Shivsena | “बाप तैसा बेटा, भरलो…”; शिंदे गटाची खैरे पिता-पुत्रांवर बोचरी टीका

Shivsena |  औरंगाबाद : औरंगाबादचे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी खासदार आणि नेते चंद्रकांत खैरे यांचे पुत्र माजी नगरसेवक आणि युवासेनेचे पदाधिकारी ऋषिकेश खैरे हे एका ऑडिओ क्लिप प्रकरणावरून वादात सापडले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बदली करून देण्यासाठी एक व्यक्तीकडून त्यांनी दोन लाख रुपये घेतल्याचे या ऑडिओ क्लिपमधून उघड होत आहे. मात्र संबंधित व्यक्तीचे काम न झाल्याने तो व्यक्ती आता ऋषिकेश खैरेंकडे पैसे परत करण्याची मागणी करत आहे.

या प्रकरणावरून आता भाजप शिंदे गटाने चंद्रकांत खैरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका सुरू केली आहे. या प्रकरणावरून आता भाजपा आणि शिंदे गटाने चंद्रकांत खैरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका सुरू केली आहे. शिंदे गटाचे औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी खैरे पिता-पुत्रावर टीका केली आहे.

“एखाद्या कार्यकर्त्यांनी जर चार चाकी वाहन घेतले किंवा चांगले मोठे घर घेतलं तर त्याच्याकडे संशयाने पाहणारे चंद्रकांत खैरे आता यावर काय उत्तर देतील? यावरून एक गोष्ट लक्षात आली जे आडात आहे तेच पोहऱ्यात आले. युवा सैनिक घडवण्याची जबाबदारी असणारा पदाधिकारी खऱ्या अर्थाने युवकांना काय आदर्श देणार? हा एक चर्चेचा विषय ठरतो” असंही राजेंद्र जंजाळ यांनी म्हणाले आहेत.

Rajendra Janjal Shivsena | "बाप तैसा बेटा, भरलो..."; शिंदे गटाची खैरे पिता-पुत्रांवर बोचरी टीका

महत्वाच्या बातम्या