WhatsApp | आता तुम्ही व्हाट्सअपवर पाठवलेले चुकीचे मेसेज एडिट करू शकतात, जाणून घ्या सविस्तर

WhatsApp | टीम महाराष्ट्र देशा: व्हाट्सअप हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सर्वात लोकप्रिय ॲप आहे. व्हाट्सअप वापरकर्ते अनेक दशकांपासून ज्या फिचरची वाट बघत होते, ते अखेर व्हाट्सअपवर आले आहे. कंपनीने वापरकर्त्यांसाठी ‘मेसेज एडिट’ (Edit message) करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. सध्या हे फीचर काही लोकांच्या ॲपमध्ये उपलब्ध आहे. मात्र, लवकरच सर्वांना याचा लाभ मिळेल.

व्हाट्सअपने (WhatsApp) नुकतच ‘मेसेज एडिट’ फीचर लॉन्च केलं आहे. यामध्ये तुम्ही मेसेज पाठवल्यानंतर 15 मिनिटापर्यंत तो मेसेज एडिट करू शकतात. 15 मिनिटानंतर तो मेसेज एडिट होऊ शकणार नाही. कॉल, मेसेज आणि मीडियाप्रमाणेच एडिटर मेसेज देखील एन्ट्रीएंड-टू-एंड एनक्रिप्टेड असेल.

Screenshot 2023 05 23 112416 WhatsApp | आता तुम्ही व्हाट्सअपवर पाठवलेले चुकीचे मेसेज एडिट करू शकतात, जाणून घ्या सविस्तर

You can edit wrong messages sent on WhatsApp

  • मेसेज एडिट करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पाठवलेला मेसेज ‘Long-press’ करावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला ड्रॉप डाऊन मेनूमधून ‘Edit’ पर्याय निवडावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला पाठवलेला मेसेज एडिट करता येईल.
  • हा मेसेज तुम्हाला पाठवल्यानंतर 15 मिनिटापर्यंत एडिट करता येऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3MwTLBf