Uddhav Thackeray | “… तोपर्यंत राज्यपाल पद रद्द करावं”; उद्धव ठाकरेंची मागणी

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल विधानसभा अध्यक्षांकडे गेल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. याबद्दल प्रतिक्रिया देत असताना उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर हल्ला चढवला आहे. सत्ता संघर्ष सुरू असताना राज्यपालाची वागणूक घृणास्पद होती, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राज्यपालांवर टीकास्त्र चालवलं आहे.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष सुरू असताना राज्यपालांच्या भूमिकेबद्दल मत व्यक्त करत उद्धव ठाकरे म्हणाले, “सत्ता संघर्ष सुरू असताना राज्यपालांची भूमिका अत्यंत घृणास्पद होती. निवडणूक आयुक्त निवडण्याची एक प्रक्रिया असली पाहिजे असं मी मत व्यक्त केलं होतं. सुदैवाने त्याच वेळी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि निवडणूक आयुक्त निवडताना त्यात कोण असले पाहिजे याबद्दल नियमावली जारी केली. राज्यपाल या पदाचा दुरुपयोग केला जात आहे ते पद बरखास्त केलं पाहिजे.”

“आम्ही राजकारणी लोकप्रतिनिधी असतो, लोकप्रतिनिधी वरून लादलेला माणूस हे शोभेचं पद नाही. त्यामुळे राज्यपाल नियुक्त करताना एकतर नियमावली जारी करण्यात यावी किंवा राज्यपाल संस्था बरखास्त करण्यात यावी”, असं देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

पूर्वीसारखीच ही यंत्रणा खरी आणि आदरपूर्वक असायला हवी. मात्र, हव्याचा पायी याची बरबादी करून टाकली आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्तीवर काही नियमावली येत नाही तोपर्यंत सरळ राज्यपाल पद रद्द करून टाकावं”, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या बातम्या