Hair Care Tips | केसांची निगा राखण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Hair Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: स्त्री असो वा पुरुष प्रत्येकालाच मजबूत, जाड, चमकदार आणि लांब केस (Hair) हवे असतात. परंतु अनियमित आहार आणि बदलत्या जीवनशैलीमुळे केसांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये केस गळती, कोंड्याची समस्या केस कोरडे होणे टक्कल पडणे इत्यादी समस्यांचा समावेश आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पद्धतीचा अवलंब करतात. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी लोक रसायन युक्त उत्पादनांचा वापर करतात. पण या उत्पादनामुळे केसांना हनी पोहोचण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे केसांची निगा राखण्यासाठी घरगुती पद्धतींचा वापर करून त्यांची काळजी घेतली पाहिजे. केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही पुढील घरगुती पद्धतीचा उपयोग करू शकतात.

भृंगराज तेल

केसांची काळजी घेण्यासाठी भृंगराज हे सर्वात उपयुक्त औषध मानले जाते. केसांसाठी वापरल्या जाणाऱ्या बहुतेक उत्पादनांमध्ये भृंगराज हा मुख्य घटक म्हणून वापरला जातो. भृंगराज केसांच्या वाढीस चालना देतात. त्यामुळे केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही भृंगराज तेल लावू शकतात. यासाठी तुम्हाला भृंगराज फुल नारळ किंवा मोहरीच्या तेलामध्ये उकळून घ्यावे लागेल. हे तेल तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांना लावू शकतात.

कढीपत्ता आणि मेथी दाणे

कढीपत्ता आणि मेथी दाण्याच्या नियमित वापराने केसांची वाढ झपाट्याने व्हायला लागते. यासाठी तुम्हाला मोहरी किंवा खोबरेल तेलामध्ये सात-आठ कढीपत्ते गरम करून घ्यावे लागेल. त्याचबरोबर रात्री भिजवलेले मेथी दाणे बारीक करून घ्यावे लागेल. त्यानंतर कढीपत्त्याचे तेल आणि मेथी दाणे गरम करून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण टाळूपासून केसांपर्यंत व्यवस्थित लावून घ्यावे लागेल. चार ते पाच तासानंतर तुम्हाला तुमचे केस साध्या पाण्याने धुवावे लागतील. नियमित याचा वापर आणि तुमच्या केसांची वाढ झपाट्याने व्हायला लागेल.

आवळा तेल

आवळा हा केसांसाठी खूप फायदेशीर असतो. कारण यामध्ये माफक प्रमाणात विटामिन सी, अँटीअँक्सीडेंट आणि आयरन उपलब्ध असते. यासाठी तुम्हाला खोबरेल तेल किंवा मोहरीच्या तेलामध्ये दोन ते तीन चमचे आवडा पावडर मिक्स करून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण उकळून घ्यावे लागेल. हे मिश्रण कोमट झाल्यावर तुम्हाला ते टाळूपासून केसांपर्यंत लावावे लागेल. त्यानंतर तीन ते चार तासानंतर तुम्हाला तुमचे केस स्वच्छ धुवावे लागतात. नियमित याचा वापर केल्याने तुम्हाला तुमच्या केसांमध्ये फरक जाणवेल.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या