Raj Thackeray | “मग मी काय मंडप…”; मविआच्या रद्द झालेल्या सभावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray | नाशिक: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी नोटबंदी आणि त्र्यंबकेश्वर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर त्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र चालवलं आहे.

महाविकास आघाडीच्या दोन सभा रद्द झालेल्या आहे, असा प्रश्न राज ठाकरे (Raj Thackeray) यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देत राज ठाकरे म्हणाले, “मग मी काय मंडप टाकू”. राज ठाकरे यांच्या या उत्तरानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता दिसत आहे.

यावेळी बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नोटबंदीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे म्हणाले, “हा शासनाचा धरसोडपणा आहे. तज्ञांचा सल्ला घेऊन या सगळ्या गोष्टी केल्या असत्या तर ही वेळ आलीच नसती. कधीही आणायचं आणि कधीही बंद करायचं. जेव्हा दोन हजार रुपयांच्या नोटा आणल्या होत्या तेव्हा त्या एटीएम मशीनमध्ये जात नव्हत्या. म्हणजे त्या नोटा एटीएममध्ये जातात की नाही हे देखील तपासलं गेलं नव्हतं. हे असे निर्णय देशाला परवडणारे नसतात.”

दरम्यान, माध्यमांशी संवाद साधत असताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात झालेल्या प्रकरणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. “वर्षानुवर्ष तिथे जर ही परंपरा चालत असेल तर ती थांबवण्यात काही अर्थ नाही. महाराष्ट्रामध्ये अनेक मशिदी आणि मंदिर आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी हिंदू-मुस्लिम एकोप्याने राहतात.”

“महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मुस्लिम राहतात. मात्र, तिथे कधीच दंगली होत नाही. कारण ते पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रात राहतात आणि मराठी बोलतात. या ठिकाणी जे सामंजस्य आहे, ते विनाकारण बिघडवू नका. बहुसंख्य हिंदू असलेल्या देशांमध्ये जर ‘हिंदू खतरे मे हैं’ असं म्हटलं जात असेल, तर कसं होईल? निवडणुका जवळ आल्यावर हा धार्मिक वाद वाढत जाणार आहे”, असंही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3MkkoJj