मतदान जनजागृतीसाठी हिरानंदानी  परीसरात मतदार जोडो पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

WhatsApp Image 2024 05 10 at 3.10.14 PM 1 e1715371492214 1024x497 3AmMgr मतदान जनजागृतीसाठी हिरानंदानी  परीसरात मतदार जोडो पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे दि 10 (जिमाका ) – लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग असणे अत्यंत आवश्यक असून प्रत्येक मतदाराने मतदान करावे यासाठी  आज (10 मे) ठाणे शहरातील हिरानंदानी इस्टेट परिसरात मतदार जोडो पदयात्राचे आयोजन करण्यात आले होते. २५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत, १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृतीवर भर देण्यात येत … Read more

२५ ठाणे लोकसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील २६२ तर ३८ दिव्यांग मतदारांनी केले गृह मतदान

WhatsApp Image 2024 05 10 at 16.11.14 1 768x1024 9fH4yW २५ ठाणे लोकसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील २६२ तर ३८ दिव्यांग मतदारांनी केले गृह मतदान

ठाणे, दि.10 (जिमाका) : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी भारत निवडणूक आयोगाने घरुनच मतदान करण्यासाठी सोय उपलब्ध करुन दिली आहे. आजपासून गृहमतदानाला सुरूवात झाली असून 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात 85 वर्षावरील एकूण 262 नागरिकांनी तर 38 दिव्यांग मतदारांनी गृहमतदान केले असल्याची माहिती 25-ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर … Read more

भिवंडीतील प्रभाग समिती परिसरात वासुदेवाच्या माध्यमातून मतदानाची जनजागृती

ठाणे, दि.10 (जिमाका) : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी  स्वीप उपक्रमांतर्गत विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. भिवंडी महानगरपालिकेच्या प्रभाग समिती 3 परिसरात मतदानाचे प्रमाण कमी असून येथील नागरिकांनी मतदान करावे यासाठी याठिकाणी आज वासुदेवाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. स्वीप उपक्रमांतर्गत भिवंडी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती 3 परिसरात हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी पथनाट्याच्या माध्यमातून वासुदेवाने नागरिकांना मतदानाचे आवाहन … Read more

कल्याण पूर्व मतदारसंघात पथनाट्याच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांनी केली जनजागृती

WhatsApp Image 2024 05 10 at 1.46.16 PM 2 1024x461 zbOcfJ कल्याण पूर्व मतदारसंघात पथनाट्याच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांनी केली जनजागृती

ठाणे, दि.10 (जिमाका) : येत्या 20 मे 2024 रोजी प्रत्येक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावा, मतदान करुन आपली लोकशाही बळकट करा असा संदेश देत विदयार्थ्यांनी नागरिकांना देत मतदानाबाबत जनजागृती केली.  24- कल्याण लोकसभा मतदारसंघातील, 142 कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गोपीनाथ ठोंबरे आणि अतिरिक्त सहाय्यक. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वाती घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज स्वीप पथकातील (मतदार जनजागृतीपथक) महापालिकेचे … Read more

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाचा हिशोब तपासणीसाठी वेळापत्रक जाहीर

मुंबई, दि. 10  :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी मुंबई शहर जिल्ह्यातील ’30-मुंबई दक्षिण मध्य व ‘३१-मुंबई दक्षिण’ या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून उमेदवार,प्रतिनिधींनी वेळापत्रकानुसार विहित दिवशी व वेळेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले  आहे. दरम्यान, दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची पहिली तपासणी  09 मे रोजी झाली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक खर्च संनियत्रण नियमावलीतील … Read more

मुंबई शहर जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांतील कामकाजाची निवडणूक आयोगाच्या सचिवांनी केली पाहणी

मुंबई, दि. 10  :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील ‘मुंबई दक्षिण’ व ‘मुंबई दक्षिण मध्य’ या दोन्ही लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या निवडणूक विषयक कामकाजाची आज  भारत निवडणूक आयोगाचे सचिव सुमन कुमार दास व अवर सचिव अनिल कुमार यांनी पाहणी केली. मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात  20 मे,2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये … Read more

८.८३ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ ची परतफेड

मुंबई, दि. 10  : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या  8.83 टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, 2024 अदत्त शिल्लक रकमेची परतफेड 10 जून, 2024 पर्यंत देय असलेल्या व्याजासह  11 जून 2024 रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल, असे वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा), सचिव श्रीमती शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे. “परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 ” अन्वये महाराष्ट्र शासनाने … Read more

लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत – निवडणूक उपआयुक्त हिर्देश कुमार

E0A489E0A4AA E0A4A8E0A4BFE0A4B5E0A4A1E0A4A3E0A582E0A495 E0A486E0A4AFE0A581E0A495E0A58DE0A4A4 E0A4B6E0A58DE0A4B0E0A580 oDkKkz लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत – निवडणूक उपआयुक्त हिर्देश कुमार

मुंबई, दि.१०: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ पाचव्या टप्प्याच्या  अनुषंगाने निवडणूक प्रशासनाने काटेकोरपणे तयारी करावी. पाचव्या टप्प्यात  मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात, असे आदेश भारत निवडणूक आयोगाचे  निवडणूक उपआयुक्त हिर्देश कुमार यांनी आज दिले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या पाचव्या टप्प्यातील तयारी संदर्भात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी व  निवडणूक निरिक्षकांच्या बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथीगृह येथे … Read more

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक राजकुमार चंदन आणि किरण छत्रपती यांची माध्यम कक्षास भेट

मुंबई उपनगर, दि. 10:  मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाकरीता निवडणूक आयोगाने खर्च निरीक्षक म्हणून भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी राजकुमार चंदन आणि किरण के. छत्रपती यांची नियुक्ती केली आहे. या दोन्ही निरीक्षकांनी गुरुवारी रात्री मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षास भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. निवडणूक निरीक्षक श्री. चंदन आणि श्री. छत्रपती यांनी  माध्यम कक्षातील टेलीव्हीजन मॉनिटरिंग, … Read more

मतदारांसाठी मतदान केंद्रावर किमान आवश्यक सुविधा; पाणी, रॅम्प, स्वतंत्र स्वच्छतागृहे, शेड असणार उपलब्ध

मुंबई, दि. १० : लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्यात प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात ५३५२ कायमस्वरूपी तर २०३२ तात्पुरती अशी एकूण ७३८४ मतदान केंद्र असणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, … Read more

मतदानासाठी यंत्रणा सज्ज; मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे – मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम

चौथ्या टप्प्यासाठी 13 मे रोजी मतदान ; 23 हजार 284 मतदान केंद्र सुमारे 2 कोटी 28 लाखांपेक्षा जास्त मतदार ; यंत्रणा संपूर्ण तयारीसह सज्ज तिसऱ्या टप्प्यात सरासरी 63.55 टक्के मतदान विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर   मुंबई, दि. 10 : राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील अकरा मतदार संघासाठी 13 मे रोजी मतदान … Read more

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी १० जून रोजी मतदान -जिल्हाधिकारी अभिनव गोयल

धुळे, दि. १० (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-२०२४ चा कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या मतदारसंघासाठी सोमवार, १० जून, २०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत धुळे जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर मतदान होईल, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव … Read more

२७-मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या खर्च तपासणीस निवडणूक निरीक्षकांकडून सुरूवात

मुंबई, दि. 9 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचार कालावधीतील पहिली खर्च तपासणी आज खर्च विषयक निवडणूक निरीक्षकांकडून होत आहे. निरीक्षक किरण के. छत्रपती (आयआरएस) आणि राजकुमार चंदन (आयआरएस) यांनी आज उमेदवारांच्या खर्चाच्या नोंद वही तपासणीस सुरुवात केली. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता लोकसभा मतदारसंघात उमेदवाराने अर्ज दाखल केल्यानंतर … Read more

पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर

मुंबई, दि.९ :महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-२०२२ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर झाला आहे. ही शारिरिक चाचणी २४ मे ते ६ जून २०२४ या कालावधीत पोलीस मुख्यालय, रोडपाली, सेक्टर-१७, कळंबोली, नवी मुंबई येथे घेण्यात येणार आहे. या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम १५ एप्रिल ते २ मे, २०२४ या कालावधीतील  नियोजित कार्यक्रम … Read more

महाराष्ट्र कृषि सेवा (मुख्य) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

मुंबई, दि.९ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषि सेवा (मुख्य) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील तुषार विठ्ठल वाघ हे खुल्या  व मागासवर्गवारीतू राज्यातून प्रथम आले आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सायली सातप्पा फासके ह्या महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम आल्या आहेत. उमेदवारांच्या माहितीसाठी निकाल व प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे … Read more