Nikhil Wagle | नवाब मलिक अजितदादांसोबत गेले तर ताबडतोब जामिनावर सुटतील – निखिल वागळे

Nikhil Wagle | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आर्थिक घोटाळा प्रकरणावरून तुरुंगात आहे. नवाब मलिक यांनी मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. आज (13 जुलै) मुंबई हायकोर्टानं त्यांचा हा जामीन फेटाळला आहे.

वैद्यकीय कारणास्तव आपल्याला जामीन मिळावा, अशी मागणी नवाब मलिक (Nawab Malik) यांनी जामीन अर्जातून केली होती. मात्र, कोर्टानं त्यांची ही मागणी फेटाळून लावली आहे. न्या. अनुजा प्रभूदेसाई यांनी यावर निर्णय दिला आहे. त्याचबरोबर येत्या दोन आठवड्यानंतर त्यांच्या जामिन्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्यात येणार आहे.

If Nawab Malik goes with Ajit Pawar, he will become a minister

मुंबई हायकोर्टाने नवाब मलिक (Nawab Malik) यांचा जामीन फेटाळल्यानंतर निखिल वागळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “नवाब मलिक अजितदादासोबत (Ajit Pawar) गेले तर ताबडतोब जमिनीवर सुटतील”, असं निखिल वागळे यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटलं आहे.

निखिल वागळे यांच्या या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहे. नवाब मलिक अजितदादा सोबत गेले तर ते मंत्रीही होतील, असं एका वापरकर्त्यांनं कमेंट करत म्हटलं आहे.

दरम्यान, माझं एक मूत्रपिंड निकामी झाला असून ते फक्त 60 टक्के काम करण्याच्या स्थितीत आहे. ही स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्यामुळे यावर योग्य पद्धतीने उपचार करण्यासाठी जामीन मंजूर करण्यात यावा, अशी मागणी नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आपल्या याचिकेतून केली होती.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/46JElTl