PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचला आहे. आता शेतकरी 13 व्या हप्त्याची वाट बघत आहे. तेराव्या हप्त्यासाठी केंद्र सरकारने थोडे कडक नियम केले आहेत. कारण प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या बाराव्या हप्त्यासाठी काही शेतकऱ्यांनी बनावटी कागदपत्रे बनवून ही रक्कम मिळवली आहे. 2018 मध्ये सुरू झालेल्या योजनेचा आतापर्यंत तब्बल 11 कोटी शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचला आहे. आता शेतकरी तेराव्या हप्त्याची वाट बघत आहे. तेराव्या हप्त्यासाठी केंद्र सरकारने थोडे खडक नियम केले आहेत. कारण प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या बाराव्या हप्त्यासाठी काही शेतकऱ्यांनी बनावटी कागदपत्रे बनवून ही रक्कम मिळवली आहे. 2018 सुरू झालेल्या योजनेचा आतापर्यंत तब्बल 11 कोटी शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर तेरावा हप्ता पाठवू शकते. तेराव्या हप्त्यामध्ये देशातील आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवले जाणार आहे. मात्र, सरकारकडून तेरावा हप्ता कधी मिळेल, यासाठी कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
गेल्या वर्षी एक जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेचा एक हप्ता पाठवला होता. यामध्ये दहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर वीस हजार कोटी रुपये पाठवण्यात आले होते. दरम्यान, तेरावा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना जमिनीची पडताळणी करणे अनिवार्य केले आहे. त्याचबरोबर या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनाही केवायसी करणे देखील अनिवार्य आहे.
प्रधानमंत्री योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही 155261 किंवा 1800-115526 या हेल्प नंबर क्रमांकावर कॉल करून करू शकतात. या क्रमांकावर कॉल करण्यासाठी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारण्यात येत नाही. हा फोन कॉल शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे टोल फ्री आहे.
महत्वाच्या बातम्या
- Rishabh Pant | ऋषभ पंतच्या प्रकृतीवर उर्वशीनंतर तिच्या आईने दिली प्रतिक्रिया
- Kapil Dev | “विश्वचषक जिंकायचा असेल तर…” ; कपिल देव यांनी मांडलं स्पष्ट मत
- Tarak Mehta ka Ulta Chashma | टप्पुनंतर दिग्दर्शकाने ‘या’ कारणामुळे सोडला शो
- Hair Care Tips | केसांमध्ये व्हॉल्युम निर्माण करण्यासाठी करा ‘या’ टीप्स फॉलो
- Car With Airbags | ‘या’ कारमध्ये उपलब्ध आहेत 6 एअरबॅग, जाणून घ्या किंमत