Sameer Wankhede | उच्च न्यायालयाकडून समीर वानखेडेंना दिलासा! ‘या’ तारखेपर्यंत अटकेपासून संरक्षण

Sameer Wankhede | मुंबई: सध्या सीबीआयच्या रडारवर असणारे एनसीबीचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. आज (22 मे) या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यामध्ये समीर वानखेडे यांना अटकेपासून काही दिवस दिलासा मिळाला आहे. समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिलं आहे. याप्रकरणी आता 8 जून रोजी सुनावणी होणार आहे.

समीर वानखेडेंचं नक्की काय आहे प्रकरण (What exactly is the case of Sameer Wankhede?)

समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याकडे एनसीबी मुंबई विभागाची संचालक पदाची जबाबदारी असताना त्यांच्या पथकाने ऑक्टोबर 2021 मध्ये गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या क्रुझर छापा टाकला होता. या प्रकरणामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर आर्यन खान ड्रग्स प्रकरणी (Aryan Khan Drug Case) समीर वानखेडेंनी शाहरुख खानकडे (Shah Rukh Khan) 25 कोटींची खंडणी मगितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

उच्च न्यायालयात नेमकं काय घडलं? (What exactly happened in the High Court?)

या सर्व प्रकरणाशी संबंधित पुरावे माध्यमांना उपलब्ध करून देऊ नये. अन्यथा सीबीआय कारवाई करण्यात येईल, असं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त्याचबरोबर तपास सहकार्य आणि पुराव्यांशी कोणत्याही प्रकारची छेडछाड होणार नाही. तपासा संबंधित कोणतेही पुरावे माध्यमांपर्यंत जाऊ देणार नाही, अशी हमी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी उच्च न्यायालयाला दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3Wn4Wkl