Raj thackeray | त्र्यंबकेश्वर मंदिराची शंभर वर्षे जुनी परंपरा मोडीत काढू नये- राज ठाकरे

Raj thackeray | नाशिक : ३ मे पासून त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) मंदिराचा वाद सुरू आहे. कारण त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये हिंदू धर्मियांशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही. परंतु, ३ मे च्या रात्री काही तरुणांनी मंदिरांमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवलं असता त्यांच्यामध्ये वाद झाले तेव्हापासून हा वाद त्याठिकाणी पेटलेला पाहायला मिळतं आहे. राजकीय वर्तुळातून देखील या प्रकरणावरून टीका- टिपण्णी सुरू आहेत. तर आज (20 मे) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे नाशिक दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी या प्रकारणाबाबत प्रतिक्रिया देत सल्ला देखील दिला.

त्र्यंबकेश्वरमधील प्रथा थांबवणे योग्य नाही : राज ठाकरे

माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, या प्रकरणात गावच्या लोकांनी लक्ष द्यावंआणि निर्णय घ्यावा बाहेरच्यांनी यात पडू नये. असा सल्ला देखील त्यांनी दिला. तर “जी शंभर वर्षेची जुनी परंपरा आहे ती कोणीही मोडीत काढू नये” असं राज ठाकरे म्हणाले. याचप्रमाणे शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सोडवण्यात यावा. कोणीही आल्याने फरक पडतो का? आपला धर्म इतका कमकुवत आहे का? तुम्हाला या माध्यमातून दंगली हव्या आहेत का? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

दरम्यान, राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर देखील ताशेरे ओढत म्हटलं की, या गोष्टींना सोशल मीडिया कारणीभूत आहे. त्र्यंबकेश्वरची प्रथा जुनी आहे, हे समजते. धूप दाखवण्याची परंपरा आहे, त्यांनी धूप दाखवण्याचा प्रयत्न केला. मग एवढा गदारोळ कसा झाला? सोशल मीडियाच्या माध्यमातुन गैरसमज पसरवला जात आहे. म्हणून महाराष्ट्र पोलिसांना 48 तास द्या, दंगलीच्या घटना घडणार नाही, असं भाष्य देखील विधान राज ठाकरे यांनी यावेळी केलं. तसचं नको तिथं बोलण्यापेक्षा ज्या गोष्टी चुकीच्या घडत आहेत त्याठिकाणी बोला. भोंगे, माहीम दर्गा याविषयी बोलले पाहिजे. मी याविषयी बोलतो तेव्हा मात्र तुम्हाला दिसत नाही. परंतु आता मंदिरात प्रवेश नाही यावरून दंगली सुरू केल्या आहेत. असं देखील राज ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3pVQG5W