खर्च निरीक्षक अंकुर गोयल यांची मीडिया कक्षाला भेट            

सिंधुदुर्गनगरी दि 02 (जिमाका) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता जिल्हा माहिती कार्यालयात कार्यन्वित करण्यात आलेल्या माध्यम कक्षास ४६ रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त खर्च विभागाचे निवडणूक निरीक्षक अंकुर गोयल यांनी आज दुपारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे, सहायक जिल्हाधिकारी विशाल खत्री, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, … Read more

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; ९.२२ लाख किंमतीचा मद्य साठा जप्त

मुंबई, दि. 2 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सायन पूर्व येथील धीरज आयर्न अँड स्टील लि, ऑफीस नं. जी २१, लोकमान्य पान बाजार असोशिएशन, सोमय्या हॉस्पिटल रोड, पूर्व द्रुतगती मार्गाजवळ परदेशात निर्मित केलेल्या व गोव्यातून आयात करुन मुंबईत आणलेल्या विविध ब्रँन्डच्या विदेशी मद्याचा साठा छापा टाकीत जप्त केला आहे. हा मुद्देमाल एकूण 9 लाख 22 हजार 196 रूपये किंमतीचा दारूबंदी गुन्ह्यातील आहे. या गुन्ह्यापोटी संतोष ऋषी घरबिडी (वय 42) या … Read more

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ; ठिकठिकाणी तपासणी

मुंबई, दि. 2 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये बंदोबस्त वाढविण्यात आला असून स्थिर व फिरत्या पथकांकडून मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी तपासणी सुरू आहे. तपासणी प्रक्रियेत प्रत्येकाने सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तपासणी प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन निवडणूक काळात नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, व्यावसायिकांनी कोणतेही साहित्य, रक्कमा सोबत ठेवताना त्यासंदर्भाचे योग्य दस्तऐवज सोबत ठेवावेत, असे आवाहन … Read more

उमेदवारांच्या खर्चावर असणार खर्च संनियंत्रण कक्षाची नजर – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई, दि. 2 : लोकसभा निवडणुकीत संबंधित उमेदवार अथवा राजकीय पक्ष करीत असलेल्या खर्चावर जिल्हास्तरीय खर्च सनियंत्रण कक्षाची नजर असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल अधिकाऱ्यांची खर्च सनियंत्रण विषयक बैठक झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तेजस समेळ व सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. मुंबई … Read more

लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होवून २० मे रोजी मुंबईतील नागरिकांनी आवर्जून मतदान करावे – मुख्य सचिव नितीन करीर यांचे आवाहन            

मुंबई, दि. २ : निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा गाभा असून त्यामध्ये लोकसहभाग आवश्यक आहे. त्यामुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या लोकशाहीच्या या उत्सवात नागरिकांनी सोमवार, २० मे २०२४ या दिवशी मतदान करून उत्साहपूर्वक सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे मुंबई शहर जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित मतदान … Read more

समाजमाध्यमांवरील प्रचारावर बारकाईने लक्ष ठेवावे – निवडणूक निरीक्षक परवीनकुमार थिंड            

मुंबई उपनगर, दि. 2 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवतानाच उमेदवारांकडून समाजमाध्यमांवर होणाऱ्या प्रचारावर बारकाईने लक्ष ठेवावे, अशा सूचना 29- मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी नियुक्त निरीक्षक परवीनकुमार थिंड यांनी दिले. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या माध्यम व सनियंत्रण कक्षास 29- मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी नियुक्त सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक श्री. थिंड यांनी आज दुपारी भेट देऊन पाहणी … Read more

परवीनकुमार थिंड यांची मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती, संपर्कासाठी भ्रमणध्वनी जाहीर

मुंबई उपनगर, दि. 2 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 29- मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी परवीनकुमार थिंड यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी ही माहिती दिली. निवडणूक निरीक्षक श्री. थिंड यांचा पत्ता : निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय,  29-मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ, जिल्हाधिकारी कार्यालय, पाचवा मजला, प्रशासकीय इमारत, सरकारी वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051. त्यांचा … Read more

सर्व मतदारांनी ‘मी मतदान करणार’ प्रतिज्ञा प्रमाणपत्र प्राप्त करा

बीड, दि.२ (जिमाका): ‘मी मतदान करणार’ असे प्रतिज्ञा प्रमाणपत्र प्राप्त करण्याची संधी सर्व मतदारांना प्राप्त करण्याची तयारी जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांनी केली आहे. याचा लाभ मतदारांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून 1) https://forms.gle/rCWv3M3Q1q8akfjn8 2) https://forms.gle/wAgnuMArTn1YFRxz7 अशा दोन लिंक उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दि. 28 एप्रिल रोजी ‘मी मतदान … Read more

भारतीय लोकशाहीत पेड न्यूजला थारा नाही…!

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरू झाली असून त्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाकडून आदर्श आचार संहितेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. लोकसभेत योग्य, कार्यक्षम व लोकाभिमुख दृष्टिकोन असलेला लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी प्रत्येक भारतीय मतदाराने मतदान करावे, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. मतदान करणे, हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने मतदारांनी कुठल्याही आमिषाला वा प्रलोभनाला … Read more

दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी ‘सक्षम ॲप’ वरदान ठरणार

लोकसभा निवडणुकीत दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने ‘सक्षम’ नावाचे मोबाईल ॲप तयार केले आहे. या ॲपवर दिव्यांग व जेष्ठ मतदारांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.  या सुविधेचा सर्व गरजू मतदारांनी आपल्या मोबाईल मध्ये सक्षम ECI ॲप डाऊनलोड करून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.   दिव्यांग (PWDs) मतदारांकरिता … Read more

लोकशाहीच्या चार स्तंभात न्यायपालिकेचे स्थान अनन्यसाधारण -मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय

p5 fwiImh लोकशाहीच्या चार स्तंभात न्यायपालिकेचे स्थान अनन्यसाधारण -मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय

जिल्हा न्यायालय परिसरात ८ मजली इमारतीसाठी १०८ कोटीचा निधी, ३ वर्षांत काम पूर्ण होणार  सोलापूर, दि. २ (जिमाका): लोकशाहीच्या चार स्तंभात न्यायपालिकेचे स्थान अनन्यसाधारण आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये न्यायव्यवस्थेचे महत्त्व व विश्वासाहर्ता टिकून राहण्यासाठी सर्व न्यायाधीशांनी प्रयत्न करावेत. यासाठी न्यायालयांना बार कौन्सिल असोसिएशनच्या सदस्यांनीही सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय … Read more

ठाणे जिल्ह्यात लोकसभा/विधानसभा मतदारसंघनिहाय एक खिडकी योजना कक्ष कार्यान्वित

ठाणे, दि.२ (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्यानुषंगाने राजकीय पक्ष/उमेदवार/त्यांचे प्रतिनिधी यांना प्रचारविषयक विविध परवानग्या प्राप्त करणे सोयीचे व्हावे, याकरिता एक खिडकी योजना कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये लोकसभा मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर एक खिडकी कक्ष तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. हेलिकॉप्टर लँडिंग … Read more

महाराष्ट्र दिनानिमित्त चंद्रपूर येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहन

E0A4AEE0A4B9E0A4BEE0A4B0E0A4BEE0A4B7E0A58DE0A49FE0A58DE0A4B0 E0A4A6E0A4BFE0A4A8 E0A495E0A4BEE0A4B0E0A58DE0A4AFE0A495E0A58DE0A4B0E0A4AE 2 y5OjgJ महाराष्ट्र दिनानिमित्त चंद्रपूर येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहन

चंद्रपूर दि. २ : महाराष्ट्र दिनानिमित्त (१ मे) मुख्य शासकीय ध्वजारोहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यांच्या हस्ते पोलिस मैदान, पोलिस मुख्यालय, चंद्रपूर येथे करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार व इतर अधिकारी उपस्थित होते. … Read more

जिल्ह्यातील ३ हजार ६१७ मतदान केंद्रांवर स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ

p12 byXUCZ जिल्ह्यातील ३ हजार ६१७ मतदान केंद्रांवर स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ

ग्रामीण भागातील २ हजार ३६१ शहरी भागातील १ हजार २५६ मतदान केंद्रावर स्वच्छता मोहीम राबवली जाणार जिल्ह्यातील सर्व मतदारांनी ७ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन सोलापूर, दि. २ (जिमाका): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 7 मे 2024 रोजी … Read more

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण

ठाणे, दि. 01 (जिमाका) : ठाणे जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी दोन दिवस सुट्टी आहे. मात्र सुट्टीसाठी बाहेर न जाता आपण सर्वांनी 20 मे रोजी मतदान नक्की करावे तसेच महाराष्ट्र राज्य निर्मितीचा 64 वा वर्धापन दिन साजरा करताना महाराष्ट्र राज्याच्या समृद्ध व प्राचीन वारशाची माहिती पुढील पिढीपर्यंत पोचविण्याचा संकल्प … Read more