Sanjay Raut | “तुम्ही लाचार, लोचट आणि मिंधे आहात” : संजय राऊत

Sanjay Raut । मुंबई : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. त्यानंतर काल शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी (Eknath shinde ) चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घाव अशी मागणी केली होती. तसंच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील उद्धव ठाकरेंना साद देत एक व्हिडिओ शेयर करत आवाहन केलं होत. शिवसेनेचा बाबरी मशीद पाडण्याशी कोणताही संबंध नसल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यामुळे या विषयी जोरदार शब्दांत ठाकरेंनी पाटलांवर निशाणा साधला. दरम्यान, संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी आज पुन्हा एकदा त्यांच्या मागणीचा पुनरुच्चार केला. याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर देखील हल्लाबोल केला आहे.

राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल ( Sanjay Raut’s attack on Eknath Shinde )

संजय राऊत म्हणाले कि, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती परंतु त्याबाबत अजूनही आमंलबजावणी झाली नाही. जर तुम्ही स्वतःला हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणून मिरवताय तर मग बाळासहेबांच्या अपमानानंतर तुम्ही शांत का? असा सवाल देखील राऊतांनी शिंदेंना विचारला आहे. तसचं बाळासाहेबांचा अपमान करणारे तुमच्यासोबत मंत्रिमंडळात आहेत आणि तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसत असाल तर तुम्ही लाचार, लोचट आणि मिंधे आहात. महाराष्ट्र तुम्हाला मिंधे म्हणत असेल तर त्यात महाराष्ट्राचं काय चुकलं. तुम्ही केवळ नाराजी कसली व्यक्त करताय? मुळात बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये अशा शब्दांत राऊतांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला.

संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान ( Sanjay Raut challenge to the Chief Minister )

पुढे संजय राऊत म्हणाले की, जर बाळासाहेबांचा कोणीही अपमान करत असेल तर तुम्ही आणि तुमची ४० जणांची टोळी काही भूमिका घेणार आहे का? तुम्ही या प्रकरणावर फक्त नाराजी व्यक्त करणार की, अपमान करणाऱ्याच्या ढुंगणावर लाथा मारणार आणि जर ते जमत नसेल तर बाळासाहेबांचं नाव घेऊ नका. तसचं लवकरात लवकर चंद्रकांत पाटलांचा राजीनामा मागा आणि मग लोकांना सांगा की, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आहात. तुम्हाला हे जमत नसेल तर स्वतः राजीनामा द्या. अशा शब्दांत राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधत आव्हान केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-