मुंबई शहर जिल्ह्यात मतदार जनजागृती अभियानांतर्गत सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद     

मुंबई, दि. १ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत मुंबई शहर जिल्ह्यात विविध ठिकाणी मतदार जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई शहर संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आज 1 मे 2024 रोजी मतदार जनजागृती अभियानांतर्गत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या सायकल रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकसभा … Read more

देशाच्या विकासात महाराष्ट्राचे मोलाचे योगदान – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

E0A4B8E0A4BEE0A4AFE0A495E0A4B2 E0A4B0E0A585E0A4B2E0A580 E0A5A7 E0A5AB E0A5A8E0A5A6E0A5A8E0A5AA scaled देशाच्या विकासात महाराष्ट्राचे मोलाचे योगदान – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई उपनगर, दि. 1 : राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही मोलाचे योगदान दिले आहे. लोकशाहीला अधिक मजबूत बनविण्यासाठी आपण सर्वांनी मतदानाच्या या प्रक्रियेत सहभागी होऊन 20 मे 2024 रोजी मतदानाचा हक्क बजावू या, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा … Read more

राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र दिन साजरा

मुंबई, दि. १ : महाराष्ट्र राज्याच्या ६५व्या स्थापना दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आज गौरवगीत गायनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिवाजी पार्क येथील मुख्य शासकीय सोहळ्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे क्रीडाभवन येथे ६५ व्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम पार पडला.   यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक … Read more

६५ वा महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस : राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण            

Governor Ramesh Bais hoists national flag at Raj Bhavan 1 scaled ६५ वा महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस : राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण            

मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन मुंबई येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राष्ट्रगीत व राज्य गीत सादर करण्यात आले.  राज्यपालांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तसेच मुंबई पोलीस दलाचे अधिकारी व जवान उपस्थित होते. … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण  

1714541298500 scaled 6a7n19 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण  

सिंधुदुर्गनगरी, दि.1 (जि.मा.का): महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, उप जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, उपजिल्हाधिकारी शारदा पोवार, आरती देसाई, तहसिलदार प्रज्ञा काकडे,  जिल्हा नियोजन अधिकारी श्री बुधावले, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, माविमचे जिल्हा व्यवस्थापक नितीन काळे, … Read more

महाराष्ट्र दिनी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण        

E0A4AEE0A4BE. E0A4AAE0A4BEE0A4B2E0A495E0A4AEE0A482E0A4A4E0A58DE0A4B0E0A580 E0A4A1E0A589. E0A4B8E0A581E0A4B0E0A587E0A4B6 E0A496E0A4BEE0A4A1E0A587 768x1024 ZAujJV महाराष्ट्र दिनी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण        

सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या स्थापना दिन सोहळ्याप्रसंगी मुख्य शासकीय समारंभात पोलिस परेड ग्राऊंड सांगली येथे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, उपवनसंरक्षक निता कट्टे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, अतिरिक्त पोलीस … Read more

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

WhatsApp Image 2024 05 01 at 10.13.21 AM EMmlyN पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

सोलापूर, दिनांक 1(जिमाका):- महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त तसेच कामगार दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. व जिल्ह्यात विविध धर्माचे, पंथाचे, वंशाचे, जातीचे तसेच विविध प्रदेशाचे लोक बंधुभावाने, सलोख्याने एकतेच्या भावनेने नांदत असल्याचे सांगून सर्वजण मिळून राष्ट्रीय ऐक्य अधिक मजबूत करुया, असे आवाहन ही यावेळी त्यांनी केले.  या कार्यक्रमास जिल्हाधिकारी … Read more

शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली रॅलीच्या माध्यमातून मतदान जनजागृती

नाशिक, दिनांक १ मे, २०२४ (जि. मा. का. वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित करण्यात आलेल्या मतदान जनजागृती रॅलीला शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना राष्ट्रीय मतदानाची शपथ दिल्यानंतर पोलीस कवायत मैदान येथूल रॅलीस प्रारंभ झाला. … Read more

लातूर येथे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना  

E0A4AEE0A4B9E0A4BEE0A4B0E0A4BEE0A4B7E0A58DE0A49FE0A58DE0A4B0 E0A4A6E0A4BFE0A4A8 01.05 2 nEkrdX लातूर येथे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना  

लातूर, दि. ०१ : महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. तसेच उपस्थितांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, … Read more

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण

WhatsApp Image 2024 05 01 at 10.18.56 AM 1 0Aiaah महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण

सोलापूर, दि. 1 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या दिनानिमित्त नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख,जिल्हा नियोजन अधिकारी … Read more

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी – जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी

सातारा, दि. १ :- मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. मतदानाचा दिवशी प्रत्येक कुटुंबातील पात्र नागरिक मतदान करतील  यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक तयार करुन 50 ते 60 कुटुंबाच्या मागे शासकीय प्रतिनिधी नियुक्त करावा. या प्रतिनिधींनी मतदानाच्या आदल्या दिवशी व मतदानाच्या दिवशी जबाबदारी दिलेल्या प्रत्येक कुटुंबाला भेट देवून त्यांना मतदानासाठी … Read more

महाराष्ट्रदिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण  

Photo1 aUBVfV महाराष्ट्रदिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण  

नागपूर, दि. 1 : येथील कस्तुरचंद पार्क मैदानावर आयोजित महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी पोलीस बँडपथकाने राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीताचे सादरीकरण केले. पथसंचलनात सहभागी होणाऱ्या विविध पथकांचे त्यांनी निरीक्षण केले. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, विशेष पोलीस आयुक्त छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, … Read more

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६५ वा दिन उत्साहात साजरा ; जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण

नांदेड दि. १ :- महाराष्ट्र राष्ट्र स्थापनेच्या ६५ व्या दिनाचा मुख्य शासकीय समारोह मोठ्या उत्साहात वजीराबाद येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर सकाळी ८ वाजता साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनी समस्त जिल्हावाशियांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी … Read more

‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची मुलाखत                        

मुंबई, दि. १ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ कार्यक्रमात लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची ‘कायदा व सुव्यवस्था’ या विषयावर शुक्रवार दि.३ मे २०२४ आणि शनिवार दि.४ मे २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर‘ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत विभागीय माहिती कार्यालय लातूरचे सहायक … Read more

महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

मुंबई, दि. १ : महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हाधिकारी एकनाथ नवले, जिल्हा नियोजन अधिकारी गुलाबदास सुपेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिक, स्वतंत्र सेनानी, नागरिक, अधिकारी, कर्मचारी या सर्वांना महाराष्ट्र दिन तसेच … Read more