Nana Patole | विधानसभा विरोधी पक्षनेता कोण? नाना पटोलेंनी स्पष्ट सांगितलं

Nana Patole | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. अजित पवारांनंतर कोण विरोधी पक्षनेता असेल?

याकडे सर्वांचे लक्ष लागलं असताना नाना पटोले (Nana Patole) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. नाना पटोले यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षनेता पदासाठी काँग्रेसच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचं दिसत आहे.

काल (20 जुलै) रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू तर 100 पेक्षा जास्त लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती मिळाली आहे.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नाना पटोले (Nana Patole) यांनी या दुर्घटनेचा मुद्दा उपस्थित केला. त्याचबरोबर यावेळी बोलत असताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Congress is playing its role as the opposition party – Nana Patole

इर्शाळवाडी दुर्घटनेचा मुद्दा उपस्थित करत असताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, “विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस आपली भूमिका बजावत आहे. त्याचबरोबर काँग्रेसनं सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. त्यामुळे कुणालाही चिंता करण्याची गरज नाही.”

दरम्यान, विरोधी पक्षनेता पदासाठी काँग्रेसनं हायकमांड आणि अध्यक्षांना पत्र लिहिण्याची माहिती मिळाली आहे. काँग्रेसकडं 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचं या पत्रात म्हटलं आहे. भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी हे पत्र हायकमांडला पाठवल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/44TgTRT