Sanjay Raut | “मान कापली तरी…” ; भाजप प्रवेशाबाबत संजय राऊतांचं वक्तव्य

Sanjay Raut | मुंबई: तपास यंत्रणेचा दबाव टाकून विरोधकांना भाजपमध्ये प्रवेश करण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षावर सातत्याने होत असतो. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठीचा दबाव टाकण्यात आला असल्याचं बोलल्या जात आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या पक्षांतराचा मुहूर्त देखील जाहीर करून टाकला आहे. संजय राऊत 10 जून रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं राणे यांनी म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजप प्रवेशाबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “मान कापली गेली तरी शिवसेना सोडणार नाही. पक्षांतर करणे हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा छंद आणि व्यवसाय आहे आमचा नाही. महाराष्ट्रात असा एकही पक्ष उरलेला नाही ज्यामध्ये नार्वेकर गेलेले नाही.”

“कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी संविधान निर्माण केलं आहे. घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने नियमबाह्य वर्तन करू नये. त्याचबरोबर या संविधानाचा गैरवापर करू नये. कोर्टामध्ये चालवल्या जात असलेल्या खटल्यावर कोणीही न्यायमूर्ती समोर मुलाखती देत नाही. हे पहिले गृहस्थ आहेत जे न्यायमूर्ती समोर मुलाखती देतात. यांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे”, अशा खोचक शब्दात राऊतांनी  नार्वेकरांवर टीकास्त्र चालवलं आहे.

दरम्यान, त्र्यंबकेश्वर प्रकरणावर आक्षेप घेत संजय राऊत म्हणाले, “त्र्यंबकेश्वर प्रकरणाबाबत मी माहिती घेतली आहे. त्या लोकांची ही शंभर वर्ष जुनी परंपरा असून ते लोक मंदिराच्या गेटवरून देवाला धूप दाखवतात आणि पुढे त्यांच्या मार्गाला लागतात. आम्ही आणि प्रधानमंत्री सुद्धा अनेक वर्षापासून अजमेर दर्ग्यावर आणि मुंबईच्या हाजी अली दर्ग्यावर दर्शनासाठी जात असतो. त्याच प्रकारे ते लोक मंदिराबाहेर दर्शनासाठी येतात.”

महत्वाच्या बातम्या