InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

News

दोन महिन्यासाठी नव्हे, तर पाच वर्षासाठी मंत्रिमंडळात समावेशाची आशा – एकनाथ खडसे

दोन महिन्यांसाठी मंत्रिमंडळात जाण्यासाठी स्वत: उत्सुक नव्हतो. पुढील काळात राज्यात भाजपची सत्ता आल्यास पाच वर्षांसाठी मंत्रिमंडळात समावेश होण्याची आशा आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी येथे सांगितले.जिल्ह्यातील बोदवड नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारल्यानंतर खडसेंनी मत व्यक्त केले.मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्रिपदे ही फक्त चार महिन्यासाठी आहेत. त्यातील दीड महिना हा निवडणुकीच्या आचारसंहितेत जाणार आहे. कमी कालावधीसाठी आपण मंत्री होण्यास इच्छुक नव्हतो.…
Read More...

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसापर्यंत ‘भगवी फौज’ तयार करण्याची रणनीती

तळागाळात पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी प्रत्येक गावातील प्रभागपातळीपर्यंत संघटनात्मक विस्तार करून पक्षबांधणी करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.त्यानुसार राज्यातील एक लाख प्रभागांमध्ये एक लाख शाखाप्रमुख, महिला संघटक व सव्वादोन लाख उपशाखाप्रमुख अशी सव्वाचार लाख पदाधिकाऱ्यांची ‘भगवी फौज’ तयार करण्याची रणनीती आखण्यात आली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या २७ जुलै या वाढदिवसापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.केवळ पक्षसंघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकांद्वारेच नव्हे तर…
Read More...

अजब न्याय! दाद मागायला आलेल्या शेतकऱ्यालाच केली अटक

दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळूनही कर्ज माफ न झाल्याने दाद मागण्यासाठी विधिमंडळात आलेल्या वाशिम येथील अशोक मनवर या शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली. ही घटना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत उपस्थित केल्यावर गदारोळ झाला.या शेतकऱ्याची तातडीने सुटका करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले.शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्रे दिली, तरी सरकारकडून बँक खात्यात रक्कम जमा न…
Read More...

बोगस जनावरे दाखवून चारा छावण्यांमध्ये होतोय घोटाळा- अशोक चव्हाण

राज्यातील काही भागातील विशेषत मराठवाडय़ातील भीषण दुष्काळाचे चटके शेतकरी व सर्वसामान्य जनता सोसत असताना सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून चारा छावण्यांमध्ये बोगस जनावरे दाखवून लाखो रुपयांचे अनुदान लाटले जात आहे, असा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. चारा छावण्यांमधील या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी अशी मागणी त्यांनी केली.मराठवाडय़ात शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांंनी स्वत:च्या स्वयंसेवी संस्था दाखवून मोठय़ा प्रमाणावर चारा छावण्या सुरु केल्या आहेत. मात्र त्यात…
Read More...

उपसभापतीपद शिवसेनेला तर विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला;सोमवारी घोषणा

विधान परिषदेचे उपसभापतिपद शिवसेनेकडे सोपविण्याचा आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला देण्याचा तोडगा काढण्यात आला.उपसभापतिपदाची निवडणूक आणि विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीची घोषणा सोमवारी केली जाणार आहे.राष्ट्रवादीने परिचारक यांना असलेला विरोध मागे घेतला. उपसभापतिपद हवे असल्यास परिचारक यांना असलेला विरोध मागे घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाला केले.आठवडाभरांच्या विविध बैठका आणि मध्यस्थीनंतर शिवसेना आणि काँग्रेसने आपापल्या भूमिकेत बदल केला. त्यानुसार विधान…
Read More...

…. म्हणून मुस्लिम समाजाशी जवळीक साधण्याचा भाजपचा प्रयत्न

विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुस्लीम समाजाशी जवळीक निर्माण करण्यासाठी मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षण देण्याच्या राजकीय खेळीची तयारी भाजपच्या गोटात सुरू आहे.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, एमआयएम आदी राजकीय पक्ष आणि अनेक मुस्लीम संघटनांनीही गेली काही वर्षे सातत्याने मुस्लीम आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. त्यातच अयोध्येत राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आल्याने आणि हिंदुत्वावर भर दिला गेल्याने नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील अनेक भागांमध्ये मुस्लिमांनी भाजपविरोधात…
Read More...

काय व्हायचं ते होऊद्या, मी राजीनामा देतो- उदयनराजे भोसले

काय व्हायचं ते होऊद्या मी खासदारकीचा राजीनामा देतो, सातारा लोकसभा मतदारसंघातली फेरनिवडणूक निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.राज्यातल्या इतर उमेदवारांनीही निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत. हा लोकशाहीचा घात आहे. निवडणूक आयोगाला जर ईव्हीएम एवढी तांत्रिकदृष्ट्या सक्षम वाटत असतील तर त्यांनी झालेले मतदान व मोजलेल्या मतदानात देशभरात जी तफावत आली त्याबाबत खुलासा केला पाहिजे अशीही मागणी उदयनराजेंनी केली आहे.निवडणूक आयोगाच्या…
Read More...

संत तुकारामांच्या पालखीला सोन्या, सुंदर बैलजोडीची मानवंदना

जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी रथाचे यावर्षी आषाढी पालखी सोहळ्यात सारथ्य करणा-या सोन्या, सुंदर या बैलजोडीने शारदा गजानन चरणी अनोखी मानवंदना दिली.देहूकडे प्रस्थान करण्यापूर्वी पुण्यामध्ये या बैलजोडीचे आगमन झाल्यानंतर मंडई मंडळातर्फे स्वागत व पूजन करण्यात आले.आंबेगाव बुद्रुक येथील प्रगतीशील शेतकरी रवींद्र बाळासाहेब कोंढरे पाटील यांच्या सोन्या आणि सुंदर या देखण्या बैलजोडीची निवड यंदा पालखी सोहळ्याकरीता करण्यात आली. प्रथमच चिठ्ठी निवड प्रक्रियेने दोन बैलजोडया निवडल्या गेल्या.…
Read More...

गाजावाजा करून जाहीर केलेली कर्जमाफी फसवी – धनंजय मुंडे

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या अखेरच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शेतकरी कर्जमाफीवरून सरकारला चांगलेच धारेवर धरले. फडणवीसांनी गाजावाजा करून जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचं मुंडे म्हणाले.मुंबईत माध्यमांशी बोलताना मुंडे यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केला.वाशीम जिल्ह्यातील अशोक मनवर नावाच्या शेतकऱ्याला कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर मुंबईत बोलवून कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिले होते. त्याच शेतकऱ्यांला अद्याप कर्जमाफी मिळाली नाही.मनवर हे एकमेव शेतकरी नसून…
Read More...

… दबलेल्या आवाजांना व्यक्त होण्याची तु हिंमत दिली- राज ठाकरे

"सोशल मिडीयावरील ट्रोल्सना तू ज्याप्रकारे रोखठोक उत्तर दिलंस, त्यामुळे अनेक दबलेल्या आवाजांना तू व्यक्त होण्यासाठीची हिंमत दिलीस, त्याबद्दल तुझं अभिनंदन" अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेत्री केतकी चितळेचं अभिनंदन केलं.केतकी चितळेवर काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावरील ट्रोल्सनी अत्यंत घाणेरड्या शब्दात टीका केली होती. त्या टीकेला केतकीने एका व्हिडिओ पोस्टद्वारे अत्यंत रोखठोक उत्तर दिलं.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी जितेंद्र ठाकरे…
Read More...