National Girl Child Day | राष्ट्रीय बालिका दिन केव्हा आणि कसा सुरू झाला?, जाणून घ्या

National Girl Child Day | टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये दरवर्षी 24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. मुलींना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. भारत सरकारने 2008 पासून या दिवसाची सुरुवात केली आहे. आपल्या समाजात मुलींना मुलांपेक्षा कमी समजले जाते. त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये संधी मिळत नाही. त्यामुळे मुलींना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी हा दिवस साजरा करायला सुरुवात झाली आहे.

दरवर्षी 24 जानेवारी रोजी बालिका दिन साजरा केला जातो. 24 जानेवारी भारताच्या इतिहासातील आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. 24 जानेवारी 1966 रोजी इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी पहिली महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. म्हणून 24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. महिलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हा दिवस साजरा करायला सुरुवात झाली होती.

देशातील मुलींना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. कारण आपल्या समाजात आजही काही ठिकाणी मुलींना मुलांपेक्षा कमी समजले जाते. मात्र, तसे नसून आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहे. मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने हा दिवस साजरा करायला सुरुवात केली आहे.

महिला आणि पुरुष यांच्यातील भेदभाव दूर करण्यासाठी भारत सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहे. यामध्ये ‘बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान’, ‘सुकन्या समृद्धी योजना’, ‘मोफत किंवा अनुदानित शिक्षण योजना’ इत्यादींचा समावेश आहे. भारतामध्ये 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. तर, 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो.

महत्वाच्या बातम्या