Salil Kulkarni | टीम महाराष्ट्र देशा: प्रसिद्ध गायक आणि संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या गाणी आणि संगीताचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. सलील कुलकर्णी यांनी ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपट निर्माण केले आहे. सलील कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमी त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून चर्चेत असतात. त्यांनी नुकतीच एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी संत रामदास स्वामी यांचा अभंग पोस्ट केला आहे.
सलील कुलकर्णी यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये समर्थ रामदासांचा अभंग पोस्ट केला आहे. सलील कुलकर्णी यांनी “आदरेंविण बोलणें | न पुसतां साक्ष देणें !
निंद्य वस्तु अंगीकारणें | तो येक मूर्ख!!”
हा संत रामदास स्वामी यांचा अभंग शेअर केला आहे.
Salil Kulkarni | म्हणजे पुण्यात मूर्ख काय सगळे? सलील कुलकर्णी म्हणतातhttps://t.co/QSXJNytVqU
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) January 31, 2023
सलील कुलकर्णी यांच्या या पोस्टवर वापरकर्ते वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत आहे. यामध्ये एक युजर कमेंट करत म्हणाला, “म्हणजे पुण्यात मूर्ख काय सगळे”. त्याच्या या कमेंटवर प्रतिक्रिया देत सलील कुलकर्णी म्हणाले, “सोशल मीडियावर बहुतेक सगळे आहेत”. यावरून सलील कुलकर्णी यांनी या प्रतिक्रियेच्या माध्यमातून सगळ्या पुणेकरांना मूर्ख म्हटल्याचा, अंदाज बांधला जात आहे.
प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णी हे नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य करत असतात. ते सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. सलील कुलकर्णी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सलील कुलकर्णी वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे मांडत असतात. अशात सलील कुलकर्णी यांनी फेसबुकवर शेअर केलेली पोस्ट चर्चेचं कारण ठरली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Travel Tips | फेब्रुवारी महिन्यात फिरायला जाण्यासाठी ‘ही’ ठिकाणं आहेत सर्वोत्तम
- Beetroot Benefits | बीटाच्या नियमित सेवनाने त्वचेवरील ‘या’ समस्या होतील दूर
- Sayali Sanjiv | वाढदिवस ऋतुराज गायकवाडचा अन् सेलिब्रेशन केलं सायली संजीवनं
- Toyota Car | टोयोटा अर्बन क्रूजर हायरायडर CNG व्हेरियंटमध्ये लाँच, जाणून घ्या सविस्तर
- Weather Update | थंडीचा कडाका वाढणार, हवामान विभागाकडून अलर्ट