Petrol-Diesel Price | पेट्रोल भरायला जाण्याआधी जाणून घ्या, आजचा भाव किती?

Petrol-Diesel Price | सध्या सर्वत्र बेरोजगार आणि महागाई पाहायला मिळत आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूं असोत किंवा खाद्यपदार्थ यांच्या किंमतीत देखील वाढत चालल्या आहेत. तर राज्यात उष्णतेची लाट उसळली असली तरीही काही जिल्ह्यामध्ये पाऊसाने गारपिटीने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नसल्याने बळीराजा रस्त्यावर पालेभाज्या ओतताना पाहायला मिळत आहे. यात दररोज पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत देखील चढ- उतार पाहायला मिळत आहे.

तसचं मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. तर अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

आज काही शहरातील पेट्रोल – डिझेलच्या किंमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. यामध्ये अहमदनगर
पेट्रोल १०६.८५ प्रति लिटर डिझेल ९३.३३ प्रति लिटर, अकोला १०६.१४/ ९२.६९प्रति लिटर, अमरावती १०७.१४/ ९३.६५ प्रति लिटर, औरंगाबाद १०७.०२/ ९३.५० प्रति लिटर, भंडारा १०७.०१/ ९३.५३ प्रति लिटर, १०६.१२/ ९३.३४ प्रति लिटर असा बदल झालेल्या पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या-