नामनिर्देशन पत्रे भरणाऱ्या उमेदवारांच्या मिरवणुकांवर काटेकोरपणे लक्ष ठेवा

मुंबई, दि. २५ : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४’ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे भरण्याची लवकरच सुरुवात होत आहे. ही नामनिर्देशन पत्रे भरतेवेळी उमेंदवारासमवेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते येत असतात. ही बाब लक्षात घेता या मिरवणुकांमध्ये सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या, वाहने, केला जाणारा खर्च इत्यादींची छायाचित्रांसह व व्हिडिओ छायाचित्रणासह सुयोग्य नोंद ठेवण्याचे निर्देश … Read more

लातूर जिल्ह्याच्या प्रवेशद्वारात मतदानाचा जागर !

WhatsApp Image 2024 04 25 at 6.47.28 PM 5jUO5F लातूर जिल्ह्याच्या प्रवेशद्वारात मतदानाचा जागर !

लातूर, दि. २५ : मागील लोकसभा निवडणुकीमध्ये तुलनेने कमी मतदान झालेल्या मतदान केंद्राच्या परिसरात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांच्या संकल्पनेतून प्रभावी मतदार जागृती मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेचा भाग म्हणून जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या मुरूड (ता. लातूर) येथे मतदार जागृतीसाठी प्रशासनाने रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी गावातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात … Read more

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

मुंबई, दि. २५ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई उत्तर पूर्व, २९- मुंबई उत्तर मध्य या चार मतदारसंघात शुक्रवार दि. २६ एप्रिल २०२४ पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. त्यासाठीची तयारी संबंधित चारही लोकसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा निवडणूक यंत्रणेने केली असल्याची माहिती … Read more

मतदान टक्केवारी वाढण्यासाठी समन्वयाने काम करावे – विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर

WhatsApp Image 2024 04 25 at 6.20.54 PM eOjOEk मतदान टक्केवारी वाढण्यासाठी समन्वयाने काम करावे – विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर

रायगड, दि.२५ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये रायगड लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे डॉ. कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी … Read more

लोकसभेच्या ५० टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग यंत्रणा

WhatsApp Image 2024 04 25 at 4.29.33 PM 1 लोकसभेच्या ५० टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग यंत्रणा

नांदेड, दि. २५: जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी ३ हजार ४१ मतदान केंद्रे आहेत. त्यातील संवेदनशील केंद्रांसह ५० टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग यंत्रणा बसविली आहे. ५० टक्के मतदान केंद्रांवरील मतदानादिवशीची प्रत्येक हालचाल जिल्हाधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कार्यालयात बसून पाहता येणार आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघ येतात. नांदेड लोकसभा मतदारसंघात २ हजार ६२ मतदान … Read more

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबई, दि. २५: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’  कार्यक्रमातून सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज’ या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत शनिवार दि. २७ एप्रिल २०२४ रोजी आकाशवाणीची सर्व केंद्र तसेच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरुन सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित करण्यात … Read more

बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास केल्याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल

मुंबई, दि. २४ : बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास केल्याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत असल्याचा खुलासा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने केला आहे. बँकेचे व्यवहार सी.टी.एस. प्रणालीद्वारे होतात. त्यामुळे या बनावट धनादेशाची तपासणी संबंधित बँकांच्या अधिकारी/कर्मचारी यांनी योग्य प्रकारे केली नसल्याचे … Read more

मतदान जागृतीचा बॅटन घेऊन नवमतदार धावले!

नांदेड दि. २४ : आम्ही आपण मतदान करावे या प्रचारासाठी धावतोय. तुम्ही फक्त मतदान केंद्रापर्यंत चालत या, असे आवाहन जिल्ह्यातील तरुणांनी नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे. पोलीस परेड ग्राउंडवर मतदान जागृतीचा बॅटन घेऊन नव मतदारांनी रिले स्पर्धेत भाग घेतला. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने नांदेड जिल्हा स्वीप कक्षाने मतदान तरुण युवा मतदारांमध्ये मतदानाचे महत्त्व वाढावे, … Read more

मुंबईसह महाराष्ट्राला मतदानाच्या टक्केवारीत अग्रस्थानी आणावे – राज्य विशेष निरीक्षक धर्मेंद्र सिंग गंगवार

मुंबई, दि. 24 : महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात मतदानाची टक्केवारी वाढवून मतदानात मुंबई उपनगर जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रालाही अग्रस्थानी आणावे, असे आवाहन लोकसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले राज्य विशेष निरीक्षक धर्मेंद्रसिंग गंगवार यांनी येथे केले. लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. … Read more

स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमने पोलिसांच्या मदतीने काटेकोरपणे वाहन तपासणी करावी – मुंबई शहर जिल्ह्याचे आदर्श आचारसंहिता समन्वय अधिकारी उन्मेष महाजन यांचे निर्देश

मुंबई, दि. 24 : स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमने (SST) वाहन तपासणी करण्यावर प्रामुख्याने भर द्यावा, वाहनतपासणी दरम्यान रोख रक्कम, मद्यसाठा, भेटवस्तू व शस्त्रसाठा पोलिसांच्या मदतीने तपासावा. संपूर्ण तपासणीचे छायाचित्रण करण्याबाबत योग्य दक्षता घ्यावी. स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमच्या कामकाजावर निरीक्षक (खर्च) देखरेख ठेवणार आहे. तसेच वेळोवेळी त्यांच्या कामाचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे प्रत्येक टीमने सतर्क राहून त्यांनी त्यांच्या … Read more

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड

मुंबई, दि. २४ : लोकसभा निवडणूकीची आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली असून राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी तथा ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड यांनी केले आहे. लोकसभा निवडणूक प्रक्रिया आणि राजकीय पक्षांनी पाळावयाची आचारसंहिता याबाबत माहिती देण्यासाठी ३१-मुंबई दक्षिण लोकसभा … Read more

विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी घेतला मुंबई उपनगर जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा

मुंबई, दि. 24 : जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्व निर्देशांचे पालन करून त्यांना नेमून दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या. मुंबई उपनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज विभागीय आयुक्त श्री. … Read more

मालवणमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

sindhu2 1024x684 g4MLDj मालवणमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

१ हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा समावेश वाळूशिल्प स्पर्धा, बीच रन स्पर्धेचे आयोजन सिंधुदुर्ग दि.24 (जिमाका): सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7 मे रोजी लोकसभेसाठी मतदान होणार आहे. या मतदानात जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घेऊन लोकशाही बळकट व्हावी या उद्देशाने जिल्हाधिकारी किशारे तावडे यांच्या संकल्पनेतून  SVEEP (Systematic Voters Education & Electoral Participation) अंतर्गत मतदान जनजागृती कार्यक्रमाचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘स्वीप’ अंतर्गत मालवण … Read more

मतदारांनी सक्रिय सहभाग घेत मतदानाचा टक्का वाढवावा – मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम

२६ एप्रिल रोजी मतदान; १६ हजार ५८९ मतदान केंद्र              मुंबई, दि. 24 : महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदार संघामध्ये दि. 19 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये मतदारांनी चांगला सहभाग नोंदवत मतदान केले असून निर्भय आणि शांततापूर्ण वातावरणात  मतदान प्रक्रिया पार पडली आहे. … Read more

‘दिलखुलास’मध्ये अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची शुक्रवारी मुलाखत

मुंबई, दि. २४ : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ अमरावती जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’  कार्यक्रमात शुक्रवार दि. २६  एप्रिल २०२४  रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत मुलाखत प्रसारित होणार आहे. … Read more