Ashish Shelar । “संजय हा शब्द शिवीसारखा वाटतो”; आशिष शेलारांची संजय राऊतांवर खोचक टीका

Ashish Shelar । मुंबई : सध्या खासदार संजय राऊत (Sanajy Raut ) यांच्यावर भाजप आणि शिंदे गटातील नेत्याकडून जोरदार टीका टिपणी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर राऊतांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेवर भाजपाकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. तसंच काल (२० एप्रिल ) एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी राऊतांना टोला लगावत त्यांनी सकाळचे अभंग बंद करावे, असं विधान केलं होतं. त्यानंतर आता भाजपाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनीही संजय राऊतांवर खोचक टीका केली आहे.

काय म्हणाले आशिष शेलार ( What did Ashish Shelar say)

आज (२१ एप्रिल ) मुंबईत एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे. त्यावेळी शेलार म्हणाले आताच स्वप्नील सावरकरांनी उदय निरगुडकरांचा परिचय करून देताना म्हटले की, ‘ज्यांच्या आजोबांचा सावरकांशी परिचय होता, त्या नातवाने सावरकरांवर पुस्तक लिहिलं ते निरगुडकर कुठं आणि दुसरीकडे ज्यांच्या आजोबांनी सावकरांचा अपमान केला म्हणून मणिशंकर अय्यर यांना जोडे हाणले, ते आदित्य ठाकरे कुठं’. त्यामुळेच मला निरगुडकर श्रेष्ठ वाटतात. निरगुडकरांनी घेतलेल्या भूमिकेचा व्यक्तीच्या माध्यमातून परिचय करून द्यायचा असेल, तर त्यांनी महाभारतातल्या संजयची भूमिका पार पाडली आहे, असं मी म्हणेल. पण आजकाल संजय हा शब्द शिवीसारखा वाटतो. मी सर्वच संजय बद्दल बोलत नाही. सकाळी साडेनऊ वाजता येणाऱ्या संजय बद्दल बोलतोय, अशी खोचक टीक आशिष शेलार यांनी राऊतांनवर केली आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील संजय राऊतांवर जोरदार शब्दात हल्लाबोल केला होता. त्यावेळी फडणवीस म्हणाले की, राजकारणातील कटुता संपवायची असेल तर संजय राऊतांनी सकाळचे अभंग बंद करायला हवे, तरच राज्यातील राजकीय वातावरण शुद्ध होईल. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. तर आज अजित पवार यांनी देखील कोण संजय राऊत असा प्रश्न माध्यांमांशी बोलताना उपस्थित केल्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-