Covid-19 | चिंताजनक! देशात एका दिवसात कोरोना रूग्णसंख्येत मोठी वाढ; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिला सतर्कतेचा इशारा

Coronavirus Updates | नवी दिल्ली : सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. दररोज नवीन कोरोना सक्रिय रूग्ण संख्येने देखील वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 6, 155 नवे रूग्ण आढळले आहेत. तसंच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात 31,194 कोरोनाचे रूग्ण आहेत. त्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

तर देशात शुक्रवारी (7 एप्रिल) 6,050 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसंच एकाच दिवसात इतके रुग्ण आढळल्यानं सरकार अलर्ट मोडमध्ये आलं असून केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीत कोरोनाच्या व्यवस्थापनासाठी मनसुख मांडवियांनी राज्यांसह कोरोना लसीकरणासंदर्भात आढावा घेतला.

आरोग्यमंत्री मांडविया यांनी सांगितलं की, आता आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. तसंच सर्वांना सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. सध्या राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता सर्व राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना आरोग्य सुविधा, पायाभूत सुविधांचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. याचप्रमाणे नागरीकांना देखील काळजी घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –