आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची जेईई परीक्षेमध्ये उत्तुंग भरारी

E0A4B5E0A4BFE0A4A6E0A58DE0A4AFE0A4BEE0A4B0E0A58DE0A4A5E0A58DE0A4AFE0A4BEE0A482E0A49AE0A587 E0A4B8E0A581E0A4AFE0A4B6 1 1024x885 vTb7bo आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची जेईई परीक्षेमध्ये उत्तुंग भरारी

चंद्रपूर, दि. 27 : एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय चंद्रपूर अंतर्गत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांकरीता मिशन शिखर उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना जेईई/नीट/सीईटी/एनडीए/सीएलएटी अशा विविधि परिक्षेचे मोफत मार्गदर्शन प्रशिक्षक / शिक्षक यांच्या मदतीने दिले जाते. दिनांक 24 एप्रिल 2024 ला जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये मिशन शिखर मधील 5 आदिवासी विद्यार्थी पात्र झाले आहेत.  यात सुनिता श्यामराव मेश्राम, रा. जिवती (69.14 टक्के),  … Read more

पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यानी केली मतदान जनजागृती; पथनाट्याने अक्कलकोटकरांचे वेधले लक्ष..  

सोलापूर, दि. 27 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकसाठी भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार मतदान जनजागृती, तसेच मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयाच्या  निवडणूक साक्षरता क्लबच्या विद्यार्थ्यानी अक्कलकोट शहरातील बस स्थानकासमोरील मुख्य चौकात मतदान का आवश्यक आहे, सुयोग्य उमेदवार कसा निवडावा याबाबी पथनाट्याच्या माध्यमातून लोकांसमोर मांडल्या. यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त … Read more

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४- दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात अंदाजे ६२.७१ टक्के मतदान

मुंबई, दि. २७ : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघांमध्ये काल मतदान पार पडले. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६२.७१ टक्के मतदान झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :   वर्धा : ६४.८५ % अकोला : ६१.७९ % अमरावती : ६३.६७ % बुलढाणा : ६२.०३ % हिंगोली … Read more

बोरिवलीमध्ये दिव्यांगांना मिळाली सुविधा ॲप आणि मतदान केंद्रांवरील सुविधांची माहिती

मुंबई उपनगर, दिनांक २७: 152 बोरीवली विधानसभा मतदार संघाच्यावतीने दिव्यांग मतदारांसाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 प्रवेश योग्य आणि सर्वसमावेशक होण्याच्या दृष्टीने त्यांना सक्षम ॲप तसेच मतदान केंद्रावर त्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या इतर सोयीसुविधांची माहिती देण्यात आली. या मेळाव्याला उपस्थित दिव्यांग मतदारांना सहायक निवडणुक निर्णय अधिकारी शिल्पा करमरकर यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्यास अतिरिक्त सहायक … Read more

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी रविंदर सिंधू खर्च निरीक्षक

मुंबई, दि.२७ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील ३० दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी मा.भारत निवडणूक आयोगाकडून खर्चविषयक केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून रविंदर सिंधू (आयआरएस) यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी  संजय यादव यांनी दिली आहे. निवडणूक खर्च निरीक्षक श्री.सिंधू यांचा निवासाचा पत्ता सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथील कक्ष … Read more

निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून खर्च निरीक्षक नकुल अग्रवाल हे २४ कल्याण लोकसभा मतदारसंघात दाखल

ठाणे, दि. 27 (जिमाका) : 24 कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी श्री. नकुल अग्रवाल (IRS) यांची निवडणूक खर्च निरिक्षक म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत ‍निवडणूक आयेगाने त्यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. श्री. नकुल अग्रवाल हे भारतीय महसूल सेवेतील 2011 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभासंघाकरिता … Read more

निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून खर्च निरीक्षक चित्तरंजन धंगडा माझी हे २३ भिवंडी लोकसभा मतदारसंघात दाखल

ठाणे, दि. 27 (जिमाका) : 23- भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी श्री. चित्तरंजन धंगडा माझी (IRS) यांची निवडणूक खर्च निरिक्षक म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत ‍निवडणूक आयेगाने त्यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. श्री. चित्तरंजन धंगडा माझी हे भारतीय महसूल सेवेतील 2010 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांना भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभासंघाकरिता कामकाज … Read more

२८ – मुंबई उत्तर पूर्व उमेदवारांच्या खर्चाची काटेकोरपणे तपासणी करावी – केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) डॉ. सुनील यादव

28 E0A4AEE0A581E0A482E0A4ACE0A488 E0A489E0A4A4E0A58DE0A4A4E0A4B0 E0A4AAE0A582E0A4B0E0A58DE0A4B5 1 1024x682 २८ – मुंबई उत्तर पूर्व उमेदवारांच्या खर्चाची काटेकोरपणे तपासणी करावी – केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) डॉ. सुनील यादव

मुंबई उपनगर, दि. 27 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 28 – मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने उमेदवारांच्या खर्चाची काटेकोरपणे तपासणी करावी, असे निर्देश केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) सुनील यादव यांनी दिले. मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाच्या विक्रोळी येथील पिरोजशहा सांस्कृतिक सभागृहातील कार्यालयात आज सकाळी खर्च विभागांचे निरीक्षक डॉ. यादव यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. … Read more

इंडोनेशिया निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाने साधला मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याशी संवाद

IMG 4575 1024x683 2MsV2f इंडोनेशिया निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाने साधला मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याशी संवाद

मुंबई, दि.२७ : इंडोनेशिया देशाच्या निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयातील राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला भेट दिली.  यावेळी परिषद सभागृह येथे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याशी त्यांनी संवाद साधला. जगात सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत देशाची ओळख आहे.  भारत निवडणूक आयोगाच्या अंतर्गत राज्य निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय राज्यात लोकसभा २०२४ ची निवडणूक … Read more

सर्व शासकीय यंत्रणांनी एकमेकांशी उत्तम समन्वय साधून लोकसभा निवडणूका शांततेत पार पडतील या दृष्टीने काम करावे – केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक

ठाणे,दि.२७ (जिमाका) : देशात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून शेवटच्या पाचव्या टप्यातील निवडणुका येत्या २० मे २०२४ रोजी होत आहेत. ठाणे जिल्ह्यातील २३-भिवंडी , २४-कल्याण , २५-ठाणे या लोकसभा मतदारसंघातील निवडणुका नि:पक्षपातीपणे, शांततेत व भारत निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श आचारसंहितेचे पालन करुन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नोडल अधिकाऱ्यांनी गांभीर्याने काम करावे, … Read more

‘राष्ट्रीय बीज महोत्सवा’ला थाटात सुरुवात

Photo 1 2 1024x517 siGqUR ‘राष्ट्रीय बीज महोत्सवा’ला थाटात सुरुवात

नागपूर, दि. 27 :  मानवी जगण्याचा आधार असणारे पाणी, हवा आणि माती हे घटक शुद्ध व शाश्वत ठेवण्यासाठी समाज आणि कृषीक्षेत्राच्या परस्पर समन्वयातून महाबिजोत्सव व्हावा, अशा भावना प्रगतीशिल शेतकरी सुभाष शर्मा यांनी आज येथे व्यक्त केल्या. येथील वसंतराव नाईक कृषी विस्तार व्यवस्थापन शिक्षण संस्थेच्या (वनामती) स्व.वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित राष्ट्रीय बिजोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषणात … Read more

दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात अंदाजे ५९.६३ टक्के मतदान

मुंबई, दि. २६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडले असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५९.६३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे : बुलढाणा –  ५८.४५ टक्के अकोला – ५८.०९ टक्के अमरावती – ६०.७४ टक्के … Read more

चौथा टप्पा : उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर ३६९ अर्ज वैध

मुंबई, दि. २६ : राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे २०२४ रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ४४७ उमेदवारांचे ६१८ अर्ज दाखल झाले होते. आज या अर्जांची छाननी केल्यानंतर एकूण ३६९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत … Read more

नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत

नांदेड दि. २६ : लोकसभा मतदानादरम्यान आज रामतीर्थ येथे झालेल्या ईव्हीएम तोडफोडीनंतर या ठिकाणच्या व्हीव्हीपॅट व बॅलेट युनिट बदलण्यात आले. इव्हीएम फोडण्याच्या प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत झाले, अशी माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. आज निवडणूक मतदान सुरू असताना देगलूर विधानसभा क्षेत्रातील बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे एका मतदाराने ईव्हीएम मशीनची तोडफोड केल्याची घटना घडली. या घटनेमध्ये … Read more

मतदानाबाबत हाजुरी येथील दर्ग्यात जनजागृती

WhatsApp Image 2024 04 26 at 7.26.22 PM 1 mwnvc7 मतदानाबाबत हाजुरी येथील दर्ग्यात जनजागृती

ठाणे, दि. २६ (जिमाका) : हाजुरी येथील दर्गात मुस्लीम बांधवांच्या नमाज पठणानंतर स्वीप पथकाद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. येत्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले. मतदानाचा टक्का वाढावा व मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून दिनांक 20 मे रोजी सर्वांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. … Read more