१०४ वर्षांच्या आजीबाईंनी बजावला गृह मतदानाचा हक्क

मुंबई दि. १३ :  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी 85 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे मतदार आणि दिव्यांग मतदारांना गृहमतदानाचा पर्याय देण्यात आला होता. मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26- मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघातील 153- दहिसर विधानसभा मतदारसंघात आज गृहमतदान पार पडले. आयुष्याची शंभरी पार केलेल्या 104 वर्ष वयाच्या श्रीमती लक्ष्मी राजपूत या आजीबाईंनी दहिसर पश्चिम येथे आज … Read more

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचेल मतदार चिठ्ठी

मुंबई दि. १३ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात समाविष्ट 27- मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात प्रत्येक मतदारापर्यंत मतदार चिठ्ठी पोहोचविण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. 19 मे 2024 पूर्वी सर्व मतदारांपर्यंत मतदार चिठ्ठी पोहोचविण्यात येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सुर्यवंशी यांनी दिली. लोकसभेच्या निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात चार मतदारसंघांचा समावेश आहे. त्यासाठी 20 मे … Read more

मुंबई शहर जिल्ह्यातील निवडणूक नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा

मुंबई, दि. १३ : मुंबई शहर जिल्ह्यातील ३०-मुंबई दक्षिण मध्य व ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात निवडणूक कामकाजासाठी कार्यरत भारत निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेले अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी (पोलीस व इतर) यांच्यासाठी १४ मे ते १६ मे, २०२४ या तीन दिवसांच्या कालावधीत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उपलब्ध करून दिली आहे. तसेच, … Read more

दिव्यांग, वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी सुविधा उपलब्ध

मुंबई, दि. १३ : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जाण्याकरिता सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा मिळविण्यासाठी आवश्यक असलेली मागणी सक्षम ॲपवर नोंदवावी, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे. ॲपवर नोंदणी केलेल्या दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांना … Read more

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात ३५ मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

मुंबई, दि. १३ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८ – मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदारसंघात आतापर्यंत २३०९ मतदारांनी टपाली पद्धतीने मतदान केले आहे. तसेच, ज्येष्ठ ३३ तर दिव्यांग २ मतदारांनी असे एकूण ३५ मतदारांनी गृहमतदान केले असल्याची माहिती, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी … Read more

खर्च नोंदवही तपासणीसाठी सादर न केल्यामुळे दोन उमेदवारांवर गुन्हे दाखल – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर

मुंबई, दि. १३ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च)  सुनील यादव (आयआरएस) हे तीन वेळेस 28 – मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदींची तपासणी करणार आहेत. मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्च नोंदवहीची प्रथम तपासणी 9 मे 2024 रोजी करण्यात आली. या तपासणीत नॅशनल पीपल्स पार्टीचे … Read more

११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान

मुंबई, दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे नंदुरबार –  ६०.६० टक्के जळगाव –  ५१.९८ टक्के रावेर – ५५.३६ टक्के जालना – ५८.८५ टक्के औरंगाबाद  – ५४.०२  … Read more

पाळणाघरांचा उपक्रम ठरला उपयुक्त…

E0A4AAE0A4BEE0A4B3E0A4A3E0A4BEE0A498E0A4B0 E0A4B8E0A581E0A4B5E0A4BFE0A4A7E0A4BE E0A5A8 1 u4mLWq पाळणाघरांचा उपक्रम ठरला उपयुक्त…

छत्रपती संभाजीनगर, दि.१३(जिमाका): लोकसभा निवडणूक २०२४ साठी मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रम राबविले. त्यात लक्षणीय आणि अभिनव उपक्रम ठरला तो मतदान केंद्रांवर पाळणाघरे स्थापित करण्याचा. हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. अनेक मातांनी आपलं कडेवरचं बाळ पाळणाघरात सांभाळायला देऊन आपले लोकशाहीप्रति कर्तव्य बजावले. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी’, … Read more

विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये असणार महिला, दिव्यांग आणि युवा संचलित मतदान केंद्र

मुंबई, दि. १३ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. या मतदानासाठी जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील 26 विधानसभा मतदारसंघात महिला, युवक आणि दिव्यांग कर्मचारी संचलित प्रत्येकी एक मतदान केंद्र असणार आहे. मतदान केंद्र उभारणीची सर्व तयारी आणि नियोजन पूर्ण करण्यात आले … Read more

११ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान

मुंबई, दि. १३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान झाले आहे.         चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे : नंदुरबार –  ४९.९१ टक्के जळगाव –   ४२.१५ टक्के रावेर –  ४५.२६ टक्के जालना – ४७.५१  टक्के … Read more

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान

मुंबई, दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळपासून मतदानाला सूरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे नंदुरबार – ३७.३३ टक्के जळगाव- ३१.७० टक्के रावेर – ३२.०२ टक्के जालना – ३४.४२ टक्के औरंगाबाद – ३२.३७ टक्के मावळ -२७.१४ टक्के … Read more

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १७.५१ टक्के मतदान

मुंबई, दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजतापासून सूरु झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १७.५१ टक्के मतदान झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे नंदुरबार – २२.१२ टक्के जळगाव- १६.८९ टक्के रावेर – १९.०३ टक्के जालना – २१.३५ टक्के औरंगाबाद – … Read more

राज्यात चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.४५ टक्के मतदान            

 मुंबई, दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यात आज दि.१३ मे २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून मतदान सुरु झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.४५ टक्के मतदान झाले आहे.  एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे… नंदुरबार  – ८.४३ टक्के जळगाव  – ६.१४ टक्के रावेर    – ७.१४ टक्के जालना   – ६.८८ टक्के … Read more

गृह मतदानाच्या पहिल्या दिवशी २१ ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांनी केले मतदान

E0A4AEE0A4BEE0A4B2E0A587E0A497E0A4BEE0A4B5 E0A4ACE0A4BEE0A4B9E0A4AF 3 गृह मतदानाच्या पहिल्या दिवशी २१ ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांनी केले मतदान

मालेगाव, दि. १२ (उमाका) : धुळे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 20 मे, 2024 रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या निवडणूकीत 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग मतदार व कोव्हीड-19 रुग्ण मतदार यांना टपाली मतदान पथकामार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार 02-धुळे लोकसभा मतदार संघातंर्गत 115-मालेगाव बाह्य मतदारसंघात आज गृह … Read more

साक्री व शिरपूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक साहित्यासह अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना

E0A4AEE0A4A4E0A4A6E0A4BEE0A4A8 E0A4B8E0A4BEE0A4B9E0A4BFE0A4A4E0A58DE0A4AF E0A4B0E0A4B5E0A4BEE0A4A8E0A4BE 5 Qe5vdq साक्री व शिरपूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक साहित्यासह अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना

धुळे, दि. १२ (जिमाका) : धुळे जिल्ह्यातील साक्री व शिरपूर हे विधानसभा मतदार संघ लोकसभा निवडणूकीकरीता 01-नंदुरबार लोकसभा मतदार संघात येतात. या मतदार संघासाठी आज दि.13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही विधानसभा मतदार संघात मतदान साहित्य, ईव्हीएम मशीन चे वाटप रविवार दि. 12 रोजी करण्यात आले. दुपार नंतर मतदान … Read more