Job Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी भारत सरकार नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. भारत सरकारच्या पोस्टल विभाग (महाराष्ट्र) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार http://www.indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
भारत सरकारच्या पोस्टल विभागाच्या या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 2508 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. या पदांमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) (शाखा पोस्टमास्टर (BPM)/ सहायक शाखा पोस्टमास्टर (ABPM)/ डाक सेवक) पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार किमान इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा. या पदांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पदानुसार इच्छुक उमेदवार http://www.indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
भारत सरकारच्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार http://www.indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या
- Dark Circles | डोळ्याखालील डाग सर्कल्स काढायचे असतील, तर बटाट्याचा ‘या’ पद्धतीने करा वापर
- Uddhav Thackeray | “नारायण राणेंना लवकरच मोदींच्या मंत्रिमंडळातून…”; ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा काय?
- Job Opportunity | बँकेत नोकरीची संधी! ‘या’ बँकेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- IND vs NZ | टी-20 मालिकेत टिकून राहण्यासाठी टीम इंडियात होऊ शकतो मोठा बदल, ‘या’ खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता
- Urfi Javed | उर्फीच्या फॅशनचा ‘कोन’ अंदाज लावणार?