Ajit Pawar | उर्फी जावेद-चित्रा वाघ वादावर अजित पवारांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले…

Ajit Pawar | मुंबई: सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमी तिच्या विचित्र फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. अशात भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Vagh) यांनी उर्फी जावेद विरोधात पोलीस तक्रार केली आहे. त्यानंतर उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाला आहे. चित्रा वाघच्या टीकेला उत्तर देत उर्फी जावेदने इंस्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातून उत्तर दिले होते. त्यानंतर हा आवाज अधिकच पेटला होता. या सगळ्या प्रकरणावर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यात रंगलेल्या वादावर अजित पवार यांनी आपलं मत मांडले आहे. ते म्हणाले,”महिला महिलांमध्येच वाद सुरू आहे. या सगळ्या प्रकारात आम्ही कुणीच बोलत नाही आहोत. त्यामध्ये आम्ही भाग देखील घेतला नाही. उलट आम्ही महिलांना संधी देत आहोत. पण संधी दिल्यानंतर त्या संधीचं सोनं करायचं की त्याची माती करायची हे महिलांच्या हातात आहे.”

उर्फी जावेद विचित्र कपड्यांवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. उर्फीचा पेहरावा अयोग्य आहे. तिच्या कपड्यांचा समाज मनावर परिणाम होत आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. त्याचबरोबर चित्रा वाघ यांनी महिला आयोगाला नोटीस देखील पाठवली होती. त्यावर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती.

प्रत्येकाला काय परिधान करावे याचा अधिकार आहे. एखाद्या व्यक्तीने परिधान केलेले कपडे सर्वांनाच अश्लील वाटता असे नाही. त्यामुळे अशा बाबतीत आयोग वेळ वाया घालू शकत नाही, असं रूपाली चाकणकर त्यावेळी म्हणाल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या