Ashish Deshmukh | आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

Ashish Deshmukh | नागपूर: काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून 6 वर्षासाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. आशिष देशमुख यांचं यापूर्वी काँग्रेसमधून निलंबन करण्यात आलं होतं. मात्र, आता त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. आशिष देशमुख यांना येत्या निवडणुकीमध्ये भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्यामुळे त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Ashish Deshmukh expelled from Congress

गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांच्या भेटीस  गेले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. या पार्श्वभूमीवर आशिष देशमुख यांची सहा वर्षासाठी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे.

“उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या आमदारांवर अपात्रतेची वेळ येऊ देणार नाही. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहे आणि महाविकास आघाडी तुटणार आहे”, असा दावा आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केला आहे.

दरम्यान, आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3MQUyhE