ठाणे रेल्वे स्थानकावर राबविण्यात आलेल्या मतदार जनजागृतीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे,दि. १४ (जिमाका): लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग घ्यावा व मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान करुन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे अशी जनजागृती आज ठाणे रेल्वेस्थानकावरील प्रवासी मतदारांमध्ये करण्यात आली. २५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ सहा.निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज (१४ मे) ठाणे  रेल्वे स्टेशन परिसरात मतदार साक्षरता … Read more

ठाणे शहरात झालेल्या गृह मतदानास ८५ वर्षावरील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे,दि. १४ (जिमाका) : ठाणे जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात 20 मे 2024 रोजी  लोकसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी संपूर्ण ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून मतदानापासून एकही मतदार वंचित राहणार नाही याची खबरदारी देखील प्रशासनाने घेतली आहे. 85 वर्षांवरील जे नागरिक व दिव्यांग व्यक्ती मतदान केंद्रापर्यत पोहचू शकत नाही अशांसाठी आज 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात आयोजित … Read more

ब्रेल लिपीतील मतदार चिठ्ठीचे दिव्यांग मतदारांना घरोघरी वाटप

ठाणे,‍ दि. १४ (जिमाका) : लोकसभा निवडणुकीत सर्वच घटकातील नागरिकांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी आज 25 ठाणे लोकसभा मतदारसंघ अंतर्गत 148 विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांना ब्रेल लिपीतील मतदार माहिती  चिठ्ठीचे वाटप प्रत्यक्ष दिव्यांग मतदारांच्या निवासस्थानी जावून करण्यात आले. २५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत, १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली … Read more

मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांसाठी धावणार बस

मुंबई, दि. १४ : मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यादृष्टीने ‘एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये’ या संकल्पानुसार जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी मतदानासाठी विशेष वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विधानसभा मतदारसंघानिहाय ठरविलेल्या एका निश्चित मार्गावर बेस्टमार्फत व्हिलचेअर प्रवेश योग्य मोफत बस सुविधा उपलब्ध करून … Read more

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील खर्च सादर न करणाऱ्या दोन उमेदवारांना नोटीस

मुंबई, दि. १४ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने २७- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च नोंदवहीची खर्च निरीक्षकांसमोर 13 मे २०२४ रोजी द्वितीय तपासणी करण्यात आली. 21 उमेदवारांपैकी १९ उमेदवारांनी आपले खर्च सादर केले. दोन उमेदवारांनी तपासणीसाठी खर्च सादर केले नाहीत. तपासणीसाठी खर्च सादर केलेले नाहीत, असे मनोज श्रावण नायक, कपिल कांतिलाल … Read more

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात ८२० मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

E0A4AEE0A581E0A482E0A4ACE0A488 E0A489E0A4A4E0A58DE0A4A4E0A4B0 E0A4AAE0A4B6E0A58DE0A49AE0A4BFE0A4AE E0A4B2E0A58BE0A495E0A4B8E0A4ADE0A4BE 2 sJejBS मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात ८२० मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

मुंबई, दि. १४ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 27- मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदारसंघात आतापर्यंत 820 मतदारांनी गृह मतदान केले आहे. त्यामध्ये ज्येष्ठ 751 तर दिव्यांग 69 मतदारांचा समावेश आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिली आहे. 15 तारखेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार … Read more

मुंबई उपनगरात २२९० मतदारांनी बजावला गृहमतदानाचा हक्क

मुंबई, दि. १४ : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले आणि दिव्यांग अशा 2,735 मतदारांनी गृह मतदानासाठी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी दोन हजार 290 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 26- मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम, 28- मुंबई उत्तर … Read more

विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

मुंबई, दि. १४ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर करून याबाबतची मतदान प्रक्रिया 10 जून 2024 रोजी पार पडणार होती. तथापि, या निवडणुका शाळांच्या उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीनंतर घेण्याबाबत आयोगाकडे निवेदन प्राप्त झाले. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने या मागणीचा विचार करून महाराष्ट्र विधानपरिषद शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवाषिक निवडणुका पुढे … Read more

मुंबई शहरात ११ सखी मतदान केंद्र

मुंबई, दि. १४ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यात २० मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. या मतदानासाठी जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील १० विधानसभा मतदारसंघात ‘महिला संचालित मतदान केंद्रे’ उभारण्यात येत आहेत. महिला मतदारांनी मतदान प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून ‘सखी मतदान केंद्र’ … Read more

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

E0A4AEE0A4BE RpYGIU छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

मुंबई, दि. १४ : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन मुंबई येथे  महाराजांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले.  यावेळी राजभवनातील अधिकारी व  कर्मचारी यांनी देखील छत्रपती संभाजी महाराज यांना पुष्पांजली वाहिली. ०००

छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

Chatrapati sambhaji maharaj2 1024x683 sdqq1C छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि.14 : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेठकर, कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, विजय शिंदे आदीसह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण … Read more

राज्यात चौथ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५९.६४ टक्के मतदान

मुंबई, दि. १३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदान  प्रक्रिया संपली असून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५९.६४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे : नंदुरबार –  ६७.१२ टक्के जळगाव –  ५३.६५ टक्के रावेर – ६१.३६ … Read more

वडाळा विधानसभा मतदारसंघात १०० वर्षाच्या पार्वती शेषानंद यांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

मुंबई, दि. १३ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे मतदार आणि दिव्यांग मतदारांना गृह मतदानाचा पर्याय देण्यात आला आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील ३०- मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील १८०- वडाळा विधानसभा मतदारसंघामधील १०० वर्षाच्या श्रीमती पार्वती शेषानंद यांनी  गृह मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी गृह टपाली मतदान प्रक्रियेविषयी प्रत्यक्ष पाहणी करुन … Read more

२८- मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

मुंबई, दि. १३ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८ – मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारसंघात एकूण १८२ ज्येष्ठ आणि ८ दिव्यांग मतदार गृह मतदान करणार आहेत. आजपर्यंत १५० मतदारांनी गृह मतदान केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली आहे. १५ तारखेपर्यंत ही प्रक्रिया … Read more

१०४ वर्षांच्या आजीबाईंनी बजावला गृह मतदानाचा हक्क

मुंबई दि. १३ :  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी 85 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे मतदार आणि दिव्यांग मतदारांना गृहमतदानाचा पर्याय देण्यात आला होता. मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26- मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघातील 153- दहिसर विधानसभा मतदारसंघात आज गृहमतदान पार पडले. आयुष्याची शंभरी पार केलेल्या 104 वर्ष वयाच्या श्रीमती लक्ष्मी राजपूत या आजीबाईंनी दहिसर पश्चिम येथे आज … Read more