दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी मुकेश जैन खर्च निरीक्षक

मुंबई, दि. ३ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील ३१ – दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाकडून खर्चविषयक केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून मुकेश जैन (आयआरएस) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक खर्च निरीक्षक श्री.जैन यांचा निवासाचा पत्ता सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथील कक्ष क्रमांक २०५ असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ९३२४८५८३२८ आणि ई-मेल आयडी 31mscexpenditureobserver@gmail.com हा आहे. तसेच निवडणूक खर्च … Read more

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांचा केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा

मुंबई, दि. ०३ : मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३०-मुंबई दक्षिण मध्य’ व ’३१- मुंबई दक्षिण’ या दोन्ही लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात केलेल्या तयारीचा केंद्रीय निवडणूक निरीक्षक (पोलीस) मुकेश सिंह यांनी आज आढावा घेतला. मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीला मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, ’३१-मुंबई … Read more

‘महामानव विश्वकाव्य दर्शन’ या काव्यसंग्रहासाठी विविध भाषेतील काव्य पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि. ३ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील लिहिलेल्या कविता, गझल, अभंग, अखंड, ओवो, छक्कड, शाहिरी, रुबाया. हायकू, चारोळी, भारुड, पोवाडा, लोकगीते इत्यादी सर्व काव्य प्रकारचे संकलन करून महामानव विश्वकाव्य दर्शन हा काव्यसंग्रह मोठ्या प्रमाणावर एकत्रित करुन संपादित करून ग्रंथरूपाने प्रकाशित करण्यात येत असून  विविध भाषेतील काव्य निर्माण केलेले असल्यास त्याची प्रत पाठविण्याचे डॉ. बाबासाहेब … Read more

मतदानाचा महत्त्वपूर्ण हक्क मतदारांनी आवर्जून बजावावा – मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम

Hon Election Commissioner Press Conf 1 1024x683 qaLfTR मतदानाचा महत्त्वपूर्ण हक्क मतदारांनी आवर्जून बजावावा – मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम

सुमारे २ कोटी ९ लाखांपेक्षा जास्त मतदार; यंत्रणा संपूर्ण तयारीसह सज्ज उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विविध सुविधा दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात सरासरी ६२.७१ टक्के मतदान मुंबई, दि. 3 : राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदार संघासाठी 7 मे रोजी मतदान होत असून त्यासाठी यंत्रणा सज्ज असून उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रांवर पुरेसे पिण्याचे पाणी, … Read more

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची तरुणाईला साद

latur2 1024x682 GwEl7K मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची तरुणाईला साद

लातूर, दि. 03 : युवावर्ग हा देशाचे भविष्य असून आपल्या देशातील वैभवशाली लोकशाही परंपरा अधिक बळकट करण्यासाठी युवावर्गाने आपला मतदानाचा हक्क बजावावा. तसेच आपल्या कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक व्यक्तीचे मतदान करून घेण्यासाठी युवक-युवतींनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे केले. निमित्त होते जिल्हा क्रीडा संकुल येथे ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत आयोजित मतदार जागृती कार्यक्रमाचे. यावेळी उपस्थित युवा … Read more

‘दिलखुलास’मध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची ‘लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज’ या विषयावर सोमवारी मुलाखत

मुंबई, दि. ३ : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज’ या विषयावर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांची मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात घेण्यात आली आहे. ही मुलाखत सोमवारी ६ मे रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत … Read more

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक स्तुती चरण – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर

मुंबई उपनगर, दि. 3 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 28-मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघासाठी सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक म्हणून भारत निवडणूक आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी स्तुती चरण (IAS) यांची नियुक्ती केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली आहे. उमेदवारांना अथवा नागरिकांना निवडणूक संदर्भात संपर्क साधावयाचा असल्यास 8591366725 या भ्रमणध्वनीवर अथवा 022-20852870 … Read more

जम्मू आणि उधमपूर येथे राहणाऱ्या विस्थापितांसाठी ‘फॉर्म-एम’ची प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाकडून रद्द

मुंबई उपनगर, दि. 3 : लोकसभा निवडणुका 2024 मध्ये काश्मीरच्या विस्थापित मतदारांना  मतदानाची सुविधा देण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) जम्मू आणि उधमपूरमध्ये राहणाऱ्या खोऱ्यातील विस्थापित नागरिकांसाठी फॉर्म -एम भरण्याची किचकट प्रक्रिया रद्द केली आहे. याव्यतिरिक्त, जम्मू आणि उधमपूरच्या बाहेर राहणाऱ्या विस्थापितांसाठी (जे फॉर्म  एम दाखल करणे सुरू ठेवतील), भारतीय निवडणूक आयोगाने फॉर्म -एम  सोबत जोडलेल्या … Read more

महिलांनी सक्रीयपणे मतदानात सहभाग नोंदवावा –जिल्हा निवडणूक अधिकारी

बीड.दि. ३ (जिमाका): महिलांनी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात  प्रगती साधली आहे. मतदारांमध्ये जनजागृतीचे कामही महिला उत्कृष्टपणे पार पाडत आहे. बीड लोकसभा मतदार संघातील निवडणुका सोमवार दिनांक 13 मे रोजी होणार आहेत. यामध्ये महिलांनी नि:संकोचपणे स्वविवेकाने आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांनी केले आहे.   बीड … Read more

खान्देशची भरीत रेसिपी व्हाया मतदान जागृती संदेश एकच… तुमच ‘मत अनमोल आहे’

WhatsApp Image 2024 05 03 at 2.56.24 PM EZkynw खान्देशची भरीत रेसिपी व्हाया मतदान जागृती संदेश एकच… तुमच ‘मत अनमोल आहे’

जळगाव दि.३ (जिमाका): प्रत्येक भागाच्या खाद्य संस्कृतीची म्हणून एक ओळख असते. तशी भरीत हे खान्देशच्या खाद्यसंस्कृतीची आद्य ओळख.. मग हीच खाद्य संस्कृती पोटातून बोटात आणण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी खान्देशच्या किचनमध्ये जाऊन मतदान जागृतीचे केलेले आवाहन हा लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरले.. आणि महिलांना मत देण्याच्या स्वातंत्र्याचा गौरव महिलांमध्ये मत केलंच पाहिजे हे बळ … Read more

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ सारख्या गैरप्रकारांवर कारवाईचे शासनाचे आदेश

मुंबई, दि. ३ : लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे / डिजिटल माध्यमांवरून प्रसारित करण्यात येत आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई शासनामार्फत करण्यात येणार आहे. यासंदर्भात पोलीस महासंचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. फोटोशॉप, मशीन लर्निंग (एमएल) किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) यांसारख्या विविध तंत्रांचा … Read more

संवाद यात्रेतून घुमला मतदार जागृतीचा जागर

sangli1 1024x576 vJbXMX संवाद यात्रेतून घुमला मतदार जागृतीचा जागर

सांगली दि. 2 (जि.मा.का.) : 44-सांगली लोकसभा मतदार संघात 7 मे 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी मतदान होत आहे. लोकसभा  निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी काढण्यात आलेल्या संवाद यात्रेत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून मतदान करण्याचे आवाहन केले. जिल्हा प्रशासनामार्फत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाचा एक … Read more

पद्म पुरस्कारांसाठी नामांकने मागविण्याचे आवाहन; १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

नवी दिल्ली, ०२ : केंद्रसरकार प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करत असते. त्यास अनुसरून यावर्षीही पद्म पुरस्कार 2025 साठी ऑनलाईन नामांकन/ शिफारशीबाबतचे आवाहन केले आहे. याबाबतची निवेदने स्वीकारण्याची सुरुवात 1 मे 2024 पासून सरकारने केली असून, पद्म पुरस्कारांसाठी नामांकने स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2024आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकन/ शिफारशी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (https://awards.gov.in) वर ऑनलाइन स्वीकारल्या जातील. … Read more

निवडणूक खर्च निरीक्षक यांना मोबाईल क्रमांकाचे प्रदान    

नाशिक, दिनांक 30 एप्रिल, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवार निवडणूक खर्च नियंत्रणासाठी 20-दिंडोरी व 21-नाशिक मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून भारतीय महसूल सेवेतील चार आयआरएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून ते जिल्ह्यात दाखल झाले आहेत. कामकाजाच्या सोयीनुसार निवडणूक खर्च निरीक्षक यांना मोबाईल क्रमांक प्रदान करण्यात आले असून  त्याचा तपशील खालील … Read more

गृह मतदानासाठी घरी आलेल्या मतदान पथकांचे दिव्यांग, ८५ वर्षांवरील मतदारांनी मानले आभार

E0A497E0A583E0A4B9 E0A4AEE0A4A4E0A4A6E0A4BEE0A4A8 E0A4B2E0A4BEE0A4A4E0A582E0A4B0 E0A4B6E0A4B9E0A4B0 3 77Os3E गृह मतदानासाठी घरी आलेल्या मतदान पथकांचे दिव्यांग, ८५ वर्षांवरील मतदारांनी मानले आभार

  दिव्यांग, अंथरुणाला खिळलेल्या मतदारांना बजाविता आला अधिकार मतदान करता आल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर झळकले हास्य लातूर, दि. 02 : मतदार यादीमध्ये नाव असलेल्या दिव्यांग आणि 85 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगाने गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार लातूर (अ.जा.) लोकसभा मतदारसंघातील गृह मतदानाला आज (दि. 2) पासून सुरुवात झाली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी उदगीर विधानसभा … Read more