणूक प्रक्रिया महत्वाची आहे. निवडणुक प्रक्रियेमध्ये मतदार हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. मतदारांना निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यासाठी तसेच त्यांना विनासायास मतदान करता यावे यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारांच्या मदतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित विविध सोयी सुविधा व “ॲप्स” उपलब्ध करुन दिले आहेत. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार … Read more

देहविक्री व्यवसायातील महिला मतदारांचा शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प

मुंबई, दि. ३० : मुंबई शहर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई मधील कामाठीपुरा येथील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मतदान जनजागृतीसाठी आज विशेष मोहीम राबविण्यात आली. यावेळी या महिला मतदारांनी शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प केला. मतदान जनजागृतीच्या या कार्यक्रमास “स्वीप” … Read more

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ : दहा लाख रुपयांच्या मर्यादेत जप्त रक्कम प्रकरणात दाद मागण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठित

मुंबई, दि. 30 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रात विविध पथके नियुक्त करण्यात आले आहेत. या पथकांकडून तसेच पोलीस पथकांच्या कार्यवाही दरम्यान 10 लाख रुपयांच्या मर्यादेत जप्त करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये निर्णय घेण्यासाठी त्रिसदस्यीय रोख रक्कम सोडवणूक समिती (कॅश  रिलीज कमिटी) गठित करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक … Read more

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांचे कार्यक्रम

मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र राज्याच्या  65 व्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस हे छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर, मुंबई येथे आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात बुधवारी (दि. 1 मे) सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करणार आहेत. मुख्य शासकीय सोहळ्यानंतर राज्यपाल बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे क्रीडाभवन येथे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांचा जनतेला उद्देशून संदेश … Read more

आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्यावे – निवडणूक निरीक्षक अजीमूल हक

बीड दि. 30 (जिमाका): आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन बीड मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक अजीमूल हक यांनी मंगळवारी चिन्ह वाटपाच्या समयी राजकीय पक्षांना केले. राजकीय पक्षांची चिन्ह वाटपाची बैठक तसेच राजकीय पक्षांनी यापुढे घ्यावयाची काळजी या संदर्भातील सूचनांची माहिती देण्याकरिता जिल्हा निवडणूक अधिकारी दिपा मुधोळ मुंडे आणि निवडणूक निरीक्षक अजीमूल हक यांच्या … Read more

नागरिकांना संपर्क साधण्यासाठी निवडणूक निरीक्षकांचे भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर

मुंबई उपनगर, दि. 30 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 करीता मुंबई उपनगर जिल्हयातील चारही लोकसभा मतदार संघांसाठी भारत निवडणूक आयोगाने खर्च विषयक बाबींसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.  हे सर्व निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी आपापल्या लोकसभा मतदारसंघात खर्चविषयक बाबींचा आणि निवडणूक विषयक बाबींचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. खर्चविषयक बाबीसंदर्भात नागरिकांना संपर्क साधण्यासाठी या निवडणूक निरीक्षकांचे संपर्क … Read more

महाराष्ट्र दिनी राज्यातील शासकीय कार्यालयात एकाचवेळी ध्वजारोहण

मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र राज्याचा 65 वा स्थापना दिवस समारंभ 1 मे 2024 रोजी साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने राज्यभर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून मुंबई, विभागीय मुख्यालये, जिल्हा मुख्यालये, उपविभागीय मुख्यालये, तहसील मुख्यालये तसेच इतर ठिकाणी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ एकाचवेळी सकाळी 8 वाजता आयोजित करण्यात येईल, असे राजशिष्टाचार विभागाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. मुंबईत शिवाजी पार्क, दादर येथे होणाऱ्या प्रमुख शासकीय कार्यक्रमात राज्यपाल श्री. रमेश बैस हे उपस्थित … Read more

प्रत्येकाने मतदार दूत म्हणून काम करावे – जिल्हाधिकारी अभिनव गोयल

E0A4B5E0A58BE0A49F E0A495E0A4B0 E0A4A7E0A581E0A4B3E0A587E0A495E0A4B0 32 dYXStv प्रत्येकाने मतदार दूत म्हणून काम करावे – जिल्हाधिकारी अभिनव गोयल

धुळे, दि. ३० (जिमाका) : येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी प्रत्येकाने आपले कुटूंब, शेजारी, नातेवाईक यांना मतदान करण्यास प्रेरीत करुन मतदार दूत म्हणून काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी धुळेकरांना केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत ‘स्वीप’ अंतर्गत विविध उपक्रम … Read more

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात गृहभेट उपक्रम

मुंबई उपनगर, दि. 30 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे म्हणून मुंबई उपनगर जिल्ह्यात आता ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत गृहभेट उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यास मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मुंबई उपनगर जिल्हा जनगणनेनुसार देशातील सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्याची सध्याची लोकसंख्या 93.56 लाख असून जिल्ह्यात 87 गावांचा समावेश आहे. हीच बाब विचारात घेवून लोकशाही शासनव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आपले एक मत किती बहुमोल आहे, हे … Read more

‘लोकराज्य निवडणूक विशेषांक’ माहितीपूर्ण आणि संग्रहणीय – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

WhatsApp Image 2024 04 30 at 5.44.36 PM scaled 0jj1hi ‘लोकराज्य निवडणूक विशेषांक’ माहितीपूर्ण आणि संग्रहणीय – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

मुंबई, दि. 30 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केलेला ‘उत्सव निवडणूकीचा अभिमान देशाचा’ हा  लोकराज्यचा निवडणू्‌क विशेषांक माहितीपूर्ण आणि संग्रहणीय असल्याचे मत, प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी व्यक्त केले. राज्यात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात होत असून या संपूर्ण प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगामार्फत करण्यात येत असलेली तयारी, मतदारांच्या सोयीसाठीच्या विविध ॲपची माहिती, त्याचसोबत आचारसंहिता बाबतची  … Read more

लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांची ‘दिलखुलास’आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबई, दि. ३०  : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून लातूरच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांची ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ लातूर जिल्हा प्रशासन सज्ज’ या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत बुधवार दि. १ मे २०२४ आणि गुरुवार दि. २ मे २०२४  रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरुन तसेच न्यूज … Read more

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. ३० : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेटकर यांनी यावेळी पुष्पहार अर्पण केला. कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, सहायक कक्ष अधिकारी रवींद्र बच्छाव, नितीन राणे  आदींसह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. … Read more

चौथ्या टप्प्यात राज्यात २९८ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई, दि. 29 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील 11 मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात 369 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील 71 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 298 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. चौथ्या टप्प्यातील अंतिम निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या : नंदुरबार 11, … Read more