Sudhir Mungantiwar | “शिंदे-फडणवीसांमध्ये काही वाद नाही, मात्र काही शकुनी…”; सुधीर मुनगंटीवार यांचा खोचक टोला

Sudhir Mungantiwar | मुंबई: आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये 20 पेक्षा अधिक निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव दिलं आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis demanded that HTML be named after Atal Bihari – Sudhir Mungantiwar

सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एचटीएमएलला अटल बिहारी यांचं नाव देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीमुळे ही नाव देण्यात आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये नावावरून काहीच वाद नाही. मात्र, काही शकुनी हे वाद घालतात.”

पुढे बोलताना ते (Sudhir Mungantiwar) म्हणाले, ” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मिळून काम करतात. ही शोलेची जय-वीरुची जोडी गब्बर सिंगच्या विरोधात ठामपणे उभी आहे. उड्डाण पुलाच्या नावावरून आता आम्हाला वाद नको. सरकारने जे निर्णय घेतले आहे, ते लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे.”

दरम्यान, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये (Sudhir Mungantiwar) छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्ती संग्रामाचं भव्य स्मारक उभारणार असल्याचं ठरवण्यात आलं आहे. त्याचबरोबर भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द केले जाणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3COVNrJ