Santosh Bangar। आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटानंतर शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची प्रतिक्रिया; म्हणाले

Santosh Bangar | मुंबई : सध्या आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल केलेल्या गौप्यस्फोटांनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी ईडीच्या भीतीपोटी केली असल्याचं त्यांनी म्हटलं होत. तसचं एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले असा गौप्यस्फोट देखील त्यांनी एका मुलाखतीदरम्यान केला. त्यावर आता शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले संतोष बांगर (What did Santosh Bangar say?)

संतोष बांगर यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट शब्दात सांगितलं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा आमच्यापैकी कोणालाही भाजपने धमकी दिली नाही. जो महाराष्ट्रातून बंड करण्यात आला त्याला एकच कारण आहे ते म्हणजे आम्हांला राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत मांडीला मांडी लावून बसायचं नव्हतं. ज्या लोकांचे संबंध सरळ थेट दाऊद यांच्याशी आहेत त्यांच्याशी आम्हाला बसायचं नव्हतं. म्हणून सर्व आमदारांनी, खासदारांनी एकनाथ साहेबांना सांगितलं की तुम्ही प्रतिनिधित्व करा आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत. अशी प्रतिक्रिया संतोष बांगर यांनी दिली आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी केलेल्या या गौप्यस्फोटाला खासदार संजय राऊत यांनी पाठींबा दिला आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विट करता आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ट्विट करत त्यांनी म्हंटल आहे की, लवकरच गौप्यस्फोट करायला लागतोय. जेव्हा penguin आणि UT ने Disha Slain च्या केसच्या भीतीने कोणा कोणाचे हात पाय पकडले… गप्पा करायला कोणाला किती पैसे दिले हा पण गौप्यस्फोट करायला लागेल लवकरच!!! ‘ मेरे दोस्त पिक्चर अभी बाकी है’ असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. यामुळे नीतेश राणे काय गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-