MLC Election Result | आघाडीत बिघाडी; सत्यजित तांबेच्या नावावर अजित पवारांचा शिक्कामोर्तब

MLC Election Result | मुंबई : राज्यात 5 मतदारसंघाच्या निवडणुकांचा निकाल आज लागला आहे. त्यातील सर्वात महत्वाची आणि चुरशीची लढत म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक. या निवडणुकीमध्ये भाजपने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेवारीवर सत्यजीत तांबे आणि महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील त्यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळाली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असणाऱ्या नाशिक निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. नाशिक निवडणुकीत सत्यजीत तांबेंचाच वियज होणार असल्याचा विश्वास राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

“माझ्यासारख्या माणसानं काँग्रेससारख्या पक्षाबद्दल बोलणं योग्य नाही, पण सत्यजित तांबेंना जर काँग्रेसनं उमेदवारी दिली असती, तर असं काही घडलंच नसतं. त्यामुळे नंतर त्यांनी वेगळा निर्णय घेतला. त्यांचं आख्खं घराणं काँग्रेसच्या विचारांचं आहे. त्यामुळे सत्यजीत तांबे निवडून आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतील”, असे अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, काँग्रेसने सत्यजीत तांबेंना विरोध करत उमेदवारी न देता त्यांच्यावर कारवाई केली. महाविकास आघाडीतील पक्षांनी सत्यजीत तांबेंना विरोध करत शिवसेनेचा म्हणजेच महाविकास आघाडीने सत्यजीत तांबेंच्या विरोधात असणाऱ्या शुभांगी पाटलांना पाठिंबा दिला आणि आता अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्याने महाविकास आघाडीत मतभेद असल्याचे दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या