Prajakta Mali | प्राजक्ता माळीच्या ‘राज’वरून उठला पडदा, राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

Prajakta Mali | मुंबई: महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ने तिच्या अभिनयाच्या आणि आदांच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. तिने तिच्या अभिनय, सूत्रसंचालन आणि नृत्यने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. प्राजक्तामध्ये अनेक कलागुण दडलेले आहेत. ‘प्राजक्तप्रभा’ या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून प्राजक्तामधील कवियत्री सर्वांना दिसली आहे. अशा परिस्थितीत प्राजक्ता एका नव्या परवाला सुरू करत आहे. ती सध्या पारंपारिक मराठी साज ‘प्राजक्तराज’ घेऊन आली आहे.

प्राजक्ताने अस्सल मराठमोळ्या दागिन्यांची शुंखलेखा वेबसाईट ‘प्राजक्तराज’ घेऊन आली आहे. ‘प्राजक्तराज’चे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि इतिहास प्रेमी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते पार पडले आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास प्रेमी व अभ्यासाक विश्वास पाटील उपस्थित होते. महाराष्ट्रातील पारंपारिक आभूषणे ‘प्राजक्तराज’च्या माध्यमातून ती सादर करत आहे.

प्राजक्ताने या वेबसाईटच्या उद्घाटनासाठी राज ठाकरे यांना बोलावणे काही नवीन नव्हते. कारण ती गेले अनेक दिवस राज ठाकरे यांच्या संपर्कामध्ये आहे. त्याचबरोबर ती त्यांच्या सभांना देखील उपस्थित असते. शिवाय राज ठाकरे यांच्या कौटुंबिक सोहळ्यात देखील तिची हजेरी असते. त्यामुळे तिचे राज ठाकरेंवर असणारे प्रेम आणि आदर दोन्हीही जाहीर आहे. अशात परिस्थितीत तिने तिच्या ब्रँडचे नाव ‘प्राजक्तराज’ ठेवल्याने अनेकांचे डोळे चमकवले आहे.

प्राजक्ताच्या ब्रँडच्या नावातही ‘राज’ आहे आणि उद्घाटन देखील ‘राज’ यांच्या हस्ते पार पडलं आहे. त्यामुळे प्राजक्ताचे नेमकं ‘राज’ कनेक्शन काय? असा अनेकांना प्रश्न पडला आहे. त्याचबरोबर अनेकांनी याचे उत्तर शोधून काढण्याचा देखील प्रयत्न केला आहे.

महत्वाच्या बातम्या