IND vs SL | “नव्या खेळाडूंवर लक्ष…” ; सामन्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये राहुल द्रविड यांनी व्यक्त केले मतं

IND vs SL | पुणे: पुण्यात भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील दुसरा टी-20 सामना पार पडला. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) च्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या मालिकेची सुरुवात विजयाने केली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यामध्ये भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या सामन्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपले मत मांडले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेमध्ये आम्हाला नव्या खेळाडूंकडे लक्ष देण्याची संधी मिळाली आहे, असं ते या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले आहेत.

पत्रकार परिषदेमध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड बोलताना म्हणाले,”सध्या बहुतेक खेळाडूंचे लक्ष वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे वर्ल्ड कपकडे आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेमध्ये आम्हाला नव्या खेळाडूंकडे लक्ष देणे शक्य होत आहे.” हे वक्तव्य करत असताना राहुल द्रविड यांनी स्पष्टपणे कोणाचीही नाव घेतले नाही. पण त्यांचा कल संघातील मुख्य खेळाडूंकडेच होता. “संघातील त्या खेळाडूंचा काळ आता संपत आला आहे. दरम्यान नवीन खेळाडूंनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तर, काही खेळाडू अजूनही स्वतःला सिद्ध करत आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर विश्वास ठेवणे कधीही चांगले ठरू शकते,” असं देखील ते यावेळी म्हणाले.

दुसऱ्या सामन्याच्या पराभवाबद्दल बोलताना राहुल द्रविड म्हणाले,”तो दिवस आमचा नव्हता. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णयाला मी समर्थन केले. पण लक्ष्याचा पाठलाग करत असताना आम्ही सुरुवातीलाच विकेट्स गमावले. पण अखेरच्या षटकापर्यंत आम्ही खेळत राहिलो. सुरुवातीचे फलंदाज जर टिकले असते, तर या सामन्याचा निर्णय वेगळा असता.”

भारत आणि श्रीलंका यांच्यामधील टी-20 मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना 7 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. टीम इंडियाचे दुसऱ्या सामन्यातील प्रदर्शन पाहता, भारतीय संघामध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या खेळाडूंचा समावेश असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या