Chitra Wagh | ऐसी कोई सगा नहीं, जिसे उद्धवजीने ठगा नही; चित्रा वाघांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: आज आणि उद्या (17 जुलै आणि 18 जुलै) कर्नाटकच्या बंगळूर शहरामध्ये विरोधी पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला जवळपास 24 राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

तर राज्यातून या बैठकीला आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हजेरी लावणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना फसवलं असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

The headmaster of the goons is going from Kalanagar to the meeting of the opposition – Chitra Wagh

आज आणि उद्या होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीवर चित्रा वाघ  यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. विरोधी यांच्या बैठकीला गुंडांचे मुख्याध्यापक (उद्धव ठाकरे) कलानगरमधून जात आहे, असं चित्रा वाघ यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ट्विट करत चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, “उद्धव ठाकरेंनी फसवला नाही, असा त्यांचा एकही नातेवाईक काही नाही. विरोधी पक्षाचे सगळे ठग आज आणि उद्या बंगळुरूमध्ये जमणार आहे. या बैठकीत गुंडांचे मुख्याध्यापकही कलानगरमधून जात असल्याचं बोललं जात आहे. ज्यांना पक्ष आणि आपली माणसं संभाळता आली नाही, त्यांनी विरोधकांची एकजुट बांधणी सुरू केली आहे. ही #महाबंधनाची महाआघाडी आहे.”

दरम्यान, बंगळुरूमध्ये होणाऱ्या विरोधी पक्षाच्या बैठकीला आज शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळाली आहे. शरद पवार आज मुंबईमध्येच राहणार आहे. आज ते आपल्या आमदारांशी चर्चा करणार आहे. तर, उद्या ते विरोधी पक्षाच्या बैठकीला हजर (Chitra Wagh) असतील.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3K0XLt9