Potato Juice Benefits | चेहऱ्यावर बटाट्याचा रस लावण्याने मिळतात ‘हे’ फायदे

Potato Juice Benefits | टीम महाराष्ट्र देशा: बटाट्याचा वापर अनेक भाज्यांमध्ये केला जातो. बटाटा आपल्या आरोग्यासोबत चेहऱ्यासाठी देखील खूप फायदेशीर ठरू शकतो. बटाट्याच्या वापराने चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर होऊ शकतात. चेहऱ्यावरील समस्या दूर करण्यासाठी रसायनयुक्त उत्पादनांच्या ऐवजी तुम्ही बटाट्याचा वापर करू शकतात. कारण बटाट्याच्या रसामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. बटाट्याचा रस चेहऱ्याला लावल्याने पुढील समस्या दूर होऊ शकतात.

चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या कमी होते

बटाट्याच्या रसाच्या नियमित वापराने चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या कमी होऊ शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा बटाट्याच्या रसामध्ये दोन चमचे टोमॅटोचा रस आणि एक चमचा मध मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण तयार झाल्यावर तुम्हाला ते वीस ते तीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या कमी होते.

चेहऱ्यावरील काळे डाग दूर होतात

बदलत्या जीवनशैलीमुळे आणि पोषक आहाराचे अभावामुळे चेहऱ्यावर काळे डाग दिसायला लागतात. तुम्ही पण या काळा डागाच्या समस्येपासून त्रस्त असाल तर तुम्ही बटाट्याच्या रसाच्या मदतीने ही समस्या सोडवू शकतात. यासाठी तुम्हाला दोन चमचे बटाट्याच्या रसामध्ये थोडीशी मुलतानी माती मिसळून घ्यावी लागेल. तयार झालेले हे मिश्रण तुम्हाला अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक जाणवेल.

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात

चेहऱ्यावर बटाट्याचा रस लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला एक चमचा बटाट्याच्या रसामध्ये अर्धा चमचा ग्लिसरीन आणि एक चमचा दूध मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर कापसाच्या मदतीने तुम्हाला हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे लागेल. पंधरा ते वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या