Ajit Pawar | अजित पवार की जयंत पाटील, कोण असणार राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पदासाठी दावेदार? पवारांनी स्पष्ट सांगितलं

Ajit Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मला विरोधी पक्षनेते पद नको, मला या जबाबदारीतून मुक्त करा, असं वक्तव्य अजित पवार यांनी जाहीर कार्यक्रमात केलं आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

I was not interested in the post of Leader of Opposition – Ajit Pawar

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “विरोधी पक्षनेते पदामध्ये मला फारसा इंटरेस्ट नव्हता. मात्र, आमदारांच्या आग्रहामुळे मी हे पद स्वीकारलं. मी जवळपास एक वर्षापासून विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सांभाळत आहे. मात्र, मला आता यातून मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या.”

“मला संघटनेची जबाबदारी द्या. त्यानंतर मी पक्ष कशा पद्धतीने चालवतो ते बघा. मी फक्त माझी इच्छा व्यक्त केली आहे. बाकी निर्णय घेण्याचा अधिकार हा नेतेमंडळींचा आहे. पक्षानं आतापर्यंत मला जी जबाबदारी सोपवली आहे, ती मी व्यवस्थित पार पडली आहे”, असंही ते (Ajit Pawar) यावेळी म्हणाले.

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहे. जयंत पाटलांना (Jayant Patil) डच्चू देऊन आगामी निवडणुकीत पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून अजित पवारांना पुढे यायचं आहे, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://maharashtradesha.com/ajit-pawar-or-jayant-patil-who-will-be-the-contender-for-the-post-of-chief-minister-of-ncp/?feed_id=45411